थोरातवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी वनविभागाच्या चिंकरा हरिण निवारा केंद्र व ऑक्सिजन पार्कला दिली भेट

विद्यार्थ्यांनी वनविभागाच्या चिंकरा हरिण निवारा केंद्र व ऑक्सिजन पार्कला दिली भेट .



इंदापूर प्रतिनिधी:महेश गडदे.


वन्यजीव सप्ताहानिमित्त शालेय परिसर भेटीचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थोरातवाडी यांच्या कडून करण्यात आले होते. इंदापूर येथील कडबनवाडी वन विभागाच्या चिंकरा हरिण निवारा केंद्र व ऑक्सिजन पार्क ला भेट देऊन विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. वनविभागाचे अधिकारी गणेश बागडे व त्यांचे सहकारी कर्मचारी यांनी थोरातवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना वनरक्षक- गणेश बागडे, यांनी सांगितले की, मानवाप्रमाणेच सर्व प्राणिमात्रांनाही जगण्याचा अधिकार आहे. तसेच या वनविभागात आढळून येत असलेली चिंकारा हरणे विद्यार्थ्यांना दाखवली. लांडगा, ससा, कोल्हा, खोकड अशा विविध प्राण्यांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तसेच विविध प्रकारचे पक्षीही वनविभागात आढळून येत असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी खंड्या पक्षी विद्यार्थ्यांनी पाहिला. तसेच सुगरणीचा खोपा सर्व विद्यार्थ्यांनी कौतुकाने पाहिला. यावेळी  

 शाळेचे मुख्याध्यापक -श्री. मोहन भगत सर व शिक्षक-श्री. शेंडे सर ,यांनी विद्यार्थ्यांना अन्नसाखळी, परिसंस्था तसेच मानव व प्राणी यांचे परस्परावलंबित्व याबद्दल माहिती दिली.


       त्यानंतर विद्यार्थ्यांनी वनभोजन केले. यावेळी वनविभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले. जंगलातील पाणवठे, वनतळे विद्यार्थ्यांनी पाहिले. सौर ऊर्जा वापरुन विद्युत निर्मितीसाठी आवश्यक सौर पॅनल विद्यार्थ्यांनी पाहिले. वन विभागातील विविध प्रकारची झाडे, झाडांपासून मिळणारे विविध फायदे याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.