सामुहिक, लोकसहभागातून ग्रामस्वराज्य निर्माण होईल, तानाजी मारकड

 सामुहिक, लोकसहभागातून ग्रामस्वराज्य निर्माण होईल,

  तनाजी मारकड.

'देशाला स्वातंत्र्य होवून ७० वर्ष होऊन गेली तरीही ही गावे  जीवनावश्यक गरजांनसाठी संघर्ष करत आहेत, 'महात्मा गांधींनी स्वातंत्र्यपूर्वी सांगितले होते 'खेड्याकडे चला, खेडी स्वयंपूर्ण झाली तर, देश बलशाली बनेल, 'गावे स्वयंपूर्ण बनण्यासाठी गावातील ग्रामपंचायत व्यवस्थापन कार्यकारणी घटनात्मक पदाचे प्रमुख व इतर समित्यांचे अध्यक्ष ,व नागरिक ,हे उच्च ध्येयाने प्रेरित झालेले असावेत, प्रत्येकाकडे गावासाठी काहीतरी करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असली पाहिजे, 'आपल्या गावाचा नावलौकिक करण्यासाठी आपले कर्तृत्व पणाला लावण्याची इच्छा प्रत्येक लोकप्रतिनिधी कडे  असल्यावर 'गावातील नागरिक या सर्वांचे अनुकरण नक्कीच करतील, व ' सर्वांच्या योगदानाने नक्कीच 'महात्मा गांधींच्या स्वप्नातील खेडी  स्वयंपूर्ण  होतील,

'यामध्ये महत्वाची गोष्ट

'गावामध्ये येणारा केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा, जिल्हा परिषदेचा,व इतर सर्व प्रकारचा,

 'निधी आहे व गावाच्या उत्पन्नातून मिळणारा निधी, त्यातून होणारी कामे ही दर्जेदार असली पाहिजेत, कामे दर्जेदार क्वालिटीची असली, तर गावाचा विकास दर्जेदार होतो गावाच्या वैभवात भर पडते,

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी काशीपासून कन्याकुमारीपर्यंत हजारो वर्षांपूर्वी बांधलेली मंदिरे विहिरी, घाट, अन्नछत्र व इतर सर्वच वास्तू आजही हजारो वर्षानंतर आहे त्याच स्थितीमध्ये लोकांच्या सेवेमध्ये आहेत,

छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गड, किल्ले, आजही निधड्या छातीने सह्याद्रीच्या कडेकपारी अभिमानाने उभे आहेत,

'मग महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये लोकप्रतिनिधींनी केलेली विकास कामे काही महिन्यांमध्ये उध्वस्त कशी होतात... ती नामशेष कशी होतात...

'तर त्यामागे  एक कारण आहे 'आजचे लोकप्रतिनिधी म्हणजे विकासाची पोकळ स्वप्न दाखवून दिशाभूल करून सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता हे समीकरण प्रत्यक्षात आणण्यासाठी 'महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात,गावामध्ये सत्ताधीशांनी गावगुंड पाळलेले असतात, 'त्यामