पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दारू नको मसाला दूध पिऊया – पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांचा अनोखा फंडा.

इमेज
  दारू नको मसाला दूध पिऊया – पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांचा अनोखा फंडा बारामती शहर पोलिसांचे आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन बारामती;(दि)प्रतिनिधी-महेश गडदे. बारामती शहरातील सर्व तरुण मंडळे, अशोकनगर, मेन रोड, राजे ग्रुप, महाविर पथ, देसाई इस्टेट , शारदा नगर, मोरगाव रोड, जामदार वस्ती, आमराई, तावरे बंगला, तीन हत्ती चौक, पाटस रोड, शिवाजी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परीसर,काटेवाडी, पिंपळी, डोर्लेवाडी, मळद, लीमटेक, माळेगाव बु ,गुणवडी या गावातील सर्व नागरिक व तरुण मंडळांनी यामध्ये भाग घ्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमांमध्ये सामील होणाऱ्यांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन करून मास्कचा वापर करावा 60 वर्षावरील नागरिक आणि दहा वर्षाच्या आतील मुलांनी शक्यतो सुरक्षेच्या आणी आरोग्याच्या कारणास्तव घरीच थांबावे अशा पद्धतीचे आवाहनही करण्यात आले आहे. कोरोनाच्या काळात गर्दी कमी व्हावी, पोलीस प्रशासनावरील ताण कमी व्हावा ,आपत्कालीन परिस्थितीमध्ये गणपती मंडळातील कार्यकर्ते पोलीस मित्र म्हणून मदतीस यावेत व नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या पद्धतीने, विनाअपघात व्हावी ,तरुण पिढी व्यसनाधीन होऊ...

मोटार सायकल चोरास बारामती तालुका पोलीसांनी केली अटक.

इमेज
  मोटार सायकल चोरास बारामती तालुका पोलीसांनी केली अटक. . बारामती:-(द)प्रतिनिधी महेश गडदे. गोपनीय माहितीवरून आरोपी  कृष्णा महादेव  जाधव, वय 23 वर्ष, राहणार. लाल पुरी, तालुका. इंदापूर. जि पुणे यास मोटार  सायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्याच्याकडून खालील प्रमाणे चोरीच्या मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत .1 बारामती तालुका पोलिस स्टेशन गु. र क्र 781/18 ipc 379 - ज्युपितर , 2. सासवड पोलीस स्टेशन गु.र. क्र 350/19ipc 379 बुलेट, 3.सासवड पोलीस स्टेशन गु.र. क्र 380/19ipc 379 होंडा डियो, 4.बारामती शहर पोलिस स्टेशन गु. र क्र 541/19 ipc 379  युनिकॉर्न , 5.बारामती शहर पोलिस स्टेशन गु. र क्र 654/19 ipc 379  यामाहा FZ . सदरचीकारवाई मा.पोलीस अधीक्षक देशमुख सो.अप्पर पोलीस अधीक्षक श्री.मोहिते सो, अधिकारी श्री.शिरगावकर सो यांच्या मार्गदर्शन खाली पो नि महेश ढवाण, सपोनी योगेश लंगोटे, पोलीस कॉनस्टेबल विजय वाघमोडे, राहुल पांढरे, नंदू जाधव , मंगेश कांबळे, विनोद लोखंडे यांनी केली असल्याची माहिती महेश ढवाण पोलीस निरीक्षक बारामती तालुका पोलीस स्टेशन यांनी दिली.

राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांना पितृशोक; विठोबा भरणे यांचे पुण्यात निधन

इमेज
सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना पितृशोक; विठोबा भरणे यांचे पुण्यात निधन. इंदापूर:(दि) प्रतिनिधी महेश गडदे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना पितृशोक झाला असून त्यांचे वडील विठोबा भरणे यांचे काल रात्री उपचार सुरु असताना पुण्यात निधन झाले आहे. आज सकाळी ११ वाजता त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  प्रगतशील शेतकरी असणारे आणि तात्या  नावाने सुपरिचित असणारे विठोबा भरणे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे उपचार सुरु असताना काल रात्री  अकरा वाजण्याच्या दरम्यान त्यांचे निधन झाले.  मृत्यूसमयी ते ९० वर्षांचे होते.  इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी  हे त्यांचे मूळ गाव असून या गावी आज सकाळी अकरा वाजता अंत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत, तात्यांच्या निधनाने भरणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून इंदापुर तालुक्यातून शोक व्यक्त  केला जात आहे.  

ग्रामपंचायत उमेदवारांसाठी खुशखबर...ऑफलाईन अर्ज भरण्यास निवडणूक आयोगाची परवानगई.

इमेज
ग्रामपंचायत उमेदवारांसाठी खुशखबर...ऑफलाईन अर्ज भरण्यास निवडणूक आयोगाची परवानगई.   मुंबई -प्रतिनिधी: महेश गडदे.  राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्यास एक दिवसाचा अवधी बाकी असल्याने उमेदवारांची एकच झुंबड उडाली. ऑनलाईन कार्यालयात उमेदवारांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. मात्र, सर्व्हर डाऊन झाल्याने एकेका उमेदवाराला अर्ज दाखल करण्यासाठी ताटकळत थांबावे लागले. मात्र, नागरिकांच्या तक्रारी आणि नेतेमंडळींनी हा मुद्दा उचलून धरल्याने निवडणूक आयोगाने नवीन आदेश जारी केला आहे. त्यानुसार, नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी पारंपरिक पद्धतीचा म्हणजे ऑफलाईन मोडमध्ये सादर करण्याचा आदेश निघाला आहे.  राज्यभरात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदतही वाढविण्यात आली असून उद्या म्हणजेच 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावर अर्जाचा पाऊस पडल्याने सर्व्हर डाऊन झाले होते. त्यामुळे अनेक उमेदवारांना नामांकन भरण्यासाठी चक्क रांगा लावाव्या लागल्या. त्यात भारत दूरसंचार सेवा विस्कळीत झाल्याने इंटरनेट सुविधाही कोलमडली होत...

दोन बहाद्दरांकडून पाच दुचाकी जप्त; बारामती पोलिसांची कामगिरी !

इमेज
दोन बहाद्दरांकडून पाच दुचाकी जप्त; बारामती पोलिसांची कामगिरी ! बारामती :(दि) प्रतिनिधी महेश गडदे.  गेल्या अनेक दिवसांपासून शहरात सुरु असलेल्या मोटारसायकल चोरीच्या सत्रानंतर आज शहर पोलिसांनी दोन दुचाकीचोरांना अटक करुन त्यांच्याकडून पाच दुचाक्या जप्त केल्या. जवळपास 4 लाख 35 हजारांच्या या दुचाकी आहेत. पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी या बाबत माहिती दिली.  चैतन्य पांडूरंग शेळके (वय 19 ) व किशोर सहदेव पवार (वय 19, रा. मोत्रा, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) अशी दुचाकी चोरट्यांची नावे आहेत. बारामती शहरात दुचाकी चोरीचे प्रकार वाढले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोतीबाग चौक, इंदापूर रोड येथे  नाकाबंदी केली होती. या नाकाबंदी दरम्यान दोघे युवक बुलेटवरून संशयास्पदरित्या फिरताना दिसून आले. त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांच्याकडील बुलेट कसबा  बारामती येथून चोरल्याची कबुली त्यांनी दिली.  त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत  त्यांनी बारामती तालुका पोलिस ठाणे व आष्टी (जि. बीड) पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याच्यी कबुली दिली. नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शन...

ब्रिटनहून भारतात परतलेल्या ६ जणांना कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण.

इमेज
  धक्कादायक! ब्रिटनहून भारतात परतलेल्या ६ जणांना कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण. कोरोनाच्या नव्या प्रकाराचा भारतात शिरकाव प्रतिनिधी:(दि)महेश गडदे. ब्रिटनमधून भारतात परतलेल्या ६ जणांना कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झाल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरात सुमारे ३३ हजार प्रवासी ब्रिटनहून भारतात दाखल झाले आहेत. कोरोनाच्या नव्या प्रकाराचा भारतात शिरकाव ब्रिटनहून आलेल्या ६ जणांना नव्या कोरोनाची लागण देशभरातील सुमारे १० प्रयोगशाळांमध्ये नमुन्यांची तपासणी नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराने जगभरात कहर केला असतानाच आता भारतातही नव्या कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर येत आहे. ब्रिटनमधून भारतात परतलेल्या ६ जणांना कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झाल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.  एकीकडे नव्या वर्षाच्या स्वागताची सर्वत्र उत्सुकता लागलेली असताना कोरोनाच्या नव्या प्रकाराचा भारतात झालेला शिरकाव चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे. केंद्र सरकारने आज (मंगळवारी) दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनमधून परतलेल्या ६ जणांमध्ये कोरोनाच...

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलं महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले;कोरोणा वर मोठ विधान.

इमेज
  मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढीलप्रमाणे मुद्दे मांडले: प्रतिनिधी- महेश गडदे, मी आजपर्यंत जे जे आपल्याला सांगत आलो, ते ते आपण मनापासून अमलात आणत गेलात आणि म्हणूनच मी म्हणेन की आजच्या परिस्थितीवर आपण पूर्णपणे काबू मिळवला नसला तरी काही प्रमाणात नक्कीच नियंत्रण मिळवलं आहे. जवळपास सर्व गोष्टी आता उघडलेल्या आहेत. रहदारी सुरू झालेली आहे, कारभार सुरू झालेले आहेत, येणं-जाणं भेटणं याही गोष्टी सुरू झालेल्या आहेत. मात्र आपला कुटुंबप्रमुख म्हणून प्रत्येक पावलावर सावध रहा हे सांगणं माझं कर्तव्य आहे. गेल्या मार्चपासून आपल्या राज्यामध्ये कोरोनाचे पेशंट दिसायला लागले. त्यानंतर त्याची वाढ किती झाली, कमी कसे झाले, दुदैवाने मृत्यू किती झाले हे सर्व काही आपण जगासमोर अत्यंत पारदर्शकपणे ठेवलेलं आहे. घशाचं इंफेक्शन, सर्दी, खोकला ताप या सर्वांवर औषधे असली तरी कोविडसाठी प्रतिबंधात्मक इलाज तोच आहे, मास्क लावा, हात धुवा, अंतर ठेवा. हे जर आपण कटाक्षाने पाळलं तर कोविडच काय तर इतर कोणतेही साथीचे आजार आपल्यापासून अंतर ठेवू शकतात. युरोपमध्ये आणि ...

