शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबरला 'भारत बंद'ची हाक दिली आहे
शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबरला 'भारत बंद'ची हाक दिली आहे.
५१ ट्रान्सपोर्ट युनियन्सनी ८ डिसेंबरला शेतकऱ्यांच्या 'भारत बंद'ला समर्थन दिले आहे.
प्रतिनिधि -महेश गडदे.
गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्यान नव्याकृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरीदिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याबाबत सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही, हे चित्र असल्याने शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबरला 'भारत बंद'ची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या या 'भारत बंद'ला इंडियन टूरिस्ट ट्रान्सपोर्टर्स असोसिएशन आणि दिल्ली गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनने पाठिंबा दर्शविला आहे. ५१ ट्रान्सपोर्ट युनियन्सनी ८ डिसेंबरला शेतकऱ्यांच्या 'भारत बंद'ला समर्थन दिले आहे.
भारत बंदला १० ट्रेड युनियन्सचा पाठिंबा
ट्रान्सपोर्ट युनियन्सच्या आधी दहा ट्रेड युनियन्सने शेतकऱ्यांच्या 'भारत बंद'ला पाठिंबा दर्शविला आहे.
शेती आणि ट्रान्सपोर्ट एका बापाची दोन मुलं
आयटीटीएचे अध्यक्ष सतीश शेरावत म्हणाले, "५१ युनियन्सनी शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. शेती आणि ट्रान्सपोर्ट हे एका बापाची दोन मुले असल्यासारखे आहे.
काँग्रेस, तृणमूल आणि 'टीआरएस'कडून पाठिंबा; मोदी सरकारची कोंडी
नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या ८ डिसेंबर रोजीच्या 'भारत बंद'ला काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) या पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे मोदी सरकारसमोर आता मोठी कोंडी निर्माण झाली आहे.
शेतकरी आंदोलनात पोहोचला बॉक्सर विजेंदर सिंग; खेलरत्न पुरस्कार परत करण्याचा इशारा
सिंधू सीमेवर आज बॉक्सर विजेंदर सिंग देखील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी पोहोचला आहे. यावेळी, "शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि कृषी क्षेत्रातील हे काळे कायदे रद्द झाले नाहीत. तर मी मला देण्यात आलेला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार परत करणार आहे", असा इशारा विजेंदर सिंगने दिला आहे. खेलरत्न पुरस्कार हा देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा