इंदापुरात माणुसकीचे दर्शन,मतिमंद महिलेला पोचवले घरी: पोलीस व युवा क्रांती प्रतिष्ठानचा मोलाचा वाटा.

इंदापुरात  माणुसकीचे दर्शन,मतिमंद महिलेला पोचवले घरी: पोलीस व युवा क्रांती प्रतिष्ठानचा मोलाचा वाटा.

इंदापूर (दि.)प्रतिनिधी: महेश गडदे.

सका - सकाळी सतीश चौगुले चां फोन आला दादा बाबा चौकात अर्जंट या

म्हणाल मला जरा काम आहे मी दुसर कोणाला पाठवू का? तो म्हणाला नाही दादा तुम्हालाच यावं लागेल चांगल्या घरातील एक तरुण महिला काल पासून इथ बसलेय. कदाचित मनोरुग्ण असावी अंगावर सोन्याचे दागिने आहेत आणि कोणाला बोलत नाही कपडे अस्ताव्यस्त नेसलीय..

लवकर या..

लगेच आलो म्हणत बायको कडून एक शाल घेतली आणि पडत्या पावसात बाबा चौक गाठला..

पोलिस स्टेशन ला खंडागळे मॅडम

महिला दक्षता च्यां आमच्या सायरा भाभी आत्तार अनिता खरात आणि कल्पना ताई भोर यांना फोन वर कल्पना देवून मदतीला बोलावलं

आई काय करतेस पावसात थंडी वाजलं डास चावतील म्हणत जवळची शाल त्या माय माऊली ला लपेटली

जवळ जवळ तास भर कडी बोरिवली तर कधी धाराशिव चां पत्ता सांगायची ..

आणि हा माझा खोटा पत्ताय मी खरा सांगत नसते म्हणायची.

मी धरमचंद लोढा बाळासाहेब क्षीरसागर यांना बोलावून घेतलं बाळासाहेबांनी नारळ पाणी कुणी चहा रिक्षा वाल्यानी पाणी आणून दील.

इंदापूर पोलिस स्टेशन च्या मुजावर मॅडम ला बोलावून घेतलं सायरा भाभी आणि खरात मॅडम ही आल्या म्हणाल आता हीचा पत्ता कळेल

पण तिच्या कड ना मोबाईल ना कोणते कागद पत्र 3 तास गेले पण पत्ता व्यवस्थित सांगत नव्हती अथवा सांगता येत नव्हता

आणि ATM कार्ड ने कशी केली मदत.

सायरा भाभी नी गप्पा मारता मारता तिच्या कड ATM card स्टेट बँकेचं आहे हे कळालं.

आणि पुढ्यच काम सोपं झालं   इंदापूर पोलिस नी स्टेट बँकेतून अकाउंट डिटेल मागताच नाव मोबाईल नंबर मिळाला जो दिघी आळंदी येथील होता

अश्विनी शिवराम सुतार 

संपर्क करताच ते न्यायला येतो म्हणले

संध्याकाळी 5 वाजता त्या माय माऊलीचा भाऊ आणि नवऱ्याच्या ताब्यात इंदापूर पोलिस स्टेशन मध्ये नाना साहेब आटोळे  मुजावर मॅडम खंडागळे मॅडम  याच्या उपस्थितीत  देण्यात आले

बाबा चौकातील रिक्षावाल्यांनी केलं माणुसकीचं दर्शन.

परक्या गावात एक तरुण मनोरुग्ण महिला अंगावर दागिने घालून बसलेय हिला सुखरूप तिच्या कुटुंबात पोहाच कारण जरुरी आहे कारण ती पण कोणाची तरी आई मुलगी बायको कीवा बहीण असते .. आणि आपल्या इंदापूर मधे ती सुरक्षित आसावी तिला घरच्यांच्या ताब्यात देणं ही आपली जबाबदारी आहे हे कर्तव्य एका भावाच कर्तव्य पार पाडणाऱ्या या हात वरच्या पोस्ट असणाऱ्या माझ्या प्रामाणिक रिक्षा चालक बांधवांना सलाम.


युवा क्रांती प्रतिष्ठान च्या वतीने या HEROES OF THE DAY चां गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.