पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९६ वी जयंती श्री क्षेत्र बाबीर देवस्थान येथे साजरी,

इमेज
  पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९६ वी जयंती श्री क्षेत्र बाबीर देवस्थान येथे साजरी, इंदापुर प्रतिनिधि-महेश गडदे, आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९६ वी जयंती श्री क्षेत्र बाबीर देवस्थान  येथे साजरी करण्यात आली, व श्री क्षेत्र बाबीर बुवा देवस्थान परिसरातील स्वच्छता झाडेझुडपे काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला, यावेळी रूई ग्रामपंचायत सरपंच यशवंतराव कचरे श्री बाबीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अजितसिंह पाटील मा.सरपंच व विद्यमान सदस्य विष्णू मारकड सर, कडबनवाडीचे मा.सरपंच भजनदास पवार सर, थोरातवाडीचे पोलीस पाटील नानासाहेब थोरात, बाबीर देवस्थान ट्रस्ट चे उपाध्यक्ष बाळासाहेब भगत भ्रष्टाचार निर्मूलन चे जिल्हाध्यक्ष जनार्दन पांढरमिसे, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष आबासाहेब थोरात, उपसरपंच मगन मराडे,माजी चेअरमन अंकुशराव लावंड दिपक मारकड सागर मारकड, जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे सरचिटणीस अविनाश मोहिते सचिव शंकरराव मारकड, विष्णू मारकड गुरूजी, मोहन भगत, इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते, यावेळी देवस्थान परिसरामध्ये स्वच्छता करण्यासाठी ट्रॅक्टर व जेसीबी...

कोरोनाचा सर्वे करणार्या प्रथमिक शिक्षिकेची व्यथा

इमेज
  कोरोनाचा सर्वे करणार्या प्रथमिक शिक्षिकेची व्यथा ,   मी प्राथमिक शिक्षिका सुप्रिया गेनबा आगवणे/कणसे.जि.प.शाळा रेडनी, तालुका  इंदापूर जिल्हा पुणेे . इंदापुर प्रतिनिधि-महेश गडदे,   वेतन आयोगामुळे शिक्षक झाले मालामाल!!!! अशा बातम्या देणाऱ्या सर्व न्यूज चॅनेल आणि वृत्तपत्रांना कोरोना काळात मृत्युमुखी पडलेले हेच शिक्षक का नाही दिसले??? प्रत्येक वेळी देशावर संकट आले कि प्राथमिक शिक्षक उभा राहिला. शिक्षकांच्या परवानगीशिवाय दुष्काळ निधी, पूरग्रस्तांसाठी निधी, कोरोना सहाय्यता निधी पगारा मधून कट करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले गेले. याच काळात आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये महागाई भत्ता शिक्षकांना दिला गेला नाही. याव्यतिरिक्त तालुका ,जिल्हा आणि राज्य स्तरावरील प्राथमिक शिक्षकांच्या अनेक राजकीय संघटनांनी लाखो रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला. याच शिक्षकांनी कोविड सेंटर उभारले. ऑक्सीजन सिलेंडर दान केले. पण सरकार पत्रकार परिषदेत शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणं तर सोडाच पण कोरुना योद्धा म्हणून सर्वे ड्युटी करताना मृत्युमुखी पडलेल्या माझ्या शिक्षक बांधवांच्...

इंदापूर मध्ये बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी

इमेज
  इंदापूर मध्ये बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी इंदापुर प्रतिनिधि-महेश गडदे, इंदापूर : येथील डाॅ. आंबेडकरनगर मधील जेतवन बुद्ध विहारात व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती- २०२१ च्या वतीने भगवान गौतम बुद्ध यांची २५६५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.      ' विश्वात शांतता प्रस्थापित करण्यासाठी युध्द नव्हे तर बुद्ध हवा आहे. जगाला शांततेचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांचा समता आणि शांततेचा विचार या जगाला तारक ठरु शकतो. असे प्रतिपादन पुणे जिल्हा आर.पी.आय. संघटक सचिव शिवाजीराव मखरे यांनी केले. सुरुवातीला नगरसेविका राजश्री अशोक मखरे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले तर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. बौध्दाचार्य बाळासाहेब सरवदे यांनी बुद्ध वंदना, त्रिशरण व पंचशील ग्रहण करुन धम्मपुजा घेतली.      यावेळी पुणे जिल्हा आर. पी. आय. संघटक सचिव शिवाजीराव मखरे, नामांकित बांधकाम व्यावसायिक वास्तुविशारद वसंतराव माळुंजकर, बारामती लोकसभा मतदार संघ आर.पी.आय कार्य...

इंदापुर:पळसदेव,शासनाचे मोफत स्वस्त धान्य वितरण करण्यात आले,

इमेज
  इंदापुर:पळसदेव,शासनाचे मोफत स्वस्त धान्य वितरण करण्यात आले, पळसदेव माळेवाडी मधील गीता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री हनुमंत. इंदापुर प्रतिनिधि-महेश गडदे, (नाना) बनसुडे यांच्या सूचनेनुसार सहकारी शिवाजी फुले यांच्या मदतीने लाभार्थ्यांना घरपोच धान्य वाटप करण्यात आले. येथील ग्रा.पं सदस्य सुभाष बनसुडे व ग्रा.पं सदस्य विशाल बनसुडे यांच्या सहकार्याने माळेवाडी व शिंदेवस्तीतील १२२ लाभार्थ्यांना मे महिन्यातील गहू व तांदूळ एका दिवसात मोफत धान्याचे घरपोच वाटप केले. तालुक्यात घरपोच धान्य पोहोच करणारे हे एकमेव दुकान ठरल्याचा दावा करण्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवसापासून माळेवाडी व शिंदेवस्ती येथे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत होती.  ही खूप मोठी चिंतेची बाब होती. रूग्णांची गरज ओळखून गीता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री हनुमंत (नाना) बनसुडे यांनी एल.जी.बनसुडे विद्यालयाच्या ८ वर्ग खोल्यांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन केला. आतापर्यंत येथे सुमारे ७० रूग्णांनी उपचार घेतले.पळसदेव  येथील डॉ.सुरज काळे यांनी विलगीकरण कक्षातील रुग्णांना दररोज मोफत तपासणी करून आवश्यक औषधोपचार मोफ...

इंदापुरसाठी पाणी देण्याचा आदेश रद्द केल्याने शेतकर्याच्या मनाता आक्रोश:हामा पाटिल

इमेज
  कौठळी गावामध्ये शेतकरी संघर्ष कॄती समितीच्या वतीने सोलापूरकरांचा जाहीर निषेध करून बोंबाबोंब आंदोलन. प्रतिनिधि महेश गडदे, इंदापुर। कौठळी गावामध्ये शेतकरी संघर्ष कॄती समितीच्या वतीने सोलापूरकरांचा जाहीर निषेध करून बोंबाबोंब आंदोलन केले.  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार खासदार सुप्रियाताई सुळे व महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री व सोलापूर जिल्हा पालकमंत्री दत्तात्रेय मामा भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याला 5 टिएमसी पाणी दिल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी विरोध करुन तुर्तास रद्द करण्यात भाग पाडल्याबद्दल कौठळी गावातील शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर निषेध केला . महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री व सोलापूर जिल्हा पालकमंत्री दत्तात्रेय मामा भरणे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले  या वेळी उपस्थित ह.भ.प माणिक महाराज मारकड,मा. पोलिस पाटील रामभाऊ पाटील इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडिया अध्यक्ष,हामा पाटील उपसरपंच सुनील खामगळ मा.सरपंच वसंत मारकड ग्रामपंचायत सदस्य हिरामण मारकड,अनिल पवार, नामदेव पाटील,आण्णा काळेल, संदीपान मारकड अशो...

कोरोनाची तिसरी लाट आल्यास बारामती किती सज्ज?

इमेज
  तिसरी लाटे साठी बारामती किती आहे सज्ज, प्रतिनिधि:महेश गडदे, कोरोनाची तिसरी लाट आल्यास बारामतीमध्ये करावयाच्या उपाययोजना -१) ऑक्सीजन बेड ची संख्या पाचशे ने वाढविणे यामध्ये रुई ग्रामीण रुग्णालय येथे 100 बेड, मेडिकल कॉलेज येथे 300 बेड व तालुक्यामधील पी एस सी मध्ये 100 बेड याबाबत लागणारे 50 डॉक्टर 100 सिस्टर यांचे नियोजन यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र यामधील डॉक्टर्स ,तसेच खाजगी डॉक्टर अधिग्रहीत करणे या प्रमाणे करता येईल.  २) बाल रुग्णालय- बारामती शहरांमध्ये तेरा बाल रुग्णालय आहे यामध्ये किमान 200 बेड यामध्ये 100 ऑक्सिजन व ४० व्हेंटिलेटर ची व्यवस्था ,पालकांना रूग्णालयात थांबनेची स्वतंत्र व्यवस्था, ३) डायलेसिस सेंटर- रुग्णांकरिता नर्सिंग स्कूल येथील एका रूम मध्ये स्वतंत्र तीन डायलेसिस बेडची व्यवस्था करावी  ४) प्रसूती रुग्णालय -शासकीय रुग्णालय रुई येथे डिलिव्हरी रूम व दहा बेडची स्वतंत्र व्यवस्था तसेच खाजगी हॉस्पिटल येथे किमान तीस बेडची व्यवस्था  ५)ऑक्सिजन व्यवस्था -शासकीय रुग्णालय मध्ये हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचे 5 टनाचे ऑक्सीजन प्लांट उभारणे तसेच प्रत्ये...

इथेनॉल पासून ऑक्सिजन निर्मितीचा देशातील पहिला यशस्वी प्रयोग

इमेज
  इथेनॉल पासून ऑक्सिजन निर्मितीचा देशातील पहिला यशस्वी प्रयोग, प्रतिनिधि- महेश गडदे, इथेनॉल पासून ऑक्सिजन निर्मितीचा देशातील पहिला यशस्वी प्रयोग उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्यात झाला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोना संक्रमण काळात उपचारासाठी लागणारा प्राणवायू फार मोलाचा असताना देशात तसेच राज्यात ऑक्सिजन निर्माण करण्याची क्षमता वाढवण्यासाठी आदरणीय खा. शरद पवार साहेबांनी इथेनॉल पासून ऑक्सिजन निर्मितीचा विचार साखर कारखान्यांकडे मांडला. या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्याने यात पुढाकार घेतला. पवार साहेबांनी आवाहन केल्यानंतर धाराशिव कारखान्याने हिंमत, धाडस दाखवले, पुढाकार घेऊन देशातला पहिला प्रकल्प सुरु केला, याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्यावतीने कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचे आभार व्यक्त करतो, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.    आदरणीय खा. शरद पवार साहेबांनी काही दिवसांपूर्वीच साखर कारखान्यांनी इथेनॉलपासून ऑक्सिजन निर्मिती करावी, असे आवाहन केले होते. पवार साहेबांनी...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोरोना संदर्भात महत्वपूर्ण बैठक,

इमेज
  कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक आज पुण्यात घेण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रतिनिधि- महेश गडदे, यावेळी जिल्ह्यातील कोरोना विषाणूची सद्यस्थिती, प्रशासनाच्या वतीनं करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसंच लसीकरण आदी विषयांबाबत माहिती जाणून घेतली. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुले बाधित होण्याची शक्यता गृहीत धरून राज्य शासन व प्रशासनाच्या वतीनं आरोग्य सुविधा आणखी सक्षम करण्यासाठी नियोजन करण्यात येत असून यादृष्टीनं जिल्ह्यात उपाययोजना कराव्यात, अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या. लहान बालकं बाधित झाल्यास आवश्यक ते उपचार वेळेत उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात येत आहे. याद्वारे लहान मुलांवरील उपचार मार्गदर्शन, प्रतिबंधात्मक औषधे, आवश्यक साधनसामग्री व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याबाबत तयारी करण्यात येत आहे. ससून रुग्णालय, यशवंतराव चव्हाण रुग्णालय, नायडू रुग्णालय या रुग्णालयांसह जिल्ह्यातील भारती हॉस्पिटल, सिम्बायोसिस हॉस्पिटल, रुबी हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अशा खाजगी रुग्णालयांनी देखील रुग्णालयात लहान म...

आज पुणे जिल्हा खरीप हंगाम तयारीच्या आढावा . उपमुख्यमंत्री अजित पवार,

इमेज
आज पुणे जिल्हा खरीप हंगाम तयारीच्या आढावा बैठकीत खरीप हंगामासाठी लागणारे बी बियाणे, खते, किटकनाशकांची उपलब्धता तसेच पीक कर्ज वाटपाबाबत आढावा घेतला.  प्रतिनिधी:महेश गडदे,   आज पुणे जिल्हा खरीप हंगाम तयारीच्या आढावा बैठकीत खरीप हंगामासाठी लागणारे बी बियाणे, खते, किटकनाशकांची उपलब्धता तसेच पीक कर्ज वाटपाबाबत आढावा घेतला.  खरीप हंगामामध्ये बी बियाणे, खते, किटकनाशके यांची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घ्यावी.  शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावं, एकही पात्र शेतकरी पिक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.  पुणे जिल्ह्यात २ लाख १९ हजार ७०० हेक्टर क्षेत्राचे खरीप हंगामासाठी नियोजन करण्यात आले आहे.  यामध्ये भात, ज्वारी, बाजरी, भुईमुग, मका, सोयाबीन यांचा समावेश आहे. शेतक-यांच्या मागणीप्रमाणे बियाणे, खते, कृषी निविष्टा यांची कमतरता भासणार नाही तसंच कृषी विभागानं बियाणे उपलब्धतेबाबत व बियाणांच्या गुणवत्तेबाबत अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावं.  तसंच खतांच्या व बियाणांच्या संदर्भात कोणत्याही शेतकऱ्याची तक्रार येणा...

पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी वेषांतर करून केली शहराची पाहणी

इमेज
  पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी वेषांतर करून केली शहराची पाहणी पिंपरी, दि.०६ (पीसीबी) : वेषांतर करून पोलीस गुंडाना पकडतात वेगवेगळे काळे धंदे उघडकीस आणतात .. असं आपण फक्त सिनेमात पाहिलं होत .. पण प्रत्येक्षात मात्र ते घडलय … आणि कुठे तर आपल्या पिंपरी चिंचवड शहरात … पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश सध्या वेषांतर करून शहरात फिरतायत .. त्यामुळे नसते उद्योग करणाऱ्यांचे धाबे मात्र दणाणल्याशिवाय राहणार नाही … पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आपल्या धडाकेबाज कारवायांसाठी प्रसिद्ध आहेत. याआधी त्यांनी अहमदनगरमध्ये गुन्हेगार टोळ्यांवर जी कारवाई केली त्यानंतर त्यांचं नाव महाराष्ट्रभरात चर्चेत होते.. सध्या शहरामध्ये कोरोनाने जसा उचांक गाठलाय तसेच या महामारीत आपला हाथ साप करून घेणाऱ्यांची देखील मजल वाढलीये … त्याच अनेक काळे धंदे करणाऱ्यांच्या अनेक गोष्टी या आयुक्तांच्या कानावर गेल्या आणि त्यांनी हि अनोखी युक्ती लढवली … आता या सगळ्या नाट्यात त्यांना नेमके कशा कशाचे धागेदोरे सापडले हे अजूनही गुलदस्त्यात आहे .. पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश बुधवारी रात्री चक्क वेशांतर करून मिया जमा...

मला बारामतीत १५ दिवस संपूर्ण कडकडीत बंद पाहिजे ! अजितदादांची कडक सूचना ;

इमेज
  मला बारामतीत १५ दिवस संपूर्ण कडकडीत बंद पाहिजे !  अजितदादांची कडक सूचना ;  बारामतीचे प्रशासनाकडून युद्धपातळीवर बैठकांना सुरुवात कोणत्याही क्षणी निर्णय येणार, प्रतिनिधी-महेश गडदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला बारामती तालुक्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीचा आढावा प्रशासनास कडक निर्बंध लावण्याबाबतचे पूर्ण अधिकार दिले आहेत. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून आतापासूनच काटेकोर नियोजन करा. बारामती तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून आतापासूनच काटेकोर नियोजन करा. ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन बारामतीत ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणीवर भर द्यावा, रेमडीसीवर इंजेक्शनचे योग्य प्रकारे नियोजन करा. बारामती तालुक्यातील सुपे येथे कोविड सेंटर उभारण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी, तालुक्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासोबतच कोरोना चाचणी, रुग्णवाहिका व्यवस्थापन, रुग्णालयातील बेड व्यवस्थापन आणि डॉक्टर याबाबतचे नियोजन करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकम...