इथेनॉल पासून ऑक्सिजन निर्मितीचा देशातील पहिला यशस्वी प्रयोग

 इथेनॉल पासून ऑक्सिजन निर्मितीचा देशातील पहिला यशस्वी प्रयोग,


प्रतिनिधि- महेश गडदे,

इथेनॉल पासून ऑक्सिजन निर्मितीचा देशातील पहिला यशस्वी प्रयोग उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्यात झाला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोना संक्रमण काळात उपचारासाठी लागणारा प्राणवायू फार मोलाचा असताना देशात तसेच राज्यात ऑक्सिजन निर्माण करण्याची क्षमता वाढवण्यासाठी आदरणीय खा. शरद पवार साहेबांनी इथेनॉल पासून ऑक्सिजन निर्मितीचा विचार साखर कारखान्यांकडे मांडला. या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्याने यात पुढाकार घेतला. पवार साहेबांनी आवाहन केल्यानंतर धाराशिव कारखान्याने हिंमत, धाडस दाखवले, पुढाकार घेऊन देशातला पहिला प्रकल्प सुरु केला, याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्यावतीने कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचे आभार व्यक्त करतो, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. 

 

आदरणीय खा. शरद पवार साहेबांनी काही दिवसांपूर्वीच साखर कारखान्यांनी इथेनॉलपासून ऑक्सिजन निर्मिती करावी, असे आवाहन केले होते. पवार साहेबांनी आवाहन केल्यानंतर धाराशिव कारखान्याने यात बाजी मारून हा प्रकल्प हाती घेतला आणि पूर्ण केला. केवळ १७ दिवसांत या ऑक्सिजन निर्मिती प्लांटची उभारणी केली. त्याबद्दल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी कौतुक केले. तसेच धाराशिव कारखान्याप्रमाणे इतर साखर कारखान्यांनी देखील हा प्रकल्प राबवावा असे आवाहन अजितदादा यांनी केले. उस्मानाबाद जिल्ह्याला सध्या दररोज १५ टन ऑक्सिजन लागत आहे. या प्रकल्पामुळे २० टन ऑक्सिजन निर्माण होणार असल्यामुळे जिल्ह्याची गरज तर पूर्ण होईलच शिवाय आणखी बेड वाढविण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असेही ते म्हणाले. 


उद्घाटन कार्यक्रमास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील, आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे, उस्मानाबादचे पालक मंत्री ना. शंकरराव गडाख, उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलासदादा पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील व्हिडिओ कॉन्फरन्सवर उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.