विश्रामगृह, इंदापूर येथे राज्यमंत्री.दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक.

विश्रामगृह, इंदापूर येथे राज्यमंत्री.दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक. इंदापुर . दि; प्रतिनिधि; महेश गडदे . ज शासकीय विश्रामगृह, इंदापूर येथे राज्यमंत्री मा.ना.श्री.दत्तात्रय (मामा) भरणे यांनी तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून कोरोना विषाणूच्या संसर्गाचा व सद्यस्थितीचा आढावा घेतला. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. सणासुदीचे दिवस येत आहेत. नागरिकांनी खरेदीसाठी बाहेर पडताना स्वतःची पुरेपूर काळजी घ्यावी. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे झाले पाहिजेत. पंचनाम्यापासून कुणीही वंचित राहू नाही तसेच शेतकऱ्यांना लवकरात- लवकर शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती यावेळी राज्य मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली आहे. यावेळी इंदापुर तहशिलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी विजय कुमार परीट, सहायक पोलिस निरिक्षक पवार. व आदी पदाधिकारी उपस्थित होते.