पोस्ट्स

दारू नको मसाला दूध पिऊया – पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांचा अनोखा फंडा.

इमेज
  दारू नको मसाला दूध पिऊया – पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांचा अनोखा फंडा बारामती शहर पोलिसांचे आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन बारामती;(दि)प्रतिनिधी-महेश गडदे. बारामती शहरातील सर्व तरुण मंडळे, अशोकनगर, मेन रोड, राजे ग्रुप, महाविर पथ, देसाई इस्टेट , शारदा नगर, मोरगाव रोड, जामदार वस्ती, आमराई, तावरे बंगला, तीन हत्ती चौक, पाटस रोड, शिवाजी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परीसर,काटेवाडी, पिंपळी, डोर्लेवाडी, मळद, लीमटेक, माळेगाव बु ,गुणवडी या गावातील सर्व नागरिक व तरुण मंडळांनी यामध्ये भाग घ्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमांमध्ये सामील होणाऱ्यांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन करून मास्कचा वापर करावा 60 वर्षावरील नागरिक आणि दहा वर्षाच्या आतील मुलांनी शक्यतो सुरक्षेच्या आणी आरोग्याच्या कारणास्तव घरीच थांबावे अशा पद्धतीचे आवाहनही करण्यात आले आहे. कोरोनाच्या काळात गर्दी कमी व्हावी, पोलीस प्रशासनावरील ताण कमी व्हावा ,आपत्कालीन परिस्थितीमध्ये गणपती मंडळातील कार्यकर्ते पोलीस मित्र म्हणून मदतीस यावेत व नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या पद्धतीने, विनाअपघात व्हावी ,तरुण पिढी व्यसनाधीन होऊ...

मोटार सायकल चोरास बारामती तालुका पोलीसांनी केली अटक.

इमेज
  मोटार सायकल चोरास बारामती तालुका पोलीसांनी केली अटक. . बारामती:-(द)प्रतिनिधी महेश गडदे. गोपनीय माहितीवरून आरोपी  कृष्णा महादेव  जाधव, वय 23 वर्ष, राहणार. लाल पुरी, तालुका. इंदापूर. जि पुणे यास मोटार  सायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्याच्याकडून खालील प्रमाणे चोरीच्या मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत .1 बारामती तालुका पोलिस स्टेशन गु. र क्र 781/18 ipc 379 - ज्युपितर , 2. सासवड पोलीस स्टेशन गु.र. क्र 350/19ipc 379 बुलेट, 3.सासवड पोलीस स्टेशन गु.र. क्र 380/19ipc 379 होंडा डियो, 4.बारामती शहर पोलिस स्टेशन गु. र क्र 541/19 ipc 379  युनिकॉर्न , 5.बारामती शहर पोलिस स्टेशन गु. र क्र 654/19 ipc 379  यामाहा FZ . सदरचीकारवाई मा.पोलीस अधीक्षक देशमुख सो.अप्पर पोलीस अधीक्षक श्री.मोहिते सो, अधिकारी श्री.शिरगावकर सो यांच्या मार्गदर्शन खाली पो नि महेश ढवाण, सपोनी योगेश लंगोटे, पोलीस कॉनस्टेबल विजय वाघमोडे, राहुल पांढरे, नंदू जाधव , मंगेश कांबळे, विनोद लोखंडे यांनी केली असल्याची माहिती महेश ढवाण पोलीस निरीक्षक बारामती तालुका पोलीस स्टेशन यांनी दिली.

राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांना पितृशोक; विठोबा भरणे यांचे पुण्यात निधन

इमेज
सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना पितृशोक; विठोबा भरणे यांचे पुण्यात निधन. इंदापूर:(दि) प्रतिनिधी महेश गडदे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना पितृशोक झाला असून त्यांचे वडील विठोबा भरणे यांचे काल रात्री उपचार सुरु असताना पुण्यात निधन झाले आहे. आज सकाळी ११ वाजता त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  प्रगतशील शेतकरी असणारे आणि तात्या  नावाने सुपरिचित असणारे विठोबा भरणे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे उपचार सुरु असताना काल रात्री  अकरा वाजण्याच्या दरम्यान त्यांचे निधन झाले.  मृत्यूसमयी ते ९० वर्षांचे होते.  इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी  हे त्यांचे मूळ गाव असून या गावी आज सकाळी अकरा वाजता अंत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत, तात्यांच्या निधनाने भरणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून इंदापुर तालुक्यातून शोक व्यक्त  केला जात आहे.  

ग्रामपंचायत उमेदवारांसाठी खुशखबर...ऑफलाईन अर्ज भरण्यास निवडणूक आयोगाची परवानगई.

इमेज
ग्रामपंचायत उमेदवारांसाठी खुशखबर...ऑफलाईन अर्ज भरण्यास निवडणूक आयोगाची परवानगई.   मुंबई -प्रतिनिधी: महेश गडदे.  राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्यास एक दिवसाचा अवधी बाकी असल्याने उमेदवारांची एकच झुंबड उडाली. ऑनलाईन कार्यालयात उमेदवारांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. मात्र, सर्व्हर डाऊन झाल्याने एकेका उमेदवाराला अर्ज दाखल करण्यासाठी ताटकळत थांबावे लागले. मात्र, नागरिकांच्या तक्रारी आणि नेतेमंडळींनी हा मुद्दा उचलून धरल्याने निवडणूक आयोगाने नवीन आदेश जारी केला आहे. त्यानुसार, नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी पारंपरिक पद्धतीचा म्हणजे ऑफलाईन मोडमध्ये सादर करण्याचा आदेश निघाला आहे.  राज्यभरात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदतही वाढविण्यात आली असून उद्या म्हणजेच 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावर अर्जाचा पाऊस पडल्याने सर्व्हर डाऊन झाले होते. त्यामुळे अनेक उमेदवारांना नामांकन भरण्यासाठी चक्क रांगा लावाव्या लागल्या. त्यात भारत दूरसंचार सेवा विस्कळीत झाल्याने इंटरनेट सुविधाही कोलमडली होत...

दोन बहाद्दरांकडून पाच दुचाकी जप्त; बारामती पोलिसांची कामगिरी !

इमेज
दोन बहाद्दरांकडून पाच दुचाकी जप्त; बारामती पोलिसांची कामगिरी ! बारामती :(दि) प्रतिनिधी महेश गडदे.  गेल्या अनेक दिवसांपासून शहरात सुरु असलेल्या मोटारसायकल चोरीच्या सत्रानंतर आज शहर पोलिसांनी दोन दुचाकीचोरांना अटक करुन त्यांच्याकडून पाच दुचाक्या जप्त केल्या. जवळपास 4 लाख 35 हजारांच्या या दुचाकी आहेत. पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी या बाबत माहिती दिली.  चैतन्य पांडूरंग शेळके (वय 19 ) व किशोर सहदेव पवार (वय 19, रा. मोत्रा, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) अशी दुचाकी चोरट्यांची नावे आहेत. बारामती शहरात दुचाकी चोरीचे प्रकार वाढले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोतीबाग चौक, इंदापूर रोड येथे  नाकाबंदी केली होती. या नाकाबंदी दरम्यान दोघे युवक बुलेटवरून संशयास्पदरित्या फिरताना दिसून आले. त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांच्याकडील बुलेट कसबा  बारामती येथून चोरल्याची कबुली त्यांनी दिली.  त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत  त्यांनी बारामती तालुका पोलिस ठाणे व आष्टी (जि. बीड) पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याच्यी कबुली दिली. नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शन...

ब्रिटनहून भारतात परतलेल्या ६ जणांना कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण.

इमेज
  धक्कादायक! ब्रिटनहून भारतात परतलेल्या ६ जणांना कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण. कोरोनाच्या नव्या प्रकाराचा भारतात शिरकाव प्रतिनिधी:(दि)महेश गडदे. ब्रिटनमधून भारतात परतलेल्या ६ जणांना कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झाल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरात सुमारे ३३ हजार प्रवासी ब्रिटनहून भारतात दाखल झाले आहेत. कोरोनाच्या नव्या प्रकाराचा भारतात शिरकाव ब्रिटनहून आलेल्या ६ जणांना नव्या कोरोनाची लागण देशभरातील सुमारे १० प्रयोगशाळांमध्ये नमुन्यांची तपासणी नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराने जगभरात कहर केला असतानाच आता भारतातही नव्या कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर येत आहे. ब्रिटनमधून भारतात परतलेल्या ६ जणांना कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झाल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.  एकीकडे नव्या वर्षाच्या स्वागताची सर्वत्र उत्सुकता लागलेली असताना कोरोनाच्या नव्या प्रकाराचा भारतात झालेला शिरकाव चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे. केंद्र सरकारने आज (मंगळवारी) दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनमधून परतलेल्या ६ जणांमध्ये कोरोनाच...

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलं महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले;कोरोणा वर मोठ विधान.

इमेज
  मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढीलप्रमाणे मुद्दे मांडले: प्रतिनिधी- महेश गडदे, मी आजपर्यंत जे जे आपल्याला सांगत आलो, ते ते आपण मनापासून अमलात आणत गेलात आणि म्हणूनच मी म्हणेन की आजच्या परिस्थितीवर आपण पूर्णपणे काबू मिळवला नसला तरी काही प्रमाणात नक्कीच नियंत्रण मिळवलं आहे. जवळपास सर्व गोष्टी आता उघडलेल्या आहेत. रहदारी सुरू झालेली आहे, कारभार सुरू झालेले आहेत, येणं-जाणं भेटणं याही गोष्टी सुरू झालेल्या आहेत. मात्र आपला कुटुंबप्रमुख म्हणून प्रत्येक पावलावर सावध रहा हे सांगणं माझं कर्तव्य आहे. गेल्या मार्चपासून आपल्या राज्यामध्ये कोरोनाचे पेशंट दिसायला लागले. त्यानंतर त्याची वाढ किती झाली, कमी कसे झाले, दुदैवाने मृत्यू किती झाले हे सर्व काही आपण जगासमोर अत्यंत पारदर्शकपणे ठेवलेलं आहे. घशाचं इंफेक्शन, सर्दी, खोकला ताप या सर्वांवर औषधे असली तरी कोविडसाठी प्रतिबंधात्मक इलाज तोच आहे, मास्क लावा, हात धुवा, अंतर ठेवा. हे जर आपण कटाक्षाने पाळलं तर कोविडच काय तर इतर कोणतेही साथीचे आजार आपल्यापासून अंतर ठेवू शकतात. युरोपमध्ये आणि ...