श्री बाबीर विद्यालय रुई येथे. इ बी सी शिबिर संपन्न: निःशुल्क ५ वी ते१२ वी पर्यंत च्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण सवलत.
श्री बाबीर विद्यालय रुई येथे. इ बी सी शिबिर संपन्न: निःशुल्क ५ वी ते१२ वी पर्यंत च्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण सवलत.
इंदापूर: महेश गडदे.
पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष 2021-22 साठीचा इ.5 वी ते 10 वी आणि 11 वी 12 पर्यंतच्या सर्व विद्यार्थांना निःशुल्क मोफत शिक्षण सवलत (इबीसी)चे शिबिर रुई(ता.इंदापूर)येथील श्री बाबीर विद्यालयात झाले.इंदापूर तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी श्री बाबीर विद्यालय, रुई येथे शिबीर दिनांक 4 व 5 जानेवारी असे दोन दिवस घेण्यात आले.
या शिबिरात तालुक्यातील 52 शाळांनी इबीसी प्रस्ताव सादर केले. जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी वाखारे मॅडम यांचे आदेशान्वये व वरिष्ठ लिपिक श्रीमती दोंडे मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली कोरोना नियमांचे पालन करून शिबीर झाले.इंदापूर तालुका शिक्षेकेत्तर संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय काळे,निमसाखरचे बरकत डांगे, कौठळीचे जगताप, वरकुटे खुर्दचे शिंदे,निमगावचे देवकर, काटीचे कुबेर, भवानीनगरचे मिसाळ,लाकडीचे चव्हाण यांनी दोन दिवस शिबिराचे काम पाहिले.
या शिबिराचे नियोजन विद्यालायचे मुख्याध्यापक व तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव जगन्नाथ पाटील यांनी केले व सर्वांचे आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा