पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९६ वी जयंती श्री क्षेत्र बाबीर देवस्थान येथे साजरी,
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९६ वी जयंती श्री क्षेत्र बाबीर देवस्थान येथे साजरी,
इंदापुर प्रतिनिधि-महेश गडदे,
आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९६ वी जयंती श्री क्षेत्र बाबीर देवस्थान येथे साजरी करण्यात आली, व श्री क्षेत्र बाबीर बुवा देवस्थान परिसरातील स्वच्छता झाडेझुडपे काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला, यावेळी रूई ग्रामपंचायत सरपंच यशवंतराव कचरे श्री बाबीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अजितसिंह पाटील मा.सरपंच व विद्यमान सदस्य विष्णू मारकड सर, कडबनवाडीचे मा.सरपंच भजनदास पवार सर, थोरातवाडीचे पोलीस पाटील नानासाहेब थोरात, बाबीर देवस्थान ट्रस्ट चे उपाध्यक्ष बाळासाहेब भगत भ्रष्टाचार निर्मूलन चे जिल्हाध्यक्ष जनार्दन पांढरमिसे, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष आबासाहेब थोरात, उपसरपंच मगन मराडे,माजी चेअरमन अंकुशराव लावंड दिपक मारकड सागर मारकड, जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे सरचिटणीस अविनाश मोहिते सचिव शंकरराव मारकड, विष्णू मारकड गुरूजी, मोहन भगत, इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते,
यावेळी देवस्थान परिसरामध्ये स्वच्छता करण्यासाठी ट्रॅक्टर व जेसीबी स्वतः डिझेल टाकून परिसर स्वच्छ करण्याचे काम बाबीर अर्थमूव्हर्सचे प्रमुख'जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य गणपतराज मारकड यांच्याकडून सुरू केले आहे
श्री बाबिरनगरी ऑक्सिजन पार्क प्रत्यक्षात उभा राहण्यासाठी परिसरातील व इतर सर्व ग्रामस्थ भाविक यांनी मदत करू आणि आपण हे उभा करू अशा पद्धतीचा आत्मविश्वास रूई ग्रामपंचायत बाबीर देवस्थान व ग्रामस्थ, यांना दिला आहे,
ग्रामपंचायत रूई, बाबीर देवस्थान व ग्रामस्थ बाबीर भक्त, यांच्या माध्यमातून हा श्री बाबीरनगरी ऑक्सीजन पार्क उभा राहील अशी माहिती, 'जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तानाजीराव मारकड यांनी दिली,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा