कोरोनाची तिसरी लाट आल्यास बारामती किती सज्ज?
तिसरी लाटे साठी बारामती किती आहे सज्ज,
प्रतिनिधि:महेश गडदे,
कोरोनाची तिसरी लाट आल्यास बारामतीमध्ये करावयाच्या उपाययोजना -१) ऑक्सीजन बेड ची संख्या पाचशे ने वाढविणे यामध्ये रुई ग्रामीण रुग्णालय येथे 100 बेड, मेडिकल कॉलेज येथे 300 बेड व तालुक्यामधील पी एस सी मध्ये 100 बेड याबाबत लागणारे 50 डॉक्टर 100 सिस्टर यांचे नियोजन यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र यामधील डॉक्टर्स ,तसेच खाजगी डॉक्टर अधिग्रहीत करणे या प्रमाणे करता येईल.
२) बाल रुग्णालय- बारामती शहरांमध्ये तेरा बाल रुग्णालय आहे यामध्ये किमान 200 बेड यामध्ये 100 ऑक्सिजन व ४० व्हेंटिलेटर ची व्यवस्था ,पालकांना रूग्णालयात थांबनेची स्वतंत्र व्यवस्था,
३) डायलेसिस सेंटर- रुग्णांकरिता नर्सिंग स्कूल येथील एका रूम मध्ये स्वतंत्र तीन डायलेसिस बेडची व्यवस्था करावी
४) प्रसूती रुग्णालय -शासकीय रुग्णालय रुई येथे डिलिव्हरी रूम व दहा बेडची स्वतंत्र व्यवस्था तसेच खाजगी हॉस्पिटल येथे किमान तीस बेडची व्यवस्था
५)ऑक्सिजन व्यवस्था -शासकीय रुग्णालय मध्ये हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचे 5 टनाचे ऑक्सीजन प्लांट उभारणे तसेच प्रत्येक खाजगी रुग्णालयामध्ये,स्वतंत्रपणे ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारणे, व सुमारे २५ टन साठवण व्यवस्था
६) कोविड केअर सेंटर - बारामती तालुक्यातील प्रत्येक गटामध्ये एक अशी एकूण सहा सेंटर करावी,
७) विलगीकरण केंद्र- प्रत्येक गावांमध्ये शाळा इमारतीत मध्ये सौम्य लक्षण व विलगिकरन कालावधी पूर्ण करण्याकरता रुग्णांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी विलगीकरण केंद्र करण्यात यावे,
८) औषधे व इंजेक्शने -ही शासन स्तरावरून उपलब्ध करून घेण्यात यावी ,तसेच लहान मुलांसाठी ची औषधे गोळ्या इंजेक्शन हे लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या डोसेसच्या प्रमाणा मधील मागून घेण्यात यावी,
९) स्वब तपासणी केंद्र - बारामती शहरांमध्ये सर्वे नंबर दोनशेवीस येथे, तांदुळवाडी, मालेगाव कॉलनी उपकेंद्र येथे व तालुक्यामध्ये प्रत्येक गटांमध्ये एक असे आणखी सहा एकंदर 9 केंद्र स्थापन करण्यात यावे
१०) लसीकरण केंद्र- बारामती शहरातील प्रत्येक प्रभागासाठी एक अशी एकूण १९ व तालुक्यामध्ये प्रत्येक गटामध्ये दोन असे एकूण १२ व पूर्वीची 30 अशी एकूण ६१ केंद्रे करण्यात यावी
११) सर्वेक्षण व इतर- यामध्ये शहर व प्रत्येक गावांमध्ये शिक्षक व अंगणवाडी शिक्षिका यांचेकडून नागरिकांची तपासणी तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व विलगीकरण याबाबत माहिती संकलित करण्याचे काम करावे
१२) आरोग्य स्वच्छता- बारामती शहर प्रत्येक प्रभाग,व तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये जंतूनाशक फवारणी यंत्रणा, स्वच्छता मोहीम व अतिरिक्त जैव-वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्या संदर्भाचे नियोजन
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा