KPNews Channel च्या वतीने ऑनलाईन राज्यस्तरीय डान्स स्पर्धा

 KPNews Channel च्या वतीने ऑनलाईन राज्यस्तरीय डान्स स्पर्धा.



प्रतिनिधि महेश गडदे.

खोपोली (जि.रायगड) / धनंजय अमृते :- फार्मसी कृती समिती सातारा जिल्हा युवती विभाग व रेड फिल्म प्रोडक्शन यांच्या सहकार्याने KPNews Channel च्या वतीने ऑनलाईन राज्यस्तरीय डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 

याबाबत स्पर्धेच्या संयोजक राजश्री दळवी म्हणाल्या की, महाराष्ट्रातील तरूण-तरुणींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी 'KPNews Channel' च्या वतीने ऑनलाईन राज्यस्तरीय डान्स (Dance) स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रथम तीन क्रमाकांना रोख बक्षीस, ट्राफी, प्रमाणपत्र व दोन प्रेक्षक पसंतीवर बक्षीसे देण्यात येतील. तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र व गिफ्ट देण्यात येईल.

या स्पर्धेतील प्रथम विजेत्याला १० रुपये हजार, द्वितीय विजेत्याला ५ रुपये हजार, तृतीय विजेत्याला ३ हजार रूपये बक्षीस देण्यात येईल. तसेच इंस्टाग्राम जास्त व्ह्यूजला १ रुपये व यूट्यूब जास्त व्ह्यूजला १ हजार रूपये प्रेक्षक पसंतीचे बक्षीस देण्यात येणार आहे. दळवी पुढे म्हणाल्या की, आपल्या डान्सचा व्हिडीओ बनवून आम्हाला व्हॉट्स अप, टेलिग्राफ किंवा ईमेलच्या माध्यमातून पाठवायचा आहे. सदर व्हिडीओ KPNews युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुकवर अपलोड केला जाईल. व्हिडीओ २१ डिसेंबर २०२० ते २७  डिसेंबर २०२० पर्यंत पाठवावा. व्हिडीओ २१ डिसेंबर ते १० जानेवारी २०२१ पर्यंत शेअर केले जातील. व्ह्यूज तसेच जज यांचे मार्कस पकडून विजेते घोषित केले जातील. मात्र Instagram वर सर्वाधिक व्ह्यूज आणि YouTube वर जास्त likes मिळणाऱ्याला प्रेक्षक पसंतीचे  प्रत्येकी १ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. 

बक्षीस वितरण  १० जानेवारी २०२१ ला होईल. या स्पर्धेसाठी प्रवेश फी २०० रुपये असून अधिक माहितीसाठी ७७३८६९६९३२ व ८४५४८८६८५३ असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.