पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MBBS प्रवेश प्रक्रिया 2021-22 साठी ऑनलाइन मार्गदर्शन

इमेज
  MBBS प्रवेश प्रक्रिया 2021-22 साठी ऑनलाइन मार्गदर्शन प्रतिनिधी: महेश गडदे. पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक सेवा मंचाच्या वतीने एम .बी .बी. एस MBBS प्रवेश प्रक्रिया 2021-22 साठी ऑनलाइन मार्गदर्शन वेबिनार चे आयोजन दिनांक 28 ऑक्टोबर 2021 रोजी सायं. 6 वाजता करण्यात आले आहे. डॉक्टर होण्याचं स्वप्न असणाऱ्या परंतु नीट परीक्षेत अपेक्षित गुण मिळाले नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांनी निराश न होता या मेडिकल प्रवेश प्रक्रिये करीता आयोजित केलेल्या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.. भारतातील आणि परदेशातील नामांकित सरकारी व खाजगी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मोफत प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर नीरज कुमार शाह (आत्मिय एज्युकेशन, पुणे) हे ऑनलाइन वेबिनार च्या माध्यमातून करणार आहेत. एम.बी.बी.एस प्रवेश प्रक्रिये संदर्भात मोफत मार्गदर्शन मिळण्यासाठी नाव नोंदणी करा https://forms.gle/8sxPKoMT2tXVgdFX7... ऑनलाइन मार्गदर्शन कार्यक्रमाची लिंक कार्यक्रमा अगोदर पाठवण्यात येईल. अधिक माहितीसाठी संपर्क- श्रीम. सुप्रिया गेनबा आगवणे अध्यक्ष महिला आघाडी एकल शिक्षक सेवा मंच. शाखा-इंदापूर. मो नं-86699...

इंदापूर तालुका व शहर भारतीय बौद्ध महासभा यांचे वतीने गुणवंतांचा जाहीर सत्कार.

इमेज
  इंदापूर तालुका व शहर भारतीय बौद्ध महासभा यांचे वतीने गुणवंतांचा जाहीर सत्कार. प्रतिनिधी: महेश गडदे, येथील डाॅ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मध्ये दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि इंदापूर तालुका व शहर भारतीय बौद्ध महासभा यांचे वतीने गुणवंतांचा जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इंदापूर तालुका अध्यक्ष डाॅ.प्रा.जीवन सरवदे यांनी भूषविले.    सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले तर नगरसेविका राजश्री मखरे यांनी दिप प्रज्वलन केले.      विचारपिठावर डाॅ.प्रा.जीवन सरवदे, भारतीय बौद्ध महासभा माजी तालुकाध्यक्ष विलासदादा मखरे, माजी प्राचार्य शहाजी मिसाळ, माजी मुख्याध्यापक शिवाजी कांबळे, आरपीआय बारामती लोकसभा मतदार संघाचे कार्याध्यक्ष तथा भारतीय बौद्ध महासभा इंदापूर तालुका सांस्कृतिक विभाग प्रमुख बाळासाहेब सरवदे, नगरसेविका राजश्री मखरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.          दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा इंदापूर तालुका व शहर शाखेच्या वतीने गुणवं...

मा. अण्णासाहेब हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास तालुका कार्यकारणी जाहीर.

इमेज
मा.अण्णासाहेब हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास तालुका कार्यकारणी जाहीर . प्रतिनिधि:महेश गडदे.   दिनांक 19 10 2021रोजी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास इंदापूर तालुक्याची मासिक बैठक झाली सदर बैठकीला पुणे जिल्ह्याचे जिल्हा संघटक श्री शिवाजी खेडकर हे उपस्थित होते या बैठकीमध्ये तालुका कार्यकारणी व शहर कार्यकारिणीची निवड करण्यात आली , इंदापूर तालुका संघटक: श्री जनार्दन पांढरमिसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे .   त्यामध्ये इंदापूर तालुक्याचे सहसंघटक : शामराव केशव जाधव, कोषाध्यक्ष: अनिल चितळकर, सहकोषाध्यक्ष: दादासाहेब चव्हाण ,   सचिव: महेश ईश्वर मोहिते   तसेच सहसचिव:कविता केकान, याप्रमाणे तालुका कार्यकारणी निवडण्यात आली व इंदापूर शहर कार्यकारणी मध्ये शहर संघटक :प्रशांत शिताप, शहर सहसंघटक: लक्ष्मण नामदेव गडदे ,सचिव :श्री  दशरथ भोंग ,यांना देण्यात आले . या वेळी मार्गदर्शन  जिल्हा संघटक शिवाजी खेडकर यांनी केले त्या बैठकीला  सव्वीस कार्यकर्ते उपस्थित होते तालुक्यांमध्ये सर्वसामान्य नागरिकांपर्यंत व गरजू लोकांपर्यंत शासकीय योजना व शासकीय ...

पोलीस प्रशिक्षण केंद्र , नानवीज- दौंड येथे सत्र क्र . ४१ चा दिक्षांत संचलन समारंभ :श्री कृष्ण प्रकाश,पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांचे उपस्थितीत,

इमेज
पोलीस प्रशिक्षण केंद्र , नानवीज- दौंड येथे सत्र क्र . ४१ चा दिक्षांत संचलन समारंभ   पोलीस प्रशिक्षण केंद्र , नानवीज- दौंड येथे सत्र क्र . ४१ चा दिक्षांत संचलन समारंभ प्रमुख अतिथी श्री कृष्ण प्रकाश , पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांचे उपस्थितीत पार पडला.  प्रतिनिधि महेश गडदे, दिक्षांत संचलनाचे नेतृत्व प्रशिक्षणार्थी सौरभ कोलते यांनी केले . यावेळी प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य श्री . संदिप आटोळे यांनी या प्रशिक्षणाबाबतचे अहवाल वाचन करुन संस्थेच्या कामकाजाची माहिती दिली.  सदर संचलन समारंभास मा . श्री . तानाजी चिखले , समादेशक रा . रा . पोलीस बल गट क्र .०५ , दौंड , श्री . संग्राम डांगे , वैद्यकीय अधिक्षक , उपजिल्हा रुग्णालय , दौंड , मा . श्री . संजय गित्ते , शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम पुर्व विभाग पुणे , तसेच दौंड शहरातील शौर्य अॅकॅडमीचे छात्र , पत्रकार बांधव व पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. प्रमुख अतिथी यांनी सर्व यशस्वी प्रशिक्षणार्थीचे अभिनंदन केले . प्रशिक्षणार्थीचे दिमाखदार संचलन , पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज - दौंड येथे...

जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून शिक्षक समितीच्या वतीने टपाल विभागातील कर्मचाऱ्यांचा सन्मान.

इमेज
  जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून शिक्षक समितीच्या वतीने टपाल विभागातील कर्मचाऱ्यांचा सन्मान. प्रतिनिधी महेश गडदे , दि ९ इंटरनेट, सामाज माध्यमं यांच्या आधुनिक काळातही भारतीय टपाल विभागाने बदलत्या काळानुसार बदलत स्वतःचे अस्तित्व अधोरेखित केले आहे. कोणत्याही परिस्थितीत, ऋतूत अखंड सेवा देणाऱ्या आणि निष्ठेने आपले कर्तव्य बजावणाऱ्या टपाल विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना जागतिक टपाल दिनाचे औचित्य शिक्षक समिती इंदापूर शाखेच्या वतीने निमगाव केतकी येथील पोस्ट कार्यालयात अविरतपणे विनम्र , विश्वसनीय , तत्पर सेवा देणारे पोस्ट अधिकारी श्रीकांत लोखंडे , वरकुटे खु पोस्टमन नवनाथ मिसाळ , काटीचे दिपक सावंत , व्याहाळीचे विठ्ठल गुरव , निमगाव केतकीचे ओंकार डोईफोडे , गोतोंडीचे सचिन देवकर यांना मास्क , गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. प्रसंगी शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष भारत ननवरे यांनी पोस्टमनच्या तत्परतेमुळे मी शिक्षक पदी नोकरीस लागलो असे सांगितले. कोविड १९ काळातही अविरतपणे सेवा सुरु ठेवून सर्वसामान्य चांगली सेवा दिल्यामुळे सर्वाचे कौतुक करण्यात आले. प्रसंगी पुणे जिल्हा सोसा. माजी चेअरमन तथा संचालक अरू...

इंदापूर बालकांनसाठी मोफत ह्रदयरोग तपासणी शिबिर जास्तीत जास्त लाभ घ्यावा:हामा पाटील.