नरभक्षक बिबट्याला मारण्यात अखेर वनविभाला यश.

इमेज
  नरभक्षक बिबट्याला मारण्यात अखेर वनविभाला यश; धवलसिंह मोहिते पाटलांच्या गोळीने घेतला बिबट्याचा वेध प्रतिनिधी:महेश गडदे, गेल्या काही दिवसांपासून अनेक तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या आणि आतापर्यंत बारा जणांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला मारण्यात वनविभागाला यश आले आहे. सोलापूर : करमाळा तालुक्यात दहशत माजवनारा नरभक्षक बिबट्याला मारण्यात वनविभाला अखेर यश आलं आहे. डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या गोळीने बिबट्याचा वेध घेतला. वांगी नं.4 रांखुडे वस्तीवर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या बागेत बिबट्याला ठार करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून या नरभक्षक बिबट्यामुळे तालुक्यात दहशत पसरली होती. अकलूज येथील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे बारामतीचे तावरे यांचे सहकारी म्हणून ऑपरेशनमध्ये सामील झाले होते. वांगी येथे बिबट्याला केळीच्या बागेत वेढल्यावर या बिबट्याने धवलसिंह यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला. मात्र, अतिशय सावध असलेल्या मोहिते पाटील यांनी 15 फुटावर असलेल्या या नरभक्षक बिबट्यावर 3 गोळ्या फायर करीत त्याला ठार केले.

आयुर्वेदामुळे कोरोना मृत्युदर कमी. डॉ. प्रताप पवार .

इमेज
  आयुर्वेदामुळे कोरोना मृत्युदर कमी. इंदापूर - मोफत आरोग्यकार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. प्रताप पवार. इंदापूर,दि. प्रतिनिधी- महेश गडदे.   जागतिक कोरोना महामारी मृत्यूदराच्या तुलनेत भारतातील कोरोना मृत्युदरफारचकमी असून त्याचे श्रेय केंद्रीयआयुषमंत्रालयनिर्देशित पंचतुलसी, हळदी काढयास जाते. त्यामुळे आयुर्वेद ही सुखी जीवन जगण्याची आदर्श गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन इंटर नॅशनल मार्केटिंग कार्पोरेशन कंपनीचे क्राऊन प्रेसिडेंट डॉ. प्रताप पवार यांनी केले.  अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे जिल्हा व इंदापूर तालुका मराठीपत्रकार संघ, आरोग्य संदेश बहुद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत इंदापूर विद्या प्रतिष्ठान सभागृहात आयोजित मोफत आरोग्य कार्यशाळेततेबोलत होते. कार्यशाळेस पुणे, सांगली, सोलापूर, नगर जिल्ह्यातून १३५ प्रतिनिधी उपस्थितहोते . विद्या प्रतिष्ठान पॉलीटेकनीक कॉलेजचे प्राचार्य राजकुमार वीर, आरोग्यसंदेशप्रतिष्ठान कार्याध्यक्ष तुषार रंजनकर, पत्रकार संघाचे शहराध्यक्ष सुरेश जकाते यावेळी उपस्थित होते. यावेळी अजिनाथ कळसाईत, सुजाता चांदणे...

सरकारी कर्मचा-यांना टी-शर्ट घालता येनार नाही. आत्ता नवीन ड्रेस कोड येनार.

इमेज
  मंत्रालयात जीन्स, टी- शर्ट घालता येणार नाही; सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता नवीन ड्रेस कोड महिला कर्मचाऱ्यांना देखील नवा ड्रेसकोड ठरवून देण्यात आला आहे. प्रतिनिधी- महेश गडदे.  शासकीय कर्मचाऱ्यांनाही ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश सरकारने जाहीर केले आहे. मंत्रालयाने जाहीर केलेल्या निर्देशात सरकारी कर्मचाऱ्यांना आता जीन्स, टी शर्ट घालता येणार नाही. तसेच स्लीपर्सच्या न वापरण्याची सूचना देखील देण्यात आली आहे.  महिला कर्मचाऱ्यांना देखील नवा ड्रेसकोड ठरवून देण्यात आला आहे. महिलांना कार्यालयात साडी, कुर्ता, सलवार, चुडीदार, दुपट्टा, ट्राऊझर घालणे बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे आठवड्यातून एकदा म्हणजे शुक्रवारी सर्व कर्मचाऱ्यांनी खादीचे कपडे घालावेत असं देखील नव्या नियमांत सांगितले आहे.  शासकीय कर्मचाऱ्यांकडून चांगल्या वागणुकीची तसेच व्यक्तीमत्वाची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येते. या परिस्थितीत जर अधिकारी, कर्मचारी यांची वेशभूषा अशोभनीय, गबाळी तसेच अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम कामकाजावर दे...

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका जाहीर. गावातील पुढारी लागले तयारीला.

इमेज
  महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका जाहीर.  प्रतिनिधी- महेश गडदे.  विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी सुरळीतपणे निवडणुका झाल्या. यानंतर आता राज्य निवडणुक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनूसार, 15 जानेवारी 2021 ला राज्यातील सर्व ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका पार पडणार आहे.  गेल्या काही महिन्यांपासून राज्यात कोरोनाचं संकट असल्यामुळे ग्रामपंचायतच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. मात्र नुकत्याच सुरळीत झालेल्या पदवीधर निवडणुकांनंतर ग्रामपंचायतच्या निवडणुकाचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला. या सर्व ठिकाणी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार असून 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. निवडणूक कार्यक्रम असा- निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे : 15 डिसेंबर उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत : 23 ते 30 डिसेंबर उमेदवारी अर्जांची छाननी : 31 डिसेंबर उमेदवारी अर्ज माघार व चिन्ह वाटप : 4 जानेवारी मतदा...

महाराष्ट्र सरकारचा शक्ती कायद्या विषयी जाणुन घ्या. अंमलबजावणी सर्वांसाठी सारखीच असावी;नितेश राणे .

इमेज
  शक्ती कायदा सर्वांसाठी एकसमान न्याय देईल, मग ते तरुण कॅबिनेट मंत्री असले तरी' महाराष्ट्र सरकारच्या या शक्ती कायद्याचं स्वागत करताना याची अंमलबजावणी सर्वांसाठी सारखीच असावी, अशी आशा नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे.   प्रतिनिधी-महेश गडदे,  महिला व बालकांवरील अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य सरकारने बलात्कार, ॲसिड हल्ला आणि बालकांवरील अत्याचारांच्या गंभीर प्रकरणी मृत्युदंडाची तरतूद असलेला कायदा आणला असून या नव्या कायद्याच्या मसुद्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. विधिमंडळाच्या १४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात त्यासाठीचे विधेयक मांडण्यात येणार आहे. भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे यांनी या कायद्याचं स्वागत करत सरकारला भेदभाव न करण्याचं सूचवलं आहे.  भारतीय दंडविधानाच्या कलम ३७६ अंतर्गत बलात्काराच्या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची तरतूद आहे. तसेच सामूहिक बलात्काराच्या (३७६ डीसी) गुन्ह्यातही जन्मठेपेची तरतूद आहे; मात्र आता अशा गुन्ह्यांसाठी मृत्युदंडाचीही तरतूद करण्यात येणार आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात पंधरा दिवसात आरोपपत्र दाखल...
इमेज
  आता लढाई 'आर-या-पार'! शेतकऱ्यांनी मोदी सरकारचा प्रस्ताव फेटाळला; आंदोलन आणखी तीव्र होणार. कृषी विधेयकं मागे घेत नाही तोवर आंदोलन सुरुच राहणार १४ डिसेंबर रोजी देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा जिओच्या सीमवर बहिष्कार घालण्याचं शेतकऱ्यांचं आवाहन दिल्लीत प्रतिनिधी-महेश गडदे. नव्या कृषी कायद्यांमधील बदल करण्याचा केंद्र सरकारने पाठवलेला लेखी प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळून लावला आहे. कृषी कायदे पूर्णपणे रद्द करण्याच्या भूमिकेवर आम्ही ठाम असून यापुढील काळात सरकारविरोधातील आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.  दिल्लीत शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेतली. सरकारकडून आलेल्या अहवालाची शेतकऱ्यांनी सविस्तर माहिती दिली. "केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या दोन तासांच्या बैठकीत त्यांनी फक्त गेल्या पाच बैठकींमध्ये झालेली माहिती दिली. सरकारकडून आम्हाला फक्त गोलगोल फिरवण्याचं काम केलं जातंय. सरकारने पाठवलेला प्रस्ताव आम्ही फेटाळून लावण्याचा निर्णय घेतला आहे आणि जोवर कायदे पूर्णपणे रद्द होत नाहीत. तोवर आंदोलन सुरुच राहणार आहे", अशी ...

KPNews Channel च्या वतीने ऑनलाईन राज्यस्तरीय डान्स स्पर्धा

इमेज
  KPNews Channel च्या वतीने ऑनलाईन राज्यस्तरीय डान्स स्पर्धा. प्रतिनिधि महेश गडदे. खोपोली (जि.रायगड) / धनंजय अमृते :- फार्मसी कृती समिती सातारा जिल्हा युवती विभाग व रेड फिल्म प्रोडक्शन यांच्या सहकार्याने KPNews Channel च्या वतीने ऑनलाईन राज्यस्तरीय डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.  याबाबत स्पर्धेच्या संयोजक राजश्री दळवी म्हणाल्या की, महाराष्ट्रातील तरूण-तरुणींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी 'KPNews Channel' च्या वतीने ऑनलाईन राज्यस्तरीय डान्स (Dance) स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रथम तीन क्रमाकांना रोख बक्षीस, ट्राफी, प्रमाणपत्र व दोन प्रेक्षक पसंतीवर बक्षीसे देण्यात येतील. तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र व गिफ्ट देण्यात येईल. या स्पर्धेतील प्रथम विजेत्याला १० रुपये हजार, द्वितीय विजेत्याला ५ रुपये हजार, तृतीय विजेत्याला ३ हजार रूपये बक्षीस देण्यात येईल. तसेच इंस्टाग्राम जास्त व्ह्यूजला १ रुपये व यूट्यूब जास्त व्ह्यूजला १ हजार रूपये प्रेक्षक पसंतीचे बक्षीस देण्यात येणार आहे. दळवी पुढे म्हणाल्या की, आपल्या डान्सचा व्हिडीओ बनवून आम्हाला व्हॉट्स अप,...

मोदी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न; हे बडे पाच नेते उद्या राष्ट्रपतींना भेटणार

इमेज
मोदी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न; राहुल गांधी, शरद पवारांसह पाच नेते उद्या राष्ट्रपतींना भेटणार शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला देशभरात चांगला प्रतिसाद मिळला. तसेच, विविध राज्यात अनेक पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. प्रतिनिधि -महेश गडदे।  केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात विरोधी पक्षांचे एक प्रतिनिधी मंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यासह पाच नेते बुधवारी संध्याकाळी पाच वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. कोविड -१९ च्या प्रोटोकॉलमुळे केवळ पाच नेत्यांना राष्ट्रपतींना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. विरोधी पक्षांचे नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत, यासंदर्भातील माहिती सीताराम येचुरी यांनी माहिती दिली. उद्या काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माकपचे सीताराम येचुरी, सीपीआयचे डी. राजा आणि डिएमकेचे टीकेएस एलनगोवन राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलन करत असलेल...

टिकरी बॉर्डरवर आंदोलक शेतकऱ्याचा मृत्यू, १२ दिवसांत ८ शेतकऱ्यांनी सोडले प्राण

इमेज
शेतकरी आंदोलनादरम्यान आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हा शेतकरी टिकरी बॉर्डरवर आंदोलनात सहभागी झाला होता. टिकरी बॉर्डरवर आंदोलक शेतकऱ्याचा मृत्यू, १२ दिवसांत ८ शेतकऱ्यांनी सोडले प्राण आज शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला देशभरात चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रतिनिधि -महेश गडदे. विविध राज्यात अनेक पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरीदिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याबाबत सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही, हे चित्र असल्याने शेतकरी संघटनांनी मंगळवारी  'भारत बंद'ची हाक दिली आहे.  शेतकरी आंदोलनादरम्यान आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हा शेतकरी टिकरी बॉर्डरवर आंदोलनात सहभागी झाला होता. सोमवारी त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर या शेतकऱ्याला बहादूरगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या शेतकऱ्य...

शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबरला 'भारत बंद'ची हाक दिली आहे

इमेज
  शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबरला 'भारत बंद'ची हाक दिली आहे . ५१ ट्रान्सपोर्ट युनियन्सनी ८ डिसेंबरला शेतकऱ्यांच्या 'भारत बंद'ला समर्थन दिले आहे. प्रतिनिधि -महेश गडदे.  गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्यान नव्याकृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरीदिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याबाबत सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही, हे चित्र असल्याने शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबरला 'भारत बंद'ची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या या 'भारत बंद'ला इंडियन टूरिस्ट ट्रान्सपोर्टर्स असोसिएशन आणि दिल्ली गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनने पाठिंबा दर्शविला आहे. ५१ ट्रान्सपोर्ट युनियन्सनी ८ डिसेंबरला शेतकऱ्यांच्या 'भारत बंद'ला समर्थन दिले आहे. भारत बंदला १० ट्रेड युनियन्सचा पाठिंबा ट्रान्सपोर्ट युनियन्सच्या आधी दहा ट्रेड युनियन्सने शेतकऱ्यांच्या 'भारत बंद'ला पाठिंबा दर्शविला आहे. शेती आणि ट्रान्सपोर्ट एका बापाची दोन मुलं आयटीटीएचे अध्यक्ष सतीश शेरावत म्हणाले, ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीपणाला आणि महान कार्याला अभिवादन - मुख्यमंत्री

इमेज
भीमसैनिकांनी आपल्या शिस्तीचे व संयमाचे दर्शन घडविले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमी येथे अभिवादन करताना केले.   डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीपणाला आणि महान कार्याला अभिवादन - मुख्यमंत्री प्रतिनिधि महेश गडदे मुंबई :  दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त सागराशी स्पर्धा करणारा भीमसागर येथे येतो. परंतु कोरोनामुळे वेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे भीमसैनिकांनी आपल्या शिस्तीचे व संयमाचे दर्शन घडविले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमी येथे अभिवादन करताना केले.  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खा. शरद पवार यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांच्या दूरदृष्टीपणाला आणि एकूणच त्यांच्या कार्याला मी विनम्रपणे अभिवादन करतो आणि सर्वांना धन्य...

राहुल गांधीना शरद पवार काय म्हणाले होते.? संजय राउतांची प्रतिक्रया

इमेज
शरद पवारांचं वक्तव्य कोणत्याही नेत्यानं मार्गदर्शनाचे बोल म्हणून स्वीकारले पाहिजे: संजय राऊत राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सातत्याचा अभाव दिसतो, असं शरद पवार म्हणाले होते. प्रतिनिधि- महेश गडदे. शरद पवारांच्या विधानानंतर मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील सध्या सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीवरुन राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'लोकमत'ला दिलेल्या एक्सकॅल्युसिव्ह मुलाखतीत विविध दावे केले होते. काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीबाबतही शरद पवारांनी भाष्य केलं होतं. मात्र शरद पवारांच्या या विधानामुळे काँग्रेसचे नेते चांगलेच नाराज झाल्याचे दिसून आले.  शरद पवार यांना काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीबाबत काय वाटतं, असा सवाल मुलाखतीत विचारण्यात आला होता. यावर शरद पवारांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाबाबतही विधान केलं. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सातत्याचा अभाव दिसतो, असं शरद पवार म्हणाले होते. शरद पवारांच्या या विधानानंतर मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी...

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती देण्यात आल्यानंतर राज्यात आरक्षणाबाबत नवा पेच निर्माण झाला आहे.

इमेज
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती देण्यात आल्यानंतर राज्यात आरक्षणाबाबत नवा पेच निर्माण झाला आहे. ओबीसी आरक्षणाला कोण हात लावतो ते पाहू; विजय वड्डेट्टीवार यांचं वक्तव्य. प्रतिनिधि- महेश गडदे. राज्यात आरक्षणावरुन राजकारण चांगलचं ढवळून निघाल्याचं दिसून येत आहे. मंत्रीपद गेलं तरी चालेल पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही, असं विधान मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. जालना दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना विजय वड्डेट्टीवार यांनी हे वक्तव्य केलं आहे.  एका मराठी वृत्तवाहिनीच्या वृत्तानूसार विजय वड्डेट्टीवार म्हणाले की, मराठा आरक्षणामुळे ओबीसी समाजाला धक्का लागेल, अशी भीती काही ओबीसी नेत्यांना वाटत आहे. आम्ही पूर्ण ताकदीनिशी मराठा समाजाबरोबर आहोत. मात्र आम्हाला ओबीसी समाजामधून आरक्षण द्या म्हणणे पूर्ण चुकीचं आहे. जर असा प्रयत्न झालाच तर मंत्री पद गेलं तरी चालेल पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. तसेच ओबीसी आरक्षणाला कोण हात लावतो ते पाहू, असं विजय वड्डेट्टीवार यांनी सांगितले.  मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती देण्यात आ...

सर्वात मोठी बातमी: कोरोना महामारी लवकरचं संपेल, WHO ने दिला मोठा दिलासा

इमेज
कोरोना महामारी संपेल हे स्वप्न जगाने पाहण्यास हरकत नाही, WHO ने दिला मोठा दिलासा, कोरोना व्हायरसवर जगभरात संशोधन सुरू असून लसीच्या चाचणीबाबत सकारात्मक माहिती समोर येत आहे. प्रतिनिधि -महेश गडदे. कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल सहा कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना व्हायरसवर जगभरात संशोधन सुरू असून लसीच्या चाचणीबाबत सकारात्मक माहिती समोर येत आहे. याचदरम्यान जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस एडनॉम गेब्रियेसस यांनी कोरोनासंदर्भात मोठं विधान केलं आहे. कोरोना महामारी संपेल हे स्वप्न जगाने पाहण्यास हरकत नाही असं विधान जागतिक आरोग्य संघटनेचे टेड्रोस एडनॉम गेब्रियेसस यांनी केलं आहे. यामुळे सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक देशांमध्ये लसींवर काम सुरू आहे. काही ठिकाणी कोरोना लस ही तिसऱ्या टप्प्यात आहे. त्यांचे परिणाम पाहिले त...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सर्वात मोटी घोषणा

इमेज
 येत्या १ मेपर्यंत समृद्धी महामार्गावरुन नागपूर ते शिर्डी प्रवास सुरू होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. प्रतिनिधि -महेश गडदे. समृद्धी महामार्गाच्या कामाचं मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा महामार्ग होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा येत्या १ मेपर्यंत नागपूर-शिर्डी प्रवास समृद्धी महामार्गावरुन सुरू होणार अमरावती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या १ मेपर्यंत समृद्धी महामार्गावरुन नागपूर ते शिर्डी प्रवास सुरू होईल, अशी मोठी घोषणा केली आहे. समृद्धी महामार्गाचं काम पूर्ण होईल तेव्हा तो सर्वोत्तम महामार्ग असेल, निश्चितच महाराष्ट्राला याचा अभिमान वाटेल, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी महामार्गाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केलं.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. "आज पहिल्यांदाच मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे महामार्ग प्रकल्पा...

काँग्रेसचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना सूचक इशारा

इमेज
 " सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल तर..."; काँग्रेसचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना सूचक इशारा महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांच्या ट्विटमुळे काँग्रेसची नाराजी उघड झाली आहे.  प्रतिनिधि- महेश गडदे. राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्षाची नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण असल्याची चर्चा होती. पण आता महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांच्या ट्विटमुळे काँग्रेसची नाराजी उघड झाली आहे.  "आघाडीमधील नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आल्या आहेत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून मला महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं. आघाडी धर्माचं पालन करावं", असं ट्विट करत यशोमती ठाकूर यांनी सूचक इशारा दिला आहे.  काँग्रेस नेतृत्वाची पाठराखण करणारं आणखी एक ट्विट त्यांनी केलंय. ...

पुण्यात भाजपाच्या गडाला २० वर्षांनी खिंडार; राष्ट्रवादीचे अरुण लाड विजयी

इमेज
  पुण्यात भाजपाच्या गडाला २० वर्षांनी खिंडार; राष्ट्रवादीचे अरुण लाड विजयी. पुणे, नागपूर हे दोन्ही भाजपाचे बालेकिल्ले समजले जातात. यामध्येच महाविकास आघाडीने भाजपाला जोरदार धक्का देत दोन्ही मतदारसंघ काबिज केले आहेत. पुणे ;प्रतिनिधी- महेश गडदे.  यंदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी लढत पुणे पदवीधर मतदार संघात पहायला मिळाली. नेहमी भाजपाला साथ देणाऱ्या पुणेकर मतदारांनी यंदा राष्ट्रवादीच्या पारड्यात मते टाकून भाजपाच्या गडाला मोठे खिंडार पाडले आहे.  पुणे पदवीधर मतदार संघात पहिल्याच पसंती क्रमांकाची तब्बल 1 लाख 22 हजार 145 मते घेऊन , महा विकास आघाडीचे अरुण गणपती लाड विजयी झाले आहेत. त्यांनी 48 हजार 824 मतांनी बीजेपीचे संग्राम देशमुख यांचा  पराभव केला आहे. देशमुख यांना 73 हजार 321 मते मिळाली.        पदवीधर करिता २ लाख 47 हजार 50 इतके मतदान झले होते. एकूण मतदानाच्या तुलनेत ही टक्केवारी 57. 96 टक्के इतकी होती. गुरूवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली. मतमोजणीत यापैकी 2 लाख 28 हजार 272 हे वैध मतदान ठरले. त्यामुळे विजयी उमेदवारास 1 ...

पुणे शिक्षक मतदार संघात काँग्रेसला विजयाची प्रतिक्षाच; दुसऱ्या मतमोजणी सुरु

इमेज
  पुणे शिक्षक मतदार संघात काँग्रेसला विजयाची प्रतिक्षाच; दुसऱ्या  मतमोजणी सुरु  December4, 2020 09:45 AM प्रतिनिधि- महेश गडदे. जयंत आसगावकर यांना पहिल्या फेरीत १६ हजार ८७४ मते पण विजयासाठी आवश्यक आकडा अद्याप प्राप्त नाही पुणे शिक्षक मतदार संघात काँग्रेसला विजयाची प्रतिक्षाच; दुसऱ्या पसंतीची मतमोजणी स प पुणे शिक्षक मतदार संघात पहिल्या पसंती क्रमांकाची सर्वाधिक मते पडलेल्या, महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर यांना १६ हजार ८७४ मते पडली आहेत. मात्र विजयी आकडा गाठण्यासाठी आसगावकर यांना बरीच वाट पाहावी लागत आहे.         पहिल्या पसंती क्रमांकात सर्वाधिक मते मिळालेल्या आसगावकर यांना विजयासाठी 24 हजार 114 मतांची आवश्यकता आहे. मात्र मोजणीचे 'एलेमिनेशन' चे 19 फेऱ्या झाल्या तरी अपेक्षित मतसंख्या गाठता आलेली नाही. शुक्रवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पार पडलेल्या 19 फेऱ्याअखेर आसगावकर यांना 17 हजार 400 मते पडली आहेत. तर जितेंद्र पवार यांना ५ हजार 947 मते मिळाली आहेत. तर विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांना 11 हजार 288 मते मिळाली आहेत.  पुणे विभागात पदवीधर पेक...

अर्णब गोस्वामी विरुद्ध अनिल देशमुख; जाणून घ्या नेमकं प्रकरण?

इमेज
  अर्णब गोस्वामी विरुद्ध अनिल देशमुख; जाणून घ्या नेमकं प्रकरण ? अर्णब गोस्वामींच्या वकिलांनी जामिनासाठी केलेले दोन अर्ज पुन्हा न्यायालयासमोर ठेवले आहेत.                   प्रतिनिधि- महेश गडदे. येत्या दहा तारखेला राज्यातल्या जनतेला पुन्हा एकदा कोर्ट ड्रामा पाहायला मिळणार आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर सुनावणी आहे. दरम्यान, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या भूमिकेवर ताशेरे तसेच उच्च न्यायालयाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केल्यानंतर पुन्हा ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे कोर्टरूममध्ये आणखी एक कलगीतुरा पाहायला मिळणार आहे. या सुनावणीच्या आधी अर्णब गोस्वामींच्या वकिलांनी न्यायालयात काही ताजे पुरावे सादर केले आहेत. यात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत. देशमुख यांनी पूर्वग्रदूषित आणि राजकीय हेतूनी प्रेरित कारवाई केल्याचा आरोप गोस्वामींच्या वकिलांनी केली आहे.  या प्रकरणात अर्णब गोस्वामींना महाराष्ट्र सरकारने मे २०२० पासून ते नोव्हेंबर २०२० पर्यंत क...

मोदी सरकारच्या कृषी कायद्याबाबत शरद पवारांचं मोठं विधान; सरसकट विरोध नाही, पण...

इमेज
मोदी सरकारच्या कृषी कायद्याबाबत शरद पवारांचं मोठं विधान; सरसकट विरोध नाही, पण... प्रतिनिधि -महेश गडदे गेल्या सात दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मुंबई : गेल्या सात दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. दरम्यान, या आंदोलनाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले. यावेळी, केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना आमचा सरसरकट विरोध नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या मालाला किंमत शंभर टक्के मिळाली पाहिजे. यासंबंधीचे बंधन असले पाहिजे. नव्या कायद्यात या सक्तीचा अभाव आहे. त्याबाबत साधारण उत्तर भारतातील पंजाब शेतकऱ्यांच्या तीव्र भावना आहेत, असे शरद पवार यांनी सांगितले. शरद पवार यांचा १२ डिसेंबरला वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. यावेळी विजय दर्डा यांनी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याला काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध...

बारामती तालुका पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी, 8 मोटार सायकली केल्या हस्तगत

इमेज
  बारामती तालुका पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी,मोटार सायकल चोरी करणारा केला गजाआड, 8 मोटार सायकली केल्या हस्तगत गुन्हे उघडकीस आणण्याची जबाबदारी गुन्हेषोध पथकाला दिली होती मागील काही महिन्यापासून बारामती तालुुका पोलीस ठाणे हददीतून मोटार सायकल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. पोलीस निरीक्षक महेष ढवाण यांनी मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याची जबाबदारी गुन्हेषोध पथकाला दिली होती. त्याप्रमाणे सपोनि लंगुटे व पथकाने गोपनीय माहिती काढून संषयीत इसम ज्ञानेष्वर बापू चव्हाण वय ,राहणार.शेरे शिंदेवाडी ,ता.फलटण.जि.सातारा याला ताब्यात घेवून त्यांच्याकडे कसून चैकषी करून त्याच्याकडून बारामती तालुका पोलीस ठाणे,फलटण ग्रामिण पोलीस ठाणे हददीतुन चोरी केलेल्या पल्सर, युनिकाॅर्न, अपाईची ,स्पलेंडर अषा 8 मोटार सायकली (किंमत अंदोज 5,10,000रूपये ) हस्तगत केलेल्या असून बारामती तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र 605/2020भादवि कलम 379, गुन्हा रजि.क्र 678/20 भादवि कलम 379, गुन्हा रजि.क्र 389/17 भादवि कलम 379 हे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. ज्ञानेष्वर बापू चव्हाण हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्यावर यापुर्वी दरोड...

मराठी पत्रकार परिषदेच्या 82 व्या वर्धापननिमित्त जंक्शन येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर.

इमेज
  मराठी पत्रकार परिषदेच्या 82 व्या वर्धापननिमित्त जंक्शन येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर. पत्रकार व त्यांच्या कुंटूबाची मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन  इंदापुर (दि),प्रतिनिधि -महेश गडदे. मोफत आरोग्य तपासणी शिबिर. मराठी पत्रकार परिषदेच्या 82 व्या वर्धापननिमित्त जंक्शन येथे इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने श्री निलकंठेश्‍वर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने गुरुवार (ता.०३) रोजी सकाळी ९ वाजता पत्रकार व त्यांच्या कुंटूबाची मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घघाटन  माेहोळेचे आमदार मा.श्री.यशवंत माने व पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मा. श्री. प्रवीण माने व वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. दिलीप पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असून.  निलकंठेश्‍वर हॉस्पिटमधील तज्ज्ञ डॉ.सचिन घोरपडे, डॉ.योगेश पाटील, डॉ.अतुल बोरोडे, डॉ.केशव जायभाय, डॉ.रणजित कदम, डॉ.गणेश पानसरे हे पत्रकार व त्यांच्या कुंटूबाची मोफत तपासणी करणार असून इंदापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांनी उपस्थित राहावे ही विनंती. मोफत तपासणीच्या चाचण्या... ईसीजी, ह...

बारामतीचे सिंघम पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे साहेब चर्चेत

इमेज
बारामतीचे सिंघम पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे साहेब चर्चेत , आई_वडिलांचा_आशिर्वाद_देत_आहे_लढण्यासाठी_बळ आली रे आली ,आता तुझी बारी आली ' बारामती दि,प्रतिनिधि -महेश गडदे, तुम्ही सिंघम चित्रपट पाहिला असेलच आणि त्यातील डायलॉग ‘आली रे आली ,आता तुझी बारी आली ‘ ऐकला असेल मात्र हे काल्पनिक दृश्य तुम्हांला जर सत्यात पाहायचे असेल तर ठिकाण बारामती शहर पोलीस स्टेशन तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश करताच तुम्हाला ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद वाक्य दिसते तुम्ही आजवर अनेक पोलीस स्टेशनची कोणत्या ना कोणत्या कारणाने पायरी चढला असाल मात्र पोलीस स्टेशनच्या आवारात गेल्यावर सामान्य माणसाला धडकी भरते आत मध्ये नक्की काय होणार याविषयीच्या धास्तीने हृदयाचे ठोके वाढू लागतात मात्र बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही गेल्यावर पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये खुर्ची च्या पाठीमागे लावलेली पाटी तुम्हाला दिसेल ‘ येथे लाच स्वीकारली जात नाही ‘ सामान्य माणूस ठाणे अंमलदार आहे तिथे गेल्यावर शोषितांना कोणत्याही प्रकारची दमदाटी न करता त्याची तक्रार ,अडचण, प्रश्न समजून घेतला जातो ही किमया आहे बारामती शहर पोलीस स्टेशनच...