पोलीस प्रशिक्षण केंद्र , नानवीज- दौंड येथे सत्र क्र . ४१ चा दिक्षांत संचलन समारंभ :श्री कृष्ण प्रकाश,पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांचे उपस्थितीत,

पोलीस प्रशिक्षण केंद्र , नानवीज- दौंड येथे सत्र क्र . ४१ चा दिक्षांत संचलन समारंभ 


पोलीस प्रशिक्षण केंद्र , नानवीज- दौंड येथे सत्र क्र . ४१ चा दिक्षांत संचलन समारंभ प्रमुख अतिथी श्री कृष्ण प्रकाश , पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांचे उपस्थितीत पार पडला. 

प्रतिनिधि महेश गडदे,




दिक्षांत संचलनाचे नेतृत्व प्रशिक्षणार्थी सौरभ कोलते यांनी केले . यावेळी प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य श्री . संदिप आटोळे यांनी या प्रशिक्षणाबाबतचे अहवाल वाचन करुन संस्थेच्या कामकाजाची माहिती दिली. 


सदर संचलन समारंभास मा . श्री . तानाजी चिखले , समादेशक रा . रा . पोलीस बल गट क्र .०५ , दौंड , श्री . संग्राम डांगे , वैद्यकीय अधिक्षक , उपजिल्हा रुग्णालय , दौंड , मा . श्री . संजय गित्ते , शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम पुर्व विभाग पुणे , तसेच दौंड शहरातील शौर्य अॅकॅडमीचे छात्र , पत्रकार बांधव व पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.



प्रमुख अतिथी यांनी सर्व यशस्वी प्रशिक्षणार्थीचे अभिनंदन केले . प्रशिक्षणार्थीचे दिमाखदार संचलन , पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज - दौंड येथे राबविलेले विविध उपक्रम , व्हर्म्युअल क्लासरूम , IED पार्क , मॉडेल पोलीस स्टेशन , ट्राफिक पार्कचे आधुनिकीकरण व नव्याने शिकविण्यात आले भावनिक प्रज्ञावंत पोलीस इ . उत्कृष्ट कामकाजाबाबत प्राचार्य श्री . संदिप आटोळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले . तसेच रक्तदान शिबीर , विविध वृक्षांची लागवड इ . पर्यावरणपूरक विविध उपक्रम राबविल्याने संस्थेच्या कामकाजाबद्दल कौतुक केले . पोलीस प्रशिक्षण केंद्र , नानवीज येथे कृतीशील प्रयोगाच्या माध्यमातून तयार झालेला अष्टपैलू पोलीस कर्तव्यनिष्ठेने समाजाचे रक्षण करून महाराष्ट्र पोलीस दलाची शान नक्कीच उंचावेल व पोलीसांचे " सद्ररक्षणाय खलनिग्रहणाय " या ब्रीद वाक्याला साजेसे वर्तन ठेवेल असा विश्वास व्यक्त केला.


अष्टपैलू प्रथम म्हणून विशाल जगताप ( बीड ) , 

अष्टपैलू द्वितीय शाम माने ( नांदेड ) , 

आंतरवर्ग प्रथम आकाश बिराजदार ( लातूर ) , 

गोळीबार प्रथम क्रमांक महादेव गोयकर ( जळगाव ) , 

बेस्ट टर्न आऊट सौरभ कोलते ( जळगाव ) , 

उत्कृष्ट खेळाडू सुनिल यादव ( गोंदीया ) या प्रशिक्षणार्थीना प्रमुख अतिथी मा . श्री . कृष्ण प्रकाश यांचे हस्ते सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. 


त्याचप्रमाणे या प्रशिक्षण सत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन मा . अतिथींच्या हस्ते गौरविण्यात आले.


प्रशिक्षण केंद्रास विशेष सहाय्य करणाऱ्या शासनाच्या अन्य विभागाचे अधिकारी श्री . संग्राम डांगे , वैद्यकीय अधिक्षक , उपजिल्हा रुग्णालय , दौंड , मा . श्री . संजय गित्ते , शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम पुर्व विभाग पुणे यांना मा . अतिथींच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन प्रशिक्षण केंद्राच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्या आली . सत्र क्र . ४१ मधील स्मृतींना उजाळा देणारी " स्मृतीगंध " ही स्मरणीका मा . प्रमुख अतिथी यांचे हस्ते प्रदर्शित करण्यात आली . उप- प्राचार्य श्री . एच पी मुलाणी यांनी प्रमुख अतिथी , पत्रकार व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करून प्रशिक्षणार्थीना शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.