इंदापुर:पळसदेव,शासनाचे मोफत स्वस्त धान्य वितरण करण्यात आले,
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
-
इंदापुर:पळसदेव,शासनाचे मोफत स्वस्त धान्य वितरण करण्यात आले,
पळसदेव माळेवाडी मधील गीता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री हनुमंत.
इंदापुर प्रतिनिधि-महेश गडदे,
(नाना) बनसुडे यांच्या सूचनेनुसार सहकारी शिवाजी फुले यांच्या मदतीने लाभार्थ्यांना घरपोच धान्य वाटप करण्यात आले. येथील ग्रा.पं सदस्य सुभाष बनसुडे व ग्रा.पं सदस्य विशाल बनसुडे यांच्या सहकार्याने माळेवाडी व शिंदेवस्तीतील १२२ लाभार्थ्यांना मे महिन्यातील गहू व तांदूळ एका दिवसात मोफत धान्याचे घरपोच वाटप केले. तालुक्यात घरपोच धान्य पोहोच करणारे हे एकमेव दुकान ठरल्याचा दावा करण्यात येत आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून माळेवाडी व शिंदेवस्ती येथे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत होती.
ही खूप मोठी चिंतेची बाब होती. रूग्णांची गरज ओळखून गीता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री हनुमंत (नाना) बनसुडे यांनी एल.जी.बनसुडे विद्यालयाच्या ८ वर्ग खोल्यांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन केला.
आतापर्यंत येथे सुमारे ७० रूग्णांनी उपचार घेतले.पळसदेव येथील डॉ.सुरज काळे यांनी विलगीकरण कक्षातील रुग्णांना दररोज मोफत तपासणी करून आवश्यक औषधोपचार मोफत केले.
तसेच डॉ.अशोक होरणे यांनी ही मोफत वैद्यकीय सेवा दिली. प्राथमिक आरोग्य केंद्रांचे डॉ जाधवर ,कांबळे सिस्टर व अन्य सहकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले तसेच ग्रामपंचायत, तलाठी,पोलीस पाटील यांचे मार्गदर्शन लाभले यासाठी येथील अंकुश बनसुडे ,धनाजी बनसुडे, सुभाष बनसुडे, विशाल बनसुडे, सुरेश बनसुडे, लक्ष्मण बनसुडे, योगेश बनसुडे, संदीप शिंदे, नितिन बनसुडे यांनी आर्थिक व वस्तूच्या स्वरूपात मदत केली.
कैलास होले यांनी विलगीकरण कक्षाच्या ठिकाणी मुक्कामी राहून सर्व रुग्णांना स्वच्छतेचे सिहित्य व पाणी पुरवठा केला. ग्रामपंचायत पळसदेव सरपंच व उपसरपंच यांच्या सहकार्याने माळेवाडी येथे खंडू बनसुडे यांच्या स्वतःच्या ट्रॅक्टरने मोफत औषध फवारणी केली.
सध्या कोरोना महामारीमुळे अडचणीत असलेल्या लोकांना जेवढी शक्य होईल तेवढी मदत करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे यावेळी हनुमंत बनसुडे यांनी सांगितले. समाजातील प्रत्येकाने पुढे येवून एकमेकांना धीर व मदतीचा हात दिल्यास या संकटातून सुखरूप बाहेर पडणे शक्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Zee महाराष्ट्र न्यूज. इंदापूर - महेश गडदे. इंदापूर.ता.०१: संपूर्ण महाराष्ट्र सह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान इंदापूर रुई येथील श्री बाबीर देवाचा यात्रा महोत्सव शनिवार (दि.०२) पासून प्रारंभ होणार आहे. यांत्रेची सांगता सोमवार (दि.०४) होणार आहे. ऑक्टोंबर शुक्रवार (दि.२५) सकाळी ११ वा बाबीर देवाची घटस्थापना देवाचे मानकरी आप्पा थोरात व मधु थोरात यांच्या हातून झाली. बाबीर देवाच्या यात्रेसाठी महाराष्ट्र सह देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी रुई ग्रामपंचायत व देवस्थान कडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. बाबीर देवाच्या यात्रेमध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यात्रेमध्ये अनेक दिग्गज नेते मंडळी हजेरी लावणारा आहेत अशी माहिती बाबीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अजितसिंह पाटील यांनी दिली आहे. बाबीर देवाच्या यात्रेमध्ये विविध ठिकाणाहून लाखो भाविक येतात सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, त्यामुळे बाबीर देवाच्या दर्शनासाठी इंदापूरसह राज्यभरातील मोठ मोठे दिग्गज व राजकीय नेते मंडळी यात्रेमध्ये हजेरी लावून बाबीर देवाचे दर्शन घेणार...
सुरवड (ता. इंदापूर) येथे प्रचार सभेत बोलताना हर्षवर्धन पाटील. • महिलांना मोफत एसटी प्रवास! •18 वर्षे पूर्ण झालेवर मुलीस देणार रु. 1लाख •महिलांना वर्षाला 500 रुपयात 6 सिलेंडर Zee Maharashtra News,- Mahesh Gadade. इंदापूर.ता.१२: राज्यात निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे. आमचे सरकार सत्तेवर आलेनंतर महालक्ष्मी योजना सुरु करून महिलांच्या बँक खात्यात प्रति महिना रु. 3000 प्रमाणे रक्कम जमा करणार आहे. तसेच महिलांना मोफत एसटी प्रवास, मुलींना 18 वर्षे पूर्ण झालेवर रु. 1लाख रक्कम व महिलांना वर्षाला 500 रुपयात 6 सिलेंडर देण्याचे जाहीरनाम्यात जाहीर केले आहे. आमचे महाविकास आघाडी सरकार हे महिला भगिनींचे सरकार असणार आहे, असे स्पष्ट प्रतिपादन इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे व महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे. हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (दि.12) सुरवड, पिंपरी बु., लाखेवाडी, निरवांगी, वरकुटे खु. या गावांचा झंझावती प्रचार दौरा केला. या दौऱ्यात सुरव...
अपक्ष उमेदवार प्रविण माने यांना स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिति (दिल्ली) यांचा पाठींबा. Zee Maharashtra News. mahesh gadade. इंदापूर.ता.१४: इंदापुर -२०० विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार प्रविन (भैया) माने यांनी राजकारण व समाजकारणात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे व सर्वसामान्य जनतेच्या हाकेला धाऊन जानारे एक युवा नेतृत्व म्हणून जनसामान्यात त्यांनी आपली एक वेगळी प्रतीमा तयार केली आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिति (दिल्ली) चे राष्ट्रीय अध्यक्ष दत्तात्रेय मांजरेकर यांच्या आदेशावरुन इंदापूर विधानसभेचे परिवर्तन विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. इंदापुर तालुक्याच्या वतीने स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेयर समिति (दिल्ली) यांच्या कडुन समिति चे पदाधिकारी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सागरभाऊ लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन विकास आघाडीचे उमेवार प्रवीण (भैया) माने तसेच पदाधिकारी यांच्या असंख्य कार्यकरत्यांच्या उपस्थितीत जाहिर पाठींबा देण्यात आला त्या वेळी स्वराज्य...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा