इंदापूर तालुका व शहर भारतीय बौद्ध महासभा यांचे वतीने गुणवंतांचा जाहीर सत्कार.

 इंदापूर तालुका व शहर भारतीय बौद्ध महासभा यांचे वतीने गुणवंतांचा जाहीर सत्कार.



प्रतिनिधी: महेश गडदे,

येथील डाॅ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मध्ये दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि इंदापूर तालुका व शहर भारतीय बौद्ध महासभा यांचे वतीने गुणवंतांचा जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इंदापूर तालुका अध्यक्ष डाॅ.प्रा.जीवन सरवदे यांनी भूषविले.

   सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले तर नगरसेविका राजश्री मखरे यांनी दिप प्रज्वलन केले.

     विचारपिठावर डाॅ.प्रा.जीवन सरवदे, भारतीय बौद्ध महासभा माजी तालुकाध्यक्ष विलासदादा मखरे, माजी प्राचार्य शहाजी मिसाळ, माजी मुख्याध्यापक शिवाजी कांबळे, आरपीआय बारामती लोकसभा मतदार संघाचे कार्याध्यक्ष तथा भारतीय बौद्ध महासभा इंदापूर तालुका सांस्कृतिक विभाग प्रमुख बाळासाहेब सरवदे, नगरसेविका राजश्री मखरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


         दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा इंदापूर तालुका व शहर शाखेच्या वतीने गुणवंतांचा जाहीर सत्कार करण्यात आला यामध्ये एम.पी.एस. सी. उत्तीर्ण होऊन आर.एफ.ओ. (वननिरीक्षक ऑफिसर) या पदावर नियुक्ती झालेले प्रमोद कांबळे, एम.बी.बी.एस. उत्तीर्ण डाॅ. समता सरवदे, नवोदय उत्तीर्ण कु. संबोधी मोरे, धम्मान्वय चंदनशिवे, राघवेंद्र गायकवाड, चंद्रपुर सैनिक स्कूल उत्तीर्ण सिद्धार्थ वाघमारे, पी.ई.टी.एक्झाम उत्तीर्ण प्रा.सुहास मखरे, एल.एल.बी.उत्तीर्ण ॲड. सुरज मखरे तसेच इ.१०वी, १२वी मध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

          यावेळी पुणे जिल्हा आरपीआय संघटक-सचिव शिवाजीराव मखरे, तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे, प्रा.अशोक मखरे, बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष सुधीरशेठ मखरे, कोषाध्यक्ष हनुमंत कांबळे, सरचिटणीस प्रा.श्रीनिवास शिंदे, कार्यालयीन सचिव तात्यासाहेब मसलखांब, प्रा. डि.के.भोसले, प्रा. तानाजी कसबे, प्रा. राजेंद्र गायकवाड, प्रा. विद्या गायकवाड, मनिषा मखरे, स्मिता मोरे-वाघमारे, विनायक वाघमारे, भिमराव चंदनशिवे, सुनिल मखरे, रवि चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अविनाश मखरे आदी मान्यवर उपस्थित होते.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीरशेठ मखरे यांनी केले तर सुत्रसंचालन सुहास मोरे यांनी केले.

     कार्यक्रमाची सांगता दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया महिला विभाग तालुका उपाध्यक्षा सुनिता शिवाजीराव मखरे यांचे ' राजभवन ' या निवासस्थानी करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.