इंदापूर:न्हावी गावातील असंख्य पदाधिकार्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
इंदापूर:न्हावी गावातील असंख्य पदाधिकार्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश..
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले स्वागत..
प्रतिनिधि; महेश गडदे.
न्हावी गावचे युवानेते,संतोषबापू भारत मारकड व आबासो रामदास पाटील यांनी आज असंख्य कार्यकर्त्यांसह, राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या शुभहस्ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.
त्यांच्या आजच्या पक्षप्रवेशामुळे संपूर्ण न्हावी गाव राष्ट्रवादी मय झाले आहे.
या विषयी बोलताना श्री.पाटील व श्री.मारकड यांनी सांगितले की,आम्ही इथून पुढे आदरणीय भरणे मामांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजून बळकट करणार असून राष्ट्रवादी काँग्रेस व आदरणीय पवार साहेबांच्या विषयी असणारे आकर्षण व आदरणीय अजितदादा,आदरणीय सुप्रियाताई व आदरणीय दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या तळागाळातील सर्वांगीण विकासाच्या कार्यपद्धतीने प्रेरित होऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला असून यापुढे संपूर्ण न्हावी गावामध्ये राष्ट्रवादीमय वातावरण झाले आहे.
गावच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व माननीय भरणे मामांशिवाय कोणीही वाली नाही त्यामुळे पुढच्या काळामध्ये आदरणीय भरणे मामांच्या मार्गदर्शनाखाली खंबीरपणे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा