पर्यावरण संवर्धनातुन ग्राम स्वराज्य निर्माण करणारे समाज सुधारक : भजनदास पवार.

               निसर्गप्रेमी 'व्यक्तिमत्व  भजनदास पवार त्यांच्या समवेत तानाजी मारकड.

इंदापुर दि.प्रतिनिधि  महेश गडदे.

सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना माझ्या मनाला भावलेलं व्यक्तिमत्व 'जल,वन,माती, या 'नैसर्गिक साधनसंपत्तीवर सखोल अभ्यास करून कार्य करणारे 'पृथ्वीवरील प्रत्येक जीवाबद्दल मनामध्ये करूणा, प्रेम, आपुलकी ,असणारे निसर्गप्रेमी 'व्यक्तिमत्व म्हणजे 
भजनदास पवार सर,
पवार सरांबद्दल सांगायचं झालं तर "माझे जेवढे वय आहे, 'तेवढे सरांचे 'लोककल्याणासाठी योगदान आहे,
भजनदास पवार सरांचे गाव कडबनवाडी '
'श्री क्षेत्र बाबीरदेव देवस्थान पासून चार किलोमीटर अंतरावर असणारे कडबनवाडी 'इंदापूर तालुक्यातील कमी पर्जन्यमान असणारे गाव
'सरांच्या लहानपणापासून हे गाव मुख्य'प्रवाहा पासून दूर होते, 'आपले गाव व गावातील गावकऱ्यांची जगण्यासाठीची धरपड सरांनी लहानपणापासून जवळून पाहिली होती, ही स्थिती बदलण्याचे सरांनी कॉलेज .जीवनापासून ठरवले होते पुढे या 'ध्येयवेड्या, माणसाने .समविचारी सहकाऱ्यांच्या साथीने गाव 'स्वावलंबी, करण्याचा संकल्प केला, व प्रत्येक्ष सुरुवात केली
'त्यांनी जवळपास ११० मातीचे बांध, २७ पक्के सिमेंट बंधारे, आणि तीन मोठे पाझर तलाव, 'लोकसहभागातून, श्रमदानातून, निर्माण केले, 'गावातील ओढ्याचे तीन किलोमीटर लांबीचे* *'खोलीकरण, रुंदीकरण केले 'सरांनी २००५ ते २०१० या कार्यकाळांमध्ये गावचे सरपंच पद भूषवले 'सरपंच पदाच्या कारकीर्दीत गावांमध्ये अनेक लोककल्याणकारी निर्णय सरांनी घेतले, 'पदभार हाती घेतल्यानंतर त्यांनी आपले गाव 'महाराष्ट्र शासनाच्या आदर्श गाव योजनेत सहभागी केले, 
'त्यांनी आपल्या गावाच्या सभोवताली असणाऱे ओढे- नाले  गाळमुक्त केले, डोंगरावर वृक्षारोपण केले, व 'संपूर्ण गावामध्ये 'पाणी आडवा, 'पाणी जिरवा, ही घोषणा करून ती कृतीत आणली, 'पावसाच्या पाण्याचा पडणारा प्रत्येक थेंब सरांनी जमिनीमध्ये जिरवला, यामुळे ' कडबनवाडीच्या सभोवताली असणाऱ्या 'डोंगरांनी हिरवी शाल पांघरली,
सरांनी हे सर्व गावांमध्ये करत असताना 'ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे, आदर्श गाव योजनेचे 'कार्याध्यक्ष, हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांना आपल्या गावांमध्ये निमंत्रित केले,'त्यांच्याकडून सरांनी ग्रामविकासाचे धडे घेतले, व त्यांच्या मार्गदर्शनाने आपले कार्य पुढे जोमाने सुरू ठेवले,
त्यामुळे गावातील 'नागरिकांमध्ये नवचैतन्य आले शेती पिकू लागली, ओढे खळखळून वाहू लागले, सगळीकडे पाण्याची पातळी वाढली, जनावरांसाठी भरपूर पाणी मिळू लागले, शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय, पशूपालन, चांगल्या पद्धतीने करता येऊ लागला, पाण्याची पातळी वाढल्यामुळे सर्व गावाशेजारी असणारे डोंगर हिरवेगार झाले, वृक्षारोपण झाले, पक्ष्यांचा किलबिलाट होवू *लागला,  'सर्वत्र नवचैतन्य पसरले त्यामुळे 'सुशिक्षित, अभ्यासू ,सुसंस्कृत ,नागरिक घडू लागले, गावाचे अर्थकारण बदलले, गावची,सामाजिक ,आर्थिक, शैक्षणिक ,प्रगती होऊ लागली हे सर्व होण्यासाठी पवार सरांनी पुढाकार घेऊन आपले योगदान दिले, या योगदानाबद्दल वनराई मित्र मंडळ अमरावती या संस्थेचा राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्कार २०१९ हा पुरस्कार सरांना महाराष्ट्र 'राज्याचे वन 'राज्यमंत्री, नामदार दत्तात्रय (मामा) भरणे, व आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला,
आदरणीय पवारसर सध्या महाराष्ट्र शासनाच्या जल साक्षरता अभियानामध्ये पुणे जिल्ह्याची जबाबदारी सक्षम पणे पार पाडत आहेत, 'जलसंधारणा मध्ये 'दिशादर्शक, कार्य करत आहेत  पर्यावरणावर  प्रेम करणारे हजारों कार्यकर्ते घडवण्याचा प्रयत्न करत आहेत ,
       ''मी पाहीलेला "ऑक्सिजन पार्क,,
*'माझा सहकारी अविनाश मोहिते, व मी दोन दिवसांपूर्वी सरांनी २९/८/२०२० रोजी सुरू 'केलेला लोकसहभागातून वृक्ष लागवड हा नाविन्यपूर्ण उपक्रम, 'महाराष्ट्र शासनाच्या वनजमिनीमध्ये कडबनवाडी येथे साकारणारा महाराष्ट्र राज्यातील पहिला ऑक्सीजन पार्क, (शांतीबन) उभारण्याचा संकल्प सरांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे, मी ते शांतीबन पाहिले, व "खरंच 'शांत होऊन वेगळ्याच भावविश्वात हरवून गेलो,
'माझ्या मनात आले की या भागातील नागरिकांना, पर्यावरण प्रेमींना, आता 'ज्येष्ठ 'समाजसेवक अण्णासाहेब हजारे, पोपटराव पवार यांनी 'लोकसहभागातून वनराई कशी उभारली हे पाहण्यासाठी 'राळेगणसिद्धी, व हिवरे बाजार, येथे जाण्याची गरज भासणार नाही,
कारण कडबनवाडी मध्ये भजनदास पवार सर यांच्या पुढाकारातून ,लोकसहभागातून, साकारतोय 'राज्यातील पहिला 'वन जमीनीमध्ये उभा राहणारा 'ऑक्सिजन पार्क,
खरंच भजनदास पवार सरांनसारखे गावच्या विकासाचे व्हिजन असणारी 'दूरदृष्टी, असणारी 'पर्यावरणावर जीवापाड प्रेम करणारी, 'कर्तुत्ववान, ध्येयवेडी माणसे,'महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये, 'सरपंच पदी, विराजमान झाली, तर खरंच महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक गाव व्यसनमुक्त, हागणदारी मुक्त, पाणीदार , 'आर्थिक सक्षम, स्वयंपूर्ण होईल,
 आदरणीय भजनदास पवार सर यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन, आम्हीही 'श्री क्षेत्र बाबीर देवस्थान परिसरामध्ये असणाऱ्या 'वन जमिनी मध्ये अशा पद्धतीच्या वृक्षांची लागवड करून, वनराई उभा करण्याचा संकल्प केला आहे,
'श्री बाबीर देवाच्या 'कृपाशीर्वादाने परिसरातील सुजाण, पर्यावरण प्रेमी, सामाजिक,भान असणाऱ्या, देशावर, राज्यावर प्रेम करणाऱ्या, सुजान  नागरिकांच्या सहकार्याने 'भविष्यामध्ये नक्कीच आदर्श वनराई उभा करू 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.