इंदापूर (रुई)बाबीर यात्रा पूर्व नियोजन बैठक प्रांतअधिकारी यांच्या उपस्थितीत झाली.

 इंदापूर (रुई)बाबीर यात्रा पूर्व नियोजन बैठक प्रांतअधिकारी यांच्या उपस्थितीत झाली.



इंदापूर (दि)प्रतिनिधी: महेश गडदे.


इंदापूर - रुई येथील तीर्थक्षेत्र श्री बाबीर बुवा देवाच्या यात्रेचे  पूर्वनियोजन बैठक प्रांतअधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली, महाराष्ट्रासह देशभरातून बाबीर देवाच्या यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांची गैर होऊ नये भाविकांना व्यवस्थितरित्या देवाचे दर्शन घडावे म्हणून पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत देवस्थान ट्रस्ट ,यात्रा कमिटीच्या माध्यमातून नियोजन करण्यात येणार आहे,बाबीर देवाच्या परिसरामध्ये स्वच्छ पाण्याचे नियोजन करण्याचे काम चालू आहे, विजेचे दिवे चालू करण्याचे काम सुरू आहे, भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आरोग्य प्रशासन पूर्ण तयारीला लागले आहे, ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देवाच्या मंदिराचा परिसर तसेच रस्त्याच्या कडेची साफसफाई करण्यचे काम चालू आहे. बाबीर देवाची यात्रा चांगली व्हावी यासाठी जे प्रयत्न करावे लागतील ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितले आहे.

यात्रेचे थोडक्यात आयोजन .

बाबीर यात्रा उत्सव बुधवार दिनांक 26 रोजी सकाळी सात वाजता रुई गावातून बाबीर देवाच्या पालखीचे प्रस्थान मंदिराकडे होणार असून पालखी सोहळा नऊ वाजेपर्यंत चालणार आहे , त्यानंतर थोरातवाडी येथून आलेले बाबीर देवाचे मानकरी थोरात यांच्या हातून बाबीर देवाचे घट उठणार असून त्यानंतर यात्रेला सुरुवात होणार आहे. बारा वाजेपर्यंत देवाचे घट उठवण्याचा कार्यक्रम होणार आहे.

गुरुवार दिनांक 27 रोजी बाबिर देवाच्या यात्रेचा मुख्यदिवस असणार आहे. अकरा ते पाच दरम्यान गजे-ढोल स्पर्धा होणार आहे, पाच वाजल्या नंतर बक्षीस वितरण होणार आहे.

शुक्रवार दिनांक 28 रोजी सकाळी सहा वाजता बाबीर देवाची भाकणूक होणार असून, साकाळी 9 ते 12 बगाड देण्याचा कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती बाबीर देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष अजितसिंह पाटील यांनी दिली.


बाबीर देवस्थान यात्रेच्या पूर्व नियोजनाची बैठक प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी बारामती डी वाय एस पी गणेश इंगळे, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक लातूरे , गट विकास अधिकारी विजयकुमार परीट, बाबर देवस्थानचे ट्रस्ट अध्यक्ष अजित सिंह पाटील ग्रामसेवक, जनार्दन पांढरमिसे, तानाजी मारकड, नाना थोरात, यशवंत कचरे, संतोष पांढरमिसे, आबासाहेब थोरात बाबीर देवाचे भगत व गावातील नागरिक या ठिकाणी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.