इमेज
इंदापूर बालकांनसाठी मोफत ह्रदयरोग तपासणी शिबिर जास्तीत जास्त लाभ घ्यावा:हामा पाटील. प्रतिनिधी: महेश गडदे,   दि . ९ ऑक्टोबर २०२१ रोजी उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विशेष प्रयत्नातून व श्रीमती कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल , मुंबई यांच्या सहकार्यातून ० ते १८ वयोगटातील बालकांसाठी भव्य मोफत हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक श्री डॉक्टर सुहास शेळके यांनी दिली .  डॉक्टर सुहास शेळके यांनी पुढे बोलताना असे सांगितले की , रुग्णांसाठी ही सुवर्णसंधी आहे . अशी संधी तालुक्यातील रुग्णासाठी बरेच दिवसांनी चालून आली आहे .  या संधीचा जास्तीत जास्त रुग्णांनी फायदा घ्यावा . अनेक तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न होणार आहे . या शिबिरासाठी डॉक्टर प्रशांत बोबाटे ( हृदय रोग तज्ञ ) , व डॉक्टर शगुफ्ता ( श्रवण विकार तज्ञ ) हे तपासणी करणार आहेत .   डॉक्टर शेळके यांनी असे सांगितले की , ज्यांचे वय ० ते १८ वर्ष आहे व ज्या रुग्णाच्या हृदयाला होल आहे असे रुग्ण , व ज्यांना कानाने ऐकू येत न...

एल जी बनसुडे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यी परशुराम शिंदे यांने SRPF लेखी चाचणी मध्ये १०० पैकी ९८ गुण मिळवले

इमेज
  एल जी बनसुडे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यी परशुराम शिंदे यांने SRPF लेखी चाच णी मध्ये १०० पैकी ९८ गुण मिळवले प्रतिनिधी महेश गडदे, गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल जी बनसुडे विद्यालयातील माजी विद्यार्थी परशुराम महादेव शिंदे याची राज्य राखीव पोलीस बल गट१पुणे SRPF मध्ये गट नंबर 1 मध्ये  निवड झाली आहे.  त्यालाSRPF च्या लेखी चाचणी मध्ये १०० पैकी  98 मार्क मिळून, SRPF गटांमध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे.  तरी त्याचे प्राचार्य सुरज बनसुडे व प्राचार्या वंदना बनसुडे व सर्व शिक्षकांच्या वतीने व संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. एल जी बनसुडे विद्यालयातील माजी विद्यार्थी परशुराम शिंदे.रा.रुई,थोरातवाडी. याचा विद्यालयाच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. सर्व शिक्षकांनी त्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचालित एल जी बनसुडे विद्यालयातील सर्व स्टाफ उपस्थित होते.

संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन च्या वतीने इंदापूर तालुक्यात भव्य रक्तदान शिबिर,

इमेज
  संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन च्या वतीने इंदापूर तालुक्यात भव्य रक्तदान शिबिर, दि:२.प्रतिनिधि महेश गडदे, संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन च्या वतीने इंदापूर तालुक्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन 2 ऑक्टोबर 2021 शनिवार रोजी दर्शन ट्रेडिंग कंपनी बारामती रोड इंदापूर येथे कोरोनाचे सर्व नियम पळून करण्यात आले यामध्ये इंदापूर ,पळसदेव ,नरसिंहापुर, अंथुर्णे,मदनवाडी,शेटफळगडे या ब्रँच मधून निरंकारी संतजन संमिलीत झाले होते सर्वांच्या प्रयत्नातून 72 ब्लड युनिट प्राप्त झाले रक्तदात्यांसाठी फलाहार, पाणीबोटल चे नियोजन केले होते तर गिफ्ट किट मध्ये अध्यात्मिक पुस्तके, एक रोप, सॅनिटायझर बॉटल,एनर्जी ड्रिंक बॉटल,रक्तवाढीसाठी टॉनिक,मास्क आदी देण्यात आले उदघाटन प्रसंगी नंदकुमार झांबरे झोनल इंचार्ज सातारा,किशोर माने क्षेत्रीय संचालक बारामती,मुखी शिवाजी अवचर,महादेव शिंदे,सोनाली काळे,भीमराव मचाले तसेच संचालक प्रकाश दरदरे, महेश बांडे, आबा पवार,डॉ सोलनकर, अकाऊंटंट विकास सावंत, सेवादल शिक्षक अनिल पवार,अजय कणसे आदी मान्यवर उपस्थित होते

राष्ट्रीय समाज पक्ष्याची बैठक लाखेवाडी येथे संपन्न

इमेज
  राष्ट्रीय समाज पक्ष्याची बैठक लाखेवाडी येथे संपन्न    प्रतिनिधि महेश गडदे, आज दिनांक 3 ऑक्टोबर. लाखेवाडी येथे राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर तालुक्याच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुणे जिल्हा प्रभारी किरणजी गोफणे, इंदापूर तालुका प्रभारी सतीश नाना तरंगे रा स प नेते शहाजी भाळे,रवि भाळे, मनेश जाधव यांनी मार्गदर्शन व सूत्रसंचालन गणेश हेगडकर यांनी केले,  सदर बैठकीमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांचा आढावा घेण्यात आला व जुने व नवीन कार्यकर्त्यांनी पुढे येऊन पक्ष वाडीसाठी आपापले विचार मांडण्यात आले,आणि गाव तिथे शाखा घर तिथे रासप कार्यकर्ता असा संकल्प करण्यात आला यावेळी रा स प मध्ये नवीन कार्यकर्त्यांनी प्रवेश केला, तसेच या बैठकीमध्ये सर्व समाजघटकांना सोबत घेऊन नवीन पदनियुक्ती करण्यात आल्या, 1)मनेश जाधव, इंदापूर विधानसभा अध्यक्ष रासप 2) ज्योतीराम खताळ, इंदापूर प्रसिद्धीप्रमुख रासप 3) अविनाश मोहिते, इंदापूर विधानसभा उपाध्यक्ष 4) गणेश हेगडकर, इंदापूर तालुका सोशल मीडिया अध्यक्ष रासप 5) राजेंद्र जानकर, इंदापूर तालुका विद्यार्थी आघाडी तालुकाध...

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२१ मध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार.

इमेज
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२१ मध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार, नवोदय विद्यालय प्रवेश मिळालेल्या श्रेयशी भोंग , अर्णव भोंग व सार्थक भोंग यांचा शिक्षक समितीच्या वतीने सत्कार संपन्न. प्रतिनिधि,दि:३. महेश गडदे. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२१ मध्ये घवघवीत यश संपादन करून सहावी ते बारावी शिक्षणासाठी नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवलेल्या श्रेयशी भोंग , अर्णव भोंग व सार्थक भोंग यांचा शिक्षक समितीच्या वतीने निमगाव केतकी येथील सुवर्णयुग गणेश मंदिर येथे सत्कार करण्यात आला. तीनही यशस्वी मुलांचा फेटा , पुष्पहार , लेखन साहित्य देवून शिक्षक समितीच्या पदाधिकारी व शिक्षकांचे हस्ते सत्कार करण्यात आला. पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यशस्वी मुलांना शुभेच्छा देण्यासाठी दत्ताञय चांदणे , किरण म्हेञे , बापूराव जाधव , सतिश भोंग यांनी मनोगत व्यक्त केली. मुलाचे पालक सतिश भोंग , संजय भोंग , निलिमा भोंग , बबन भोंग यांचाही सत्कार करण्यात आला.सत्कार समारंभासाठी जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष दत्ताञय चांदणे , सेवानिवृत्त शिक्षक आबा लामतुरे , जिल्हा सोसायटी चेअरमन तथा संचालक अरूण म...

इंदापूर:व्याहाळी केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न,

इमेज
  व्याहाळी केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न, प्रतिनिधी महेश गडदे , आज दिनांक 1/10/2021 रोजी व्याहाळी केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळांची शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ या वर्षातील पहिली शिक्षण परिषद भैरवनाथ माध्यमिक विद्यालय,व्याहाळी येथे केंद्राचे केंद्रप्रमुख संभाजी आजबे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाली.                    परिषदेचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख संभाजी आजबे साहेबांनी केले.नंतर सुलभक किरण म्हत्रे सरांनी प्रशिक्षणाचे स्वरूप सांगून सर्व शिक्षकांकडून पुर्वचाचणी सोडवून घेतली. नंतर त्यांनी पुणे जिल्हा शैक्षणिक उपक्रम (पंचसूत्री कार्यक्रम),शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी दहा कलमी कार्यक्रम, निपुण भारत अभियान ओळख,उत्तर चाचणी व फीडबॅक या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.शिक्षकांनी देखील चर्चेत सहभाग घेतला. शिक्षण परिषद यशस्वीतेसाठी भैरवनाथ विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.आभार बापुराव जाधव यांनी मानले.