इंदापूर:व्याहाळी केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न,
व्याहाळी केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न,
प्रतिनिधी महेश गडदे,
आज दिनांक 1/10/2021 रोजी व्याहाळी केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळांची शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ या वर्षातील पहिली शिक्षण परिषद भैरवनाथ माध्यमिक विद्यालय,व्याहाळी येथे केंद्राचे केंद्रप्रमुख संभाजी आजबे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाली.
परिषदेचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख संभाजी आजबे साहेबांनी केले.नंतर सुलभक किरण म्हत्रे सरांनी प्रशिक्षणाचे स्वरूप सांगून सर्व शिक्षकांकडून पुर्वचाचणी सोडवून घेतली. नंतर त्यांनी पुणे जिल्हा शैक्षणिक उपक्रम (पंचसूत्री कार्यक्रम),शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी दहा कलमी कार्यक्रम, निपुण भारत अभियान ओळख,उत्तर चाचणी व फीडबॅक या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.शिक्षकांनी देखील चर्चेत सहभाग घेतला.
शिक्षण परिषद यशस्वीतेसाठी भैरवनाथ विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.आभार बापुराव जाधव यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा