श्री. बाबीर विद्यालयात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप .
श्री.बाबीर विद्यालय-रुई येथे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप .
प्रतिनिधि:महेश गडदे.
आज श्री बाबीर विद्यालय, रुई ता.इंदापूर येथे देशाचे माजी कृषिमंत्री मा.शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक12/12/2022 क्रीडा सप्ताहाचा समारोप खेळाच्या मैदानातच करण्यात आला .
खो-खो या खेळामध्ये मोठ्या गटात इयत्ता .8 वी ते 10 वी गटात प्रथम आलेल्या, 9 वी मधील मुलांच्या संघाला बाबीर विद्यालयाचे अध्यक्ष अमरसिंह आत्माराम पाटील व गावचे पोलीस पाटील अजितसिंह पाटील,विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील यांचे शुभ हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या वेळी माजी सरपंच मिरादेवी पाटील,प्रतीक्षा पाटील,व सर्वच शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या क्रीडा सप्ताहमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील यांनी दिली.
क्रीडा सामन्याचे नियोजन क्रीडा शिक्षक गौतम सोनवणे व आप्पासो डोंबाळे यांनी केले.पंच म्हणून धनेश भोईर,यशवंत लोंढे यांनी तर या सामन्याचे समालोचन बादशाह मुलाणी यांनी केले.
वरील सर्व स्पर्धा यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी सर्वच शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी मदत केली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा