मा. अण्णासाहेब हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास तालुका कार्यकारणी जाहीर.

मा.अण्णासाहेब हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास तालुका कार्यकारणी जाहीर.


प्रतिनिधि:महेश गडदे.

 दिनांक 19 10 2021रोजी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास इंदापूर तालुक्याची मासिक बैठक झाली सदर बैठकीला पुणे जिल्ह्याचे जिल्हा संघटक श्री शिवाजी खेडकर हे उपस्थित होते या बैठकीमध्ये तालुका कार्यकारणी व शहर कार्यकारिणीची निवड करण्यात आली , इंदापूर तालुका संघटक: श्री जनार्दन पांढरमिसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे . 

त्यामध्ये इंदापूर तालुक्याचे सहसंघटक : शामराव केशव जाधव, कोषाध्यक्ष: अनिल चितळकर, सहकोषाध्यक्ष: दादासाहेब चव्हाण ,  सचिव: महेश ईश्वर मोहिते  तसेच सहसचिव:कविता केकान, याप्रमाणे तालुका कार्यकारणी निवडण्यात आली व इंदापूर शहर कार्यकारणी मध्ये शहर संघटक :प्रशांत शिताप, शहर सहसंघटक: लक्ष्मण नामदेव गडदे ,सचिव :श्री  दशरथ भोंग ,यांना देण्यात आले .

या वेळी मार्गदर्शन  जिल्हा संघटक शिवाजी खेडकर यांनी केले त्या बैठकीला  सव्वीस कार्यकर्ते उपस्थित होते तालुक्यांमध्ये सर्वसामान्य नागरिकांपर्यंत व गरजू लोकांपर्यंत शासकीय योजना व शासकीय कामकाज कशा पद्धतीने केले जाते या वरती मार्गदर्शन तसेच नागरिकांची होणारी लूट व प्रशासकीय कामकाजाविषयी चे मार्गदर्शन यावरती जिल्हा संघटक यांच्या कडून करण्यात आले व सर्व कार्यकर्त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

 ग्रामीण भागांमध्ये सर्व गावातून कार्यकारणी तयार करून गावपातळीपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून सर्व कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या व ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी जे देशाला व राज्याला जे अकरा कायदे दिलेले आहेत त्या कायद्याच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यात आले.

 लोकायुक्त महाराष्ट्राला लवकरच लागू केला जाईल या संदर्भामध्ये माननीय अण्णासाहेब हजारे यांनी पुण्यामध्ये मुख्य सचिवांच्या मार्गदर्शना खाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली . भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास चे काम पूर्ण देशांमध्ये उभा करण्याचा निश्चय ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी केलेला असून यामध्ये तरुण वर्गांना एक मोठी संधी वेगवेगळ्या शासकीय समिती वरती व एक अनेक समित्या स्थापन करण्यास संदर्भामध्ये सर्व जिल्हा संघटक आणि तालुका संघटक यांना सूचना दिलेल्या आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.