राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांना पितृशोक; विठोबा भरणे यांचे पुण्यात निधन

सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना पितृशोक; विठोबा भरणे यांचे पुण्यात निधन.


इंदापूर:(दि) प्रतिनिधी महेश गडदे.

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना पितृशोक झाला असून त्यांचे वडील विठोबा भरणे यांचे काल रात्री उपचार सुरु असताना पुण्यात निधन झाले आहे. आज सकाळी ११ वाजता त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

प्रगतशील शेतकरी असणारे आणि तात्या  नावाने सुपरिचित असणारे विठोबा भरणे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे उपचार सुरु असताना काल रात्री  अकरा वाजण्याच्या दरम्यान त्यांचे निधन झाले.  मृत्यूसमयी ते ९० वर्षांचे होते. 

इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी  हे त्यांचे मूळ गाव असून या गावी आज सकाळी अकरा वाजता अंत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत, तात्यांच्या निधनाने भरणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून इंदापुर तालुक्यातून शोक व्यक्त  केला जात आहे.  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.