इंदापूर;बाबीर यात्रेनंतर मंदिर परिसरातील स्वच्छता करण्यासाठी सरसावले तरुण.सर्वांनी सहभाग घ्यावा;तानाजी मारकड.

इंदापूर;बाबीर यात्रेनंतर मंदिर परिसर स्वच्छ करण्यासाठी सरसावले तरुण.सर्वांनी सहभाग घ्यावा;तानाजी मारकड. इंदापूर- प्रतिनिधी; महेश गडदे. जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तानाजी मारकड यांनी आवाहन केल्यानंतर सालाबादप्रमाणे श्री क्षेत्र बाबीर देवाची यात्रा झाल्यानंतर परिसरातील स्वच्छता करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला,व परिसर स्वच्छ करण्यासाठी सुरूवात केली, यामध्ये वैभव पाटील अध्यक्ष बाबीरदेव शेतकरी मंडळ, यांच्या संकल्पनेतून नारळाच्या शेंड्या व ऊसाच्या चुया यापासून कंपोस्ट खत निर्मिती करून ते कंपोस्ट खत बाबीरनगरी ऑक्सीजन पार्क मधील सर्व झाडांना देण्यात येणार आहे, तशा प्रकारचे नियोजन यावर्षी केले आहे, हा नाविन्यपूर्ण उपक्रम बाबीरदेव शेतकरी मंडळाचे अध्यक्ष वैभव पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू केला आहे, परिसरातील नारळाच्या शेंड्या, ऊसाच्या चुया एकत्र करून खड्ड्यामध्ये टाकल्या आहेत, त्यावर कंपोस्ट खताची प्रक्रिया केली जाणार आहे, यावेळी 'जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे सरचिटणीस अविनाश मोहिते,महिपती मोहीते,अंकुश पाटील शाखाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष रूई, आण्णा मारकड,सौरभ माने,यानी स्वच...