राम शिंदे मंत्री झाले पाहिजेत असं वचन त्यांच्या मातोश्री कडून घेतलं: सखाराम खोत,वर्ल्ड धनगर ऑर्गनायझेशन.
सखाराम खोत यांच्या गालावरून मायेनं हात फिरवताना राम शिंदे यांच्या मातोश्री.
इंदापूर,(महेश गडदे)दि.३१ में: पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म झालेल्या शिंदे घराण्यातील अहिल्यादेवी होळकर यांचे समाजकार्य पुढे चालू ठेवणारे प्राध्यापक राम शिंदे हे वंशज आहेत, त्यांना कर्जत जामखेड येथील जनतेने दोन वेळा निवडून दिले व महाराष्ट्र शासनाचे एक जबाबदार व कर्तव्यदक्ष मंत्री म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला संयमी शांत मनमिळावू सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा नेता मिळाला पण ज्यांना गेली साठ वर्ष जो समाज खंबीरपणे पाठीशी उभा राहिला.
या समाजामुळेच गल्ली ते दिल्ली गाठता आली त्यांनी याची जाण न ठेवता हे संयमी नेतृत्व संपवण्याचे काम केले याची सल संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजन समाजाला होती, याचाच उद्रेक होऊन सन 2023 ची पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती न भूतो न भविष्यती झाली यावेळी वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय समन्वयक श्री सखाराम खोत यांनी प्राध्यापक राम शिंदे यांच्या मातोश्री यांच्याकडून आशीर्वाद घेताना वचन मागितले की यावेळी राम शिंदे मंत्री झाले पाहिजेत, यावेळी मातोश्रीच्या डोळ्यांतून अश्रू आणावर झाले व हसत वचन दिले माझ्या बाळाने एवढे समाजकार्य केले त्यामुळे तो या महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री होईलच यावेळी उपस्थिततांचे डोळे पाणावले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा