इंदापुरसाठी पाणी देण्याचा आदेश रद्द केल्याने शेतकर्याच्या मनाता आक्रोश:हामा पाटिल
कौठळी गावामध्ये शेतकरी संघर्ष कॄती समितीच्या वतीने सोलापूरकरांचा जाहीर निषेध करून बोंबाबोंब आंदोलन.
प्रतिनिधि महेश गडदे, इंदापुर।
कौठळी गावामध्ये शेतकरी संघर्ष कॄती समितीच्या वतीने सोलापूरकरांचा जाहीर निषेध करून बोंबाबोंब आंदोलन केले.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार खासदार सुप्रियाताई सुळे व महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री व सोलापूर जिल्हा पालकमंत्री दत्तात्रेय मामा भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याला 5 टिएमसी पाणी दिल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी विरोध करुन तुर्तास रद्द करण्यात भाग पाडल्याबद्दल कौठळी गावातील शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर निषेध केला .
महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री व सोलापूर जिल्हा पालकमंत्री दत्तात्रेय मामा भरणे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले
या वेळी उपस्थित ह.भ.प माणिक महाराज मारकड,मा. पोलिस पाटील रामभाऊ पाटील इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडिया अध्यक्ष,हामा पाटील उपसरपंच सुनील खामगळ मा.सरपंच वसंत मारकड ग्रामपंचायत सदस्य हिरामण मारकड,अनिल पवार, नामदेव पाटील,आण्णा काळेल, संदीपान मारकड अशोक राऊत,राजू पिसाळ, सोमनाथ पाटोळे, संदीप चितारे, महादेव मोरे, बापू खामगळ,भारत यमगर, अविनाश मारकड,जिगर मारकड,आरीफ पठाण,दिपक माने,अमर जाधव,रुषिकेश मारकड,सागर पाटोळे, रमेश पाटोळे, अमित पाटील, अंकुश चितारे, पांडुरंग यमगर, नामदेव खामगळ, अभिजीत खामगळ शिवाजी खामगळ व अनेक शेतकरी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा