बारामतीचे सिंघम पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे साहेब चर्चेत


बारामतीचे सिंघम पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे साहेब चर्चेत ,



आई_वडिलांचा_आशिर्वाद_देत_आहे_लढण्यासाठी_बळ

आली रे आली ,आता तुझी बारी आली '

बारामती दि,प्रतिनिधि -महेश गडदे,

तुम्ही सिंघम चित्रपट पाहिला असेलच आणि त्यातील डायलॉग ‘आली रे आली ,आता तुझी बारी आली ‘ ऐकला असेल मात्र हे काल्पनिक दृश्य तुम्हांला जर सत्यात पाहायचे असेल तर ठिकाण बारामती शहर पोलीस स्टेशन तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश करताच तुम्हाला ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद वाक्य दिसते तुम्ही आजवर अनेक पोलीस स्टेशनची कोणत्या ना कोणत्या कारणाने पायरी चढला असाल मात्र पोलीस स्टेशनच्या आवारात गेल्यावर सामान्य माणसाला धडकी भरते आत मध्ये नक्की काय होणार याविषयीच्या धास्तीने हृदयाचे ठोके वाढू लागतात मात्र बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही गेल्यावर पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये खुर्ची च्या पाठीमागे लावलेली पाटी तुम्हाला दिसेल ‘ येथे लाच स्वीकारली जात नाही ‘ सामान्य माणूस ठाणे अंमलदार आहे तिथे गेल्यावर शोषितांना कोणत्याही प्रकारची दमदाटी न करता त्याची तक्रार ,अडचण, प्रश्न समजून घेतला जातो ही किमया आहे बारामती शहर पोलीस स्टेशनचे नव्याने रुजू झालेले बारामतीचे सिंघम पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांची

कामासाठी पैसे घेऊ नका।

नामदेव शिंदे यांनी आपले कामकाज सुरू करतानाच सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना विश्वासात घेत कोणत्याही नागरिकाकडून आपण पैसे घेऊ नयेत,आपण जनतेचे सेवक असून आपण जनतेची कामे करावीत असे आवाहन त्यांनी पोलिस बांधवांना केले आणि त्या पद्धतीने कार्यवाही सुरू झाली.

अवैध धंदेवाल्यांना बसली जराब।

नामदेव शिंदे यांनी सूत्रे हातात घेतल्यानंतर हद्दीमध्ये ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरू आहे तेथील नागरिकांना विश्वासात घेऊन व अवैध धंदेवाल्यांना यापुढे अशी कृत्य चालणार नाहीत असा सज्जड दम भरल्यामुळे अनेक अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले असून यापुढे कोणत्याही प्रकारचे अवैधंदे हद्दीत खपवून घेतले जाणार नाही असे ठणकावून सांगितले.

अतिक्रमणावर होणार कारवाई

नगरपरिषदेचा अतिक्रमण विभाग यांच्या सहकार्याने बारामतीत अतिक्रमणामुळे होणारी वाहतूक कोंडी यावरही विशेष लक्ष देणार असल्याचे समजते त्यामुळे बारामती येथील रस्ते आता मोकळा श्वास घेणार हे नक्की.

शहर पोलीस स्टेशनच्या आवारात गुन्ह्यातील मुद्देमाल, चोरीची वाहने, अपघातग्रस्त वाहने यांचा खच पडलेला होता तिथेही शिंदे यांनी लक्ष देऊन स्वच्छता व नीटनेटकेपणा करून सर्व वाहने व्यवस्थित रित्या ठेवले.

शहर भयमुक्त

बारामती शहरात खासगी सावकारी करणा-यांवर कारवाई झाली त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात पोलिसांविषयी आदरभाव निर्माण झाला आहे व गुंडगिरी करणाऱ्या गुन्हेगारांना चांगलीच धडकी भरली आहे पीआय शिंदे यांनी दिवाळीच्या लक्ष्मीपूजनदिवशी होणाऱ्या चोऱ्याना प्रतिबंध घालण्यासाठी एक माहितीपत्रक काढुन लक्ष्मीपूजन या दिवशी नागरिकांनी घ्यावयाची काळजी याविषयी माहितीपत्रक वाटली त्यामुळे शहराची वाटचाल भयमुक्त वातावरणा कडे चालू असल्याचे सामान्य माणसांमध्ये बोलले जात आहे नागरिकांबरोबरच पोलीस दलातही परस्पर सहकार्य सामंजस्याचे वातावरण असून अशाच अधिकाऱ्याची बारामतीला गरज होती पोलिस कर्मचारीही पीआय नामदेव शिंदे यांचे खासगीत कौतुक करत आहेत..

या सर्व गोष्टी आई वडिलांचा आशीर्वाद आणि सहकारी अंमलदार यांच्या प्रेमामुळे शक्य असल्याचे ते सांगतात.

नूतन पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी कार्यभार हाती घेतल्यानंतर पोलिस ठाण्याचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुखी व्हावी या दृष्टीकोनातून बरेचसे बदल केले. पोलिस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना विश्वासाचे वातावरण मिळावे व पोलिस आपल्या मदतीसाठी आहेत, ही भावना त्यांच्या मनात निर्माण व्हावी या उद्देशाने शिंदे यांनी आपल्या केबिनमध्ये अशी पाटीच लावली आहे.

इतर पोलिस ठाण्यांमधील पोलिसांच्या सुरस कहाण्या कानावर असताना बारामतीत मात्र आता पोलिस ठाण्यातील कामे विनामूल्य होतात, हा संदेश थेटपणे लोकांपर्यंत देत पोलिस निरिक्षकांनी एक प्रकारे आपल्या समवेत काम करणाऱ्या सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही हा संदेशच दिल्याचे मानले जात आहे.

या आधी नामदेवराव शिंदे यांनी मुंबई येथे उल्लेखनीय काम केले असून या आधी ते जयसिंगपूर इचलकरंजी च्या हुपरी पोलीस ठाण्याचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक या पदावर होते तिथून त्यांची बदली मुंबईला झाली मात्र तेथील सामान्य लोकांनी त्यांच्या बदलीला कडाडून विरोध केला,रास्ता रोकोसह प्रचंड मोठं आंदोलन उभं राहील ! यातून तुम्हाला समजलं असलं कि या व्यक्तीचं तिथलं काम किती मोठं असेल...जिथे बदली झाल्यावर जनता रस्त्यावर उतरते,बदलीला विरोध करते 

अशा धडाकेबाज कामगिरी बजावणारा व्यक्ती बारामतीच्या पोलीस निरीक्षक पदावर आज विराजमान झाला आहे. बारामतीकरांचं भाग्यच म्हणावं लागेल ! 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांना सुद्धा कामात चुकराई केलेले पोलीस अजिबात आवडत नाहीत. जिथे चूक असेल त्यावर फक्त कारवाईच नव्हे तर जेलची हवा खाऊ घालाच पण कायद्याने असा धडा शिकवा कि परत त्याची कोणताही गुन्हा करायची हिम्मत होता कामा नये,चूक करेल गुन्हा करेल त्याला शिक्षा द्या.. माझ्या बारामतीत कोणी माझ्यानावाचा वापर तसेच पोलिसांकडे करत असेल तर अजिबात खपवून घेऊ नका..माझ्या जवळचा व्यक्ती असला तरी त्यावर कायद्याने कठोर कारवाई करा  असा सल्लाही अजितदादा पोलीस दलाला कायम देत असतात ! तेव्हा अजितदादांना जे खमके अधिकारी पाहिजे होते ते धडाकेबाज कामगिरी आणि कामातून सिंघम अधिकारी बनलेले बारामतीचे पीआय नामदेव शिंदे .... 

बारामतीची कायदा सुव्यवस्था आणि गुन्हेगारांना कायमची अद्दल घडवून एक प्रामाणिक पोलीस अधिकारी काय असतो ते दाखवून देतील अशी सर्व बारामतीकर नागरिकांची अपेक्षा तर आहेच पण 

 पोलिस ठाण्यात दलाली करणाऱ्यांनाही हा संदेश जावा अशी पोलिस निरिक्षकांची अपेक्षा असून भयमुक्त वातावरण या शहरात निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बारामतीत सावकारीच्या विरोधात त्यांनी उघडलेल्या मोहिमेला यश येत असून अनेक सावकारांनी आता आपली भूमिकाच बदलली आहे. दुसरीकडे ज्याची ओळख नाही, अशा माणसाचेही काम पोलिस ठाण्यात व्हायला हवे ही आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पैशांची मागणी केल्यास तक्रार करा....!

नागरिकांना पोलिस मित्र वाटावा, पोलिसांची अडचणीच्या काळात हक्काने मदत घ्यावी व कायदा आणि सुव्यवस्था राखताना पोलिसांना नागरिकांनी मदतही करावी, असाच हेतू आहे. कोणत्याही नागरिकाकडून कोणत्याही पोलिसाने पैशांची मागणी केल्यास थेट तक्रार करावी.

कोणावरती अन्याय अत्याचार झाला तर शांत न बसता थेट मला  संपर्क करा.तक्रार करा..

अत्याचार करणाऱ्याला फक्त जेलच नव्हे तर कायद्याची अद्दल काय असते ते दाखवतो ...

रोडरोमियोंचा, गावगुंडांचा , गोरगरिबांवर अन्याय करणारे गावपुढारी यांचाका यमचा बंदोबस्त कसा करायचा तेही पोलीस खाक्या काय असतो ते दाखवून देऊ !

मी आपल्या सेवेसाठी रात्रंदिवस हजर आहे कधीही कोणतीही अडचण आली तर संपर्क करा।

नामदेवराव शिंदे पोलीस निरीक्षक, बारामती शहर पोलीस स्टेशन 

अशा धडाकेबाज कामगिरी बजावणारा व्यक्ती बारामतीच्या पोलीस निरीक्षक पदावर विराजमान झाले आहेत. 

अशा या रील नव्हे तर रिअल सिंघम पोलीस अधिकाऱ्याला एक कडक सॅल्यूट ,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.