कोविड नियंत्रण कक्षात प्राथमिक शिक्षकांच्या नेमणूका देवू नयेत - शिक्षक समितीची मागणी.


कोविड नियंत्रण कक्षात प्राथमिक शिक्षकांच्या नेमणूका देवू नयेत - शिक्षक समितीची मागणी.


शिक्षक समितीच्यावतीने प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व प्रभारी तहसीलदार अनिल ठोंबरे यांना निवेदन सादर.

इंदापुर: प्रतिनिधि- महेश गडदे,

शिक्षक समिती इंदापूर यांचे वतीने दि २८ रोजी तहसील कार्यालय इंदापूर येथे कोविड नियंत्रण कक्ष इंदापूर येथे ११४ प्राथमिक शिक्षकांना गेली तीन महिन्यापासून सुरू असलेल्या नेमणूका रद्द कराव्यात व नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने आॕनलाईन / आॕफलाईन अध्यापन , ओसरी शाळा , इतर शैक्षणिक कामे सुरु असल्याने पुढील आदेश प्राथमिक शिक्षकांना देवून नयेत अशा प्रकारचे निवेदन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व प्रभारी तहसीलदार अनिल ठोंबरे यांना देण्यात आले.

                  प्रसंगी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व प्रभारी तहसीलदार अनिल ठोंबरे यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.कोविड १९ कठिण काळात सामाजिक जबाबदारी या हेतूने शिक्षकांनी अनेक प्रकारची कामे पार पाडली आहेत.मुलांचे शैक्षणिक नुकसान होवू नये याकरिता कोविड १९ बाबतच्या कामातून प्राथमिक शिक्षकांना वगळण्यात यावे अशी विनंती करण्यात आली.यावेळी जुनी पेन्शन इंदापूरचे अध्यक्ष संतोष हेगडे , शिक्षक समितीचे सरचिटणीस विनय मखरे , कोषाध्यक्ष भारत ननवरे , उपाध्यक्ष प्रताप शिरसट उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.