दोन बहाद्दरांकडून पाच दुचाकी जप्त; बारामती पोलिसांची कामगिरी !

बारामती :(दि) प्रतिनिधी महेश गडदे.

 गेल्या अनेक दिवसांपासून शहरात सुरु असलेल्या मोटारसायकल चोरीच्या सत्रानंतर आज शहर पोलिसांनी दोन दुचाकीचोरांना अटक करुन त्यांच्याकडून पाच दुचाक्या जप्त केल्या. जवळपास 4 लाख 35 हजारांच्या या दुचाकी आहेत. पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी या बाबत माहिती दिली. 

चैतन्य पांडूरंग शेळके (वय 19 ) व किशोर सहदेव पवार (वय 19, रा. मोत्रा, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) अशी दुचाकी चोरट्यांची नावे आहेत. बारामती शहरात दुचाकी चोरीचे प्रकार वाढले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोतीबाग चौक, इंदापूर रोड येथे  नाकाबंदी केली होती. या नाकाबंदी दरम्यान दोघे युवक बुलेटवरून संशयास्पदरित्या फिरताना दिसून आले. त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांच्याकडील बुलेट कसबा  बारामती येथून चोरल्याची कबुली त्यांनी दिली. 

त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत  त्यांनी बारामती तालुका पोलिस ठाणे व आष्टी (जि. बीड) पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याच्यी कबुली दिली. नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रकाश वाघमारे, सहाय्यक उपनिरीक्षक संजय जगदाळे, अनिल सातपुते, भगवान दुधे, दादासाहेब डोईफोडे, रुपेश साळुंके,सुहास लाटणे, बंडू कोठे, योगेश कुलकर्णी, दशरथ इंगोले, अकबर शेख, अजित राऊत आदींनी ही कामगिरी केली.

बारामती : गेल्या अनेक दिवसांपासून शहरात सुरु असलेल्या मोटारसायकल चोरीच्या सत्रानंतर आज शहर पोलिसांनी दोन दुचाकीचोरांना अटक करुन त्यांच्याकडून पाच दुचाक्या जप्त केल्या. जवळपास 4 लाख 35 हजारांच्या या दुचाकी आहेत. पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी या बाबत माहिती दिली. 

चैतन्य पांडूरंग शेळके (वय 19 ) व किशोर सहदेव पवार (वय 19, रा. मोत्रा, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) अशी दुचाकी चोरट्यांची नावे आहेत. बारामती शहरात दुचाकी चोरीचे प्रकार वाढले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोतीबाग चौक, इंदापूर रोड येथे  नाकाबंदी केली होती. या नाकाबंदी दरम्यान दोघे युवक बुलेटवरून संशयास्पदरित्या फिरताना दिसून आले. त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांच्याकडील बुलेट कसबा  बारामती येथून चोरल्याची कबुली त्यांनी दिली. 

त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत  त्यांनी बारामती तालुका पोलिस ठाणे व आष्टी (जि. बीड) पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याच्यी कबुली दिली. नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रकाश वाघमारे, सहाय्यक उपनिरीक्षक संजय जगदाळे, अनिल सातपुते, भगवान दुधे, दादासाहेब डोईफोडे, रुपेश साळुंके,सुहास लाटणे, बंडू कोठे, योगेश कुलकर्णी, दशरथ इंगोले, अकबर शेख, अजित राऊत आदींनी ही कामगिरी केली.

 .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.