इंदापूर: रुई येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन ध्वजारोहण करुन मोठ्या उत्साहात साजरा

 रुई येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन ध्वजारोहण करुन मोठ्या उत्साहात साजरा.


महेश गडदे.प्रतिनिधी.दि:१

आज रुई येथे श्री बाबीर विद्यालय,जि, प,शाळा आणि ग्रामपंचायत रुई यांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.          

             या कार्यक्रमास रुई गावचे माजी सरपंच श्री यशवंत कचरे यांचे शुभ हस्ते ध्वजारोहणकरण्यात आले तर  पूजन पोलीस पाटील श्री अजितसिंह पाटील,श्री बाबीर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जगन्नाथ पाटील श्री अशोक भगत यांचे शुभ हस्ते करण्यात आले.

यावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सर्जेराव मारकड व त्यांचा सर्व स्टाफ , बाबीर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री तानाजी मराडे,माजी सरपंच सौ. मिरादेवी पाटील, सौ.प्रतीक्षा पाटील तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सर्जेराव मारकड यांनी केले तर समारोप श्री बादशाह मुलाणी यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.