काँग्रेसचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना सूचक इशारा

 "सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल तर..."; काँग्रेसचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना सूचक इशारा



महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांच्या ट्विटमुळे काँग्रेसची नाराजी उघड झाली आहे. 

प्रतिनिधि- महेश गडदे.

राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्षाची नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण असल्याची चर्चा होती. पण आता महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांच्या ट्विटमुळे काँग्रेसची नाराजी उघड झाली आहे. 

"आघाडीमधील नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आल्या आहेत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून मला महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं. आघाडी धर्माचं पालन करावं", असं ट्विट करत यशोमती ठाकूर यांनी सूचक इशारा दिला आहे. 

काँग्रेस नेतृत्वाची पाठराखण करणारं आणखी एक ट्विट त्यांनी केलंय. "काँग्रेसचं नेतृत्व अतिशय स्थिर आहे. निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे", असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. 

शरद पवार यांनी केली होती राहुल गांधींवर टीका

'लोकमत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत शरद पवार यांना काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीबाबत काय वाटतं? असं विचारलं असता अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं होतं. यात त्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाबाबतही विधान केलं. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सातत्याचा अभाव दिसतो, असं शरद पवार म्हणाले होते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.