श्री बाबीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना सॉक्स चे वाटप।

  श्री बाबीर विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती व'बालिका दिन' साजरा.


रोटरी क्लब पुणे तर्फे व्हर्चुअल सायन्स लॅब चे व सॉक्स चे वाटप करताना मान्यवर।.

रोटरी क्लब तर्फे व्हर्चुअल सायन्स लॅबचे वितरण.

रुई ता.इंदापूर -महेश गडदे.

रुई:श्री बाबीर विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती विद्यालयात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात'बालिका दिन' म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ पुणे व्हायब्रन्ट ईट व रोटरी क्लब ऑफ वरकुटे पोमोग्रेनेट व्हिलेज यांचे वतीने इंदापूर तालुक्यातील 6 माध्यमिक व 5 उच्च प्राथमिक शाळांमध्ये व्हर्चुअल सायन्स लॅब चे वितरण रोटरीचे नियोजित प्रांतपाल रो.शीतल शहा यांचे शुभ हस्ते श्री बाबीर विद्यालय,रुई येथे करण्यात आला.

  ग्रामीण भागातील विद्यार्थांना प्रत्यक्षात विज्ञानाचे प्रयोग  शाळेत करणेसाठी मर्यादा येतात ही गोष्ट रोटरी क्लबने लक्षात घेऊन सत्यम सिस्टीम प्राय.लि.औरंगाबाद यांनी इ.5 वी ते 10 वी पर्यंतचे विज्ञान विषयाचे 132 प्रयोग संगणकावरती व्हर्चुअली पद्धतीने करता येतात. यासाठी रुई गावचे भूमिपुत्र प्रताप भगत गुरुजी यांनी या कामी देणगी दिली.त्यांचे बाबीर विद्यालय व रोटरी तर्फे या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.यावेळी इन्फीलुम प्रा,लि.पुणे यांच्या सी एस आर फंडातून इंदापूर तालुक्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळांमधील 8000 विद्यार्थांना मोफत सॉक्स वाटपाचा ही शुभारंभ करण्यात आला. 


     या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे व्हायब्रन्ट इष्टचे अध्यक्ष रो.शिरीष तापडिया यांनी प्रास्ताविक  केले .तर मान्यवरांचे आभार रोटरी क्लब ऑफ वरकुटे पोमोग्रेनेट व्हिलेजचे अध्यक्ष रो. शशिकांत शेंडे यांनी रोटरीच्या कार्या बाबत माहिती दिली.

  मान्यवरांचा सत्कार श्री बाबीर विद्यालायचे अध्यक्ष अमरसिंह पाटील व पोलीस पाटील अजितसिंह पाटील व मुख्याध्यापक संघाचे तालुका सचिव जगन्नाथ पाटील यांनी  आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार केला.

   यावेळी रो.मुकेश सोनी,रो.पवन आगरवाल, रो.राजेश बारभाई,संजय राखुंडे ,रो,शिवाजी शेंडे,रो,संजय म्हस्के उपस्थित होते. यावेळी सावित्रीच्या लेकी व शिक्षिका मिरादेवी पाटील, प्रतीक्षा पाटील, पर्यवेक्षक तानाजी मराडे सर्व शिक्षक-शिक्षिका व कर्मचारी वृंद उपस्थित होते.या कार्यकर्मच्या शेवटी सर्वांचे आभार धनाजी गावडे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.