महादेव जानकरांच्या उपस्थितीत १२ ऑक्टोबरला रुई-बाबीर येथे विकास कामांचे उद्घाटन व रासपचा मेळावा संपन्न होणार.

   महादेव जानकरांच्या उपस्थितीत १२ ऑक्टोबरला रुई-बाबीर येथे विकास कामांचे उद्घाटन व रासपचा मेळावा संपन्न होणार.



इंदापूर/प्रतिनिधी: महेश गडदे.

       राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.महादेव जानकरांच्या उपस्थितीत १२ ऑक्टोबरला रुई-बाबीर येथे त्यांच्या स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याची टाकी व पाईप लाईनचा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते करण्यात येणार असून त्यानिमित्ताने इंदापूर तालुका रासपचा मेळावा रुई-बाबीर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत रासपचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते व मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

      राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.महादेव जानकरांच्या आमदार निधीतून रुई-बाबीर येथे बाबीर देवस्थानाला मोठ्या प्रमाणात भाविक येतात त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने पाईप लाईन व ३२००० लिटरची पाण्याची टाकी उभारण्यात आली असून त्याच्या लोकार्पणाचा सोहळा व रासपचा मेळावा रुई-बाबीर येथे संपन्न होणार आहे. इंदापूर तालुक्यामध्ये रासपला मानणारा वर्ग मोठया प्रमाणात असून बारामती लोकसभेला जानकरांना जनतेने देखील भरभरून प्रेम दिले आहे. 

बारामती लोकसभेत परिवर्तन घडवून निश्चित रासप लोकसभा जिंकू शकतो. बारामती जिंकायची ताकद फक्त आणि फक्त महादेव जानकर यांच्या मध्येच असून गेल्या महिन्यात बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बूथ कमिटीचा मेळावा राष्ट्रीय अध्यक्ष आ.महादेव जानकर यांच्या उपस्थित संपन्न झाला असून बारामती लोकसभेची रासपची संघटनात्मक तयारी पूर्ण झाली आहे. 

इंदापूर तालुक्यात रुई-बाबीर येथील मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही बारामती लोकसभा जिंकण्याचा एल्गार करण्याचा निर्धार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला असून राष्ट्रीय अध्यक्ष आ.महादेव जानकर यांच्या उपस्थित हा एल्गार मेळावा होणार असून हजारोंच्या संख्येने आपण उपस्थित रहावे असे आव्हान प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते व मुख्य महासचिव ज्ञानेश्वर यांनी केले. 

यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अजित पाटील, जिल्हाध्यक्ष किरण गोफणे, युवक जिल्हाध्यक्ष स्वप्निल मेमाने,रासप नेते सतीश तरंगे, तालुकाध्यक्ष तानाजी मारकड, तालुका संघटक तानाजी शिंगाडे, युवक तालुका अध्यक्ष आकाश पवार, शैलेश थोरात, अविनाश मोहिते, अतुल शिंगाडे, सोन्या जानकर, तसेच तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.