बारामतीत होणार शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, ३०० कोटींचा निधी ; अजितदादा पवार यांच्याकडून मोठी घोषणा

बारामतीत होणार शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, ३०० कोटींचा निधी ; अजितदादा पवार यांच्याकडून मोठी घोषणा 

प्रतिनिधि: महेश गडदे.

 वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाकडून आदेश निघाला, बारामतीत होणार शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, ३०० कोटींचा निधी ; अजितदादा पवार यांच्याकडून मोठी घोषणा 

-

बारामतीत शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि त्याला जोडून १०० खाटांचे आयुर्वेद रुग्णालय स्थापन करण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाले. याबाबत आज वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाने आदेश पारित केले असून सुमारे ३०० कोटी रुपये खर्च करून या महाविद्यालय आणि रुग्णालयाची निर्मिती होणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयानंतर आयुर्वेद महाविद्यालयही सुरू होणार असल्याने बारामती आता शिक्षणाच्या दृष्टीने अधिक प्रगत आणि सोईसुविधानियुक्त तालुका ठरणार आहे.


या संदर्भात उल्लेखनीय आहे की, बारामतीत आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय स्थापन करू, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्यासाठी अनेक दिवसांपासून कार्यवाही सुरू करण्यात आली होती. आज याबाबत वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाने आदेश पारीत केल्यानंतर बारामतीत आयुर्वेद महाविद्यालय सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला.





केंद्र शासन आणि केंद्रीय भारतीय चिकित्सा परिषदेच्या मान्यतेने १०० विद्यार्थी क्षमतेचे आयुर्वेद महाविद्यालय बारामतीत सुरू होणार आहे. सोबत १०० खाटांचे आयुर्वेद रुग्णालय स्थापन करण्यासही मान्यता मिळाली आहे. या महाविद्यालयासाठी मंत्रिमंडळाच्या मंजुरीने जागाही निश्चित करण्यात आली आहे.


महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या इमारतीसाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या महाविद्यालयात २५८ पदे असतील. २३६ पदांची भरती केली जाणार आहे. स्वच्छता, आहार, सुरक्षा आणि वस्त्र स्वच्छता अशी कामे बाह्यस्त्रोतांकडून करून घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात लवकरच कामं सुरु होतील, असे कळते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.