इंदापूर;बाबीर यात्रेनंतर मंदिर परिसरातील स्वच्छता करण्यासाठी सरसावले तरुण.सर्वांनी सहभाग घ्यावा;तानाजी मारकड.

इंदापूर;बाबीर यात्रेनंतर मंदिर परिसर स्वच्छ करण्यासाठी सरसावले तरुण.सर्वांनी सहभाग घ्यावा;तानाजी मारकड.


इंदापूर- प्रतिनिधी; महेश गडदे.

जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तानाजी मारकड यांनी आवाहन केल्यानंतर  सालाबादप्रमाणे श्री क्षेत्र बाबीर देवाची यात्रा झाल्यानंतर परिसरातील स्वच्छता करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला,व परिसर स्वच्छ करण्यासाठी सुरूवात केली, यामध्ये वैभव पाटील अध्यक्ष बाबीरदेव शेतकरी मंडळ, यांच्या संकल्पनेतून नारळाच्या शेंड्या व ऊसाच्या चुया यापासून कंपोस्ट खत निर्मिती करून ते कंपोस्ट खत बाबीरनगरी ऑक्सीजन पार्क मधील सर्व झाडांना देण्यात येणार आहे, तशा प्रकारचे नियोजन यावर्षी केले आहे, हा नाविन्यपूर्ण उपक्रम बाबीरदेव शेतकरी मंडळाचे अध्यक्ष वैभव पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू केला आहे, परिसरातील नारळाच्या शेंड्या, ऊसाच्या चुया एकत्र करून खड्ड्यामध्ये टाकल्या आहेत, त्यावर कंपोस्ट खताची प्रक्रिया केली जाणार आहे,

यावेळी 'जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे सरचिटणीस अविनाश मोहिते,महिपती मोहीते,अंकुश पाटील शाखाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष रूई, आण्णा मारकड,सौरभ माने,यानी स्वच्छता करण्यासाठी  सक्रिय सहभाग घेतला होता, यशवंत तात्या मारकड यांनी ट्रॅक्टर व डम्पिंग ची व्यवस्था केली होती,यावेळी 'सरपंच यशवंतराव कचरे, रूई सोसा व्हा चेअरमन उदयसिंह पाटील, भाजपा ओबीसी मोर्चाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष आबासाहेब थोरात, स्वच्छतेचे अग्रदूत जनार्दन पांढरमिसे यांनी भेट देऊन स्वच्छतेला हातभार लावला असल्याचे तानाजी मारकड यांनी सांगितले, 


बाबीर देवाची पूजा करणारे भगत मंडळी यांनी मंदिर पाण्याने धुवून काढले व मंदिराच्या परिसरातील स्वच्छता केली .डिग्रस येथून बुवाजी दादा पुणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता करण्यासाठी टिम आली आहे, त्यांनीही मंदिर परिसर स्वच्छ करण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली आहे, सर्वांनी एकत्र टाकलेला कचरा ट्रॅक्टरने लांब टाकण्याचे काम तरूणांनी केले, तेथे नारळाच्या शेंड्या व ऊसाच्या चुया पासून कंपोस्ट खत निर्मितीचा प्रयोग करणार असल्याचे सांगितले आहे.

बाबीर देवाचे भगत मंडळी, बुवाजी दादा पुणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता दूत टिम,व आमच्या सारखे अनेक स्वच्छता दूत तयार होत आहेत ही अभिमानास्पद आहे, अशी माहिती जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी मारकड यांनी दिली,यामुळे बाबीर देवाचा मंदिर परिसर स्वच्छ राहील,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.