इंदापूर वंचित बहुजन आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी सागर गायकवाड यांनी निवड.

इंदापूर येथे वंचित बहुजन आघाडीची तालुका कार्यकारिणी जाहीर,


प्रतिनिधी महेश गडदे,

 वंचित बहुजन आघाडी इंदापूर तालुका कार्यकारिणीची आढावा बैठक पुणे जिल्हा अध्यक्ष आयु.विनोद भालेराव साहेब यांच्या सूचनेनुसार इंदापूर तालुक्याचे जेष्ठ नेते आयु. हनुमंत तात्या कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली व वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा सल्लागार आयु.सागर भाऊ लोंढे , जेष्ठ नेते ऍड.संजय चंदनशिवे , आयु. प्रमोद भाऊ चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती शासकीय विश्रामगृह, इंदापूर येथे घेण्यात आली. 

          कार्यक्रमास तालुक्यातील विविध भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यकारणी संदर्भात अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका पूर्ण ताकदीने लढण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन करण्यात आले.

        अनेकांनी तालुका अध्यक्ष व कार्यकारणीतील विविध पदासाठी मुलाखती दिल्या. यावेळी तालुका अध्यक्ष म्हणून आयु.सागर गौतम गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यामध्ये उपाध्यक्ष पदी म्हणून अनुज गायकवाड, बोधिराज चव्हाण व हनुमंत बनसोडे, महासचिव पदी अमोल भोसले व शरद पवार , संघटक पदी पंकज बनसोडे, कोषाध्यक्ष पदी राजेंद्र बंडगर व इंदापूर शहराध्यक्ष पदी अविनाश मखरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.


     यावेळी राहुल सोनवणे, पवन पवार, प्रसाद लोखंडे, विकास गायकवाड, गणेश बनसोडे, सुधीर कुंभार, विठ्ठल करगळ, दिलीप गायकवाड, सुरज भोसले, शंकर सरवदे, सागर कांबळे, अविनाश मखरे, नितीन चांदणे, गणेश तोंडे, विठ्ठल सोनवणे, अमोल भोसले, भाऊसाहेब शिंदे, राजेंद्र बंडगर, प्रा. सतीश जगताप, चंद्रकांत सरवदे, अनोज गायकवाड, अजय गायकवाड, अतुल सोनकांबळे, बोधिराज चव्हाण, 

पंकज बनसोडे, आदेश चव्हाण, समीर मखरे हे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.