चित्रकला परीक्षा ह्या ऑफलाईनच घेण्याची कलाशिक्षकांची मागणी
चित्रकला परीक्षा ह्या ऑफलाईनच घेण्याची कलाशिक्षकांची मागणी.
राज्य मंत्री दत्तात्रेय भरणे यांना निवेदन देताना.
प्रतिनिधी:महेश गडदे.
दिनांक 30 जानेवारी रोजी इंदापुरचे आमदार मा.ना. दत्तात्रय मामा भरणे(राज्यमंत्री तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा)यांचे निवासस्थानी जाऊन चित्रकला परीक्षा ह्या ऑनलाईन न घेता ऑफलाईनच घेण्यात यावेत असे निवेदन इंदापूर तालुका कलाशिक्षक संघाचे वतीने देण्यात आले. यावेळी जिल्हा कलाशिक्षक संघाचे उपाध्यक्ष नितीन गायकवाड,तालुका अध्यक्ष अमीन मुल्ला,कार्याध्यक्ष परशुराम घाडगे,प्रकाश पापत, दीपक शिंदे,प्रदीपकुमार शिंदे,श्रीराम सावंत इत्यादी कलाशिक्षक यावेळी उपस्थित होते.
तसेच मोहोळचे आमदार यशवंत माने यांनाही कलाशिक्षक संघाचे वतीने निवेदन देण्यात आले,त्यांनीही या चित्रकला परिक्षे बाबत नक्कीच विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या परीक्षा झालेल्या नाहीत आणि आत्ता कला संचालनालयाने आदेश दिले आहेत की या परीक्षा ऑनलाईन होतील म्हणून मुळातच इ,10 वी ची बोर्डाची प्रात्यक्षिक परीक्षा 15 दिवसावर येउन ठेपली आहे.अशात चित्रकला(एलिमेंटरी/इंटरमिजीएट) या परीक्षा सरावा शिवाय देणे शक्य नाही, म्हणून दहावीचे विद्यार्थी या परिक्षा द्यायला तयार नाहीत .
तरी महाराष्ट्र शासनाने व कलासंचालनालयाने जो ऑनलाईन परीक्षेचा निर्णय घेतला आहे तो निर्णय राज्यातील ग्रामीण आदिवासी,दुर्गम भागातील नेटवर्क व अन्य सोयी सुविधे अभावी या परिक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
तरी चालू वर्षी इ. 10 वीमधील विद्यार्थांना मागील वर्षी प्रमाणे गुण द्यावे आणि इतर मुलांची परीक्षा एप्रिल किंवा मे मध्ये घेतली तरी चालेल अशी आमच्या जिल्ह्याचे पदाधिकारी हुशेन खान,किरण सरोदे ,मिलिंद शेलार ,संजय भोईटे आदींनी मागणी केलीआहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा