सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीबाबतच्या निर्णयावरुन अण्णा हजारेंचा संताप.
सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीबाबतच्या निर्णयावरुन अण्णा हजारेंचा संताप. प्रतिनिधी:महेश गडदे. राजभरातील सुपरमार्केटमधून वाईनची विक्री करता येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाला विविध क्षेत्रातून विरोध होऊ लागला आहे. यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी देखील यावर आपली भूमिका मांडली असून त्यांनी हा निर्णय अत्यंत दुर्देवी असल्याचं म्हटलं आहे. अण्णा हजारे यांनी एक पत्रक काढलं असून त्यात म्हटलं आहे की, महाराष्ट्र सरकारने नुकताच सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय दुर्दैवी आहे असेच म्हणावे लागेल. एकीकडे राज्य सरकार हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतल्याचे सांगत आहे. तसेच वाईन म्हणजे दारू नाही असेही सांगण्यात येत आहे. असे निर्णय या राज्याला कुठे घेऊन जाणार हा खरा प्रश्न आहे, असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. पत्रकात अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे की, संविधानानुसार लोकांना व्यसनांपासून, अंमली पदार्थांपासून, मद्यापासून पर...