कोविड नियंत्रण कक्षात प्राथमिक शिक्षकांच्या नेमणूका देवू नयेत - शिक्षक समितीची मागणी.

कोविड नियंत्रण कक्षात प्राथमिक शिक्षकांच्या नेमणूका देवू नयेत - शिक्षक समितीची मागणी. शिक्षक समितीच्यावतीने प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व प्रभारी तहसीलदार अनिल ठोंबरे यांना निवेदन सादर. इंदापुर: प्रतिनिधि- महेश गडदे, शिक्षक समिती इंदापूर यांचे वतीने दि २८ रोजी तहसील कार्यालय इंदापूर येथे कोविड नियंत्रण कक्ष इंदापूर येथे ११४ प्राथमिक शिक्षकांना गेली तीन महिन्यापासून सुरू असलेल्या नेमणूका रद्द कराव्यात व नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने आॕनलाईन / आॕफलाईन अध्यापन , ओसरी शाळा , इतर शैक्षणिक कामे सुरु असल्याने पुढील आदेश प्राथमिक शिक्षकांना देवून नयेत अशा प्रकारचे निवेदन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व प्रभारी तहसीलदार अनिल ठोंबरे यांना देण्यात आले. प्रसंगी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व प्रभारी तहसीलदार अनिल ठोंबरे यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.कोविड १९ कठिण काळात सामाजिक जबाबदारी या हेतूने शिक्षकांनी अनेक प्रकारची कामे पार पाडली आहेत.मुलांचे शैक्षणिक नुकसान होवू नये याकरिता कोविड १९ बाबतच्या कामातून प्राथमिक शिक्षका...