निसर्ग पेटलाय जिद्दीला पण राष्ट्रवादी काँग्रेस आहे पूरग्रस्तांच्या मदतीला
निसर्ग पेटलाय जिद्दीला पण राष्ट्रवादी काँग्रेस आहे पूरग्रस्तांच्या मदतीला.
इंदापुर प्रतिनिधि-महेश गडदे,
चिपळूण येथे पूरपरिस्थितीमुळे आलेल्या आपत्तीशी दोन हात करण्यासाठी अवघा महाराष्ट्र कोकण वासीयांच्या मदतीला धावून आला आहे.प्रत्येकजण आपला महाराष्ट्र धर्म अतिशय उत्तमरीत्या निभावत आहे.याच मदतीचा खारीचा वाटा म्हणून दोन दिवसांपूर्वी इंदापूर तालुक्यामध्ये कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर तालुका यांच्याकडून मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला तालुक्यातील जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. अवघ्या तीन दिवसात मदतीचा ओघ पाहायला मिळाला. काल रात्रीपासून आलेल्या सर्व वस्तूंचे योग्य रीतीने वर्गीकरण करून आज पुणे येथून विविध साहित्याच्या ६ गाड्या चिपळूणकडे रवाना करण्यात आल्या. यामध्ये पूरग्रस्त महिलांसाठी साड्या, बिस्कीट बॉक्स, पाणी बॉक्स, विविध खाद्य पदार्थ, गहू, तांदूळ, साखर, लहान मुलांना कपडे असे विविध साहित्याची मदत चिपळूण येथे आ. शेखर निकम यांच्याकडे पाठवण्यात आली आहे.मी तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून समस्त इंदापूरकरांचे मनःपूर्वक आभार मानतो.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.निर्मलाताई पानसरे यांनी या गाड्यांना झेंडा दाखवून त्या चिपळूण कडे मार्गस्थ करण्यात आल्या.या कार्यक्रमाला माझ्यासह खेड-राजगुरूनगर चे आ. दिलीपजी मोहिते-पाटील, जुन्नर चे आ. अतुलजी बेनके, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक चे चेअरमन माजी आ. रमेश आप्पा थोरात, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा