उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कौठळी मध्ये विकास कामांचे भूमिपूजन.

 


उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कौठळी मध्ये विकास कामांचे भूमिपूजन.

इंदापुर प्रतिनिधि-महेश गडदे,

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने २२जुलै रोजी इंदापुर येथील कौठळी गावा मध्ये बुध्द विहार,व विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभामंडपाच्या विकास


कामांचे भूमिपूजन करण्यात आले, कौठळी गावाच्या विकासाचे हित लक्षात घेऊन राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा सरचिटणीस वसंतराव पैलवान मारकड व सरपंच उपसरपंच ,सदस्य यांच्या वतीने विकास कामांचे भुमिपुजन करण्यात आले. 

वसंतराव मारकड यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना वही-पेन व खाऊंचे वाटप केले, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित दादा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या त्यांना दिर्घायुष लाभो व त्यांच्या हातुन जनतेची सदैव सेवा घडो अशी प्रार्थना ही करण्यात आली. 


कौठळी गावात विकास कामांचे भुमिपुजन करताना पुणे जिल्हा सरचिटनीस श्री वसंतराव मारकड पाटिल, राष्ट्रवादी कांग्रेस.


यावेळी,सोशल मिडिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष हामा पाटील, ग्रामपंचायत उपसरपंच सुनील खामगळ, सदस्य आण्णा काळेल,हिरामण मारकड,संदीपान मारकड,मोहन पवार बळपूडी चे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब गाढवे,कर्मचारी संघटनेचे सचिव बाबासाहेब मोरे,जिगर मारकड,महावीर मारकड नागरिक उपस्थित होते. सदर कार्यक्रम कोरोनाचे नियम पाळून पार पडला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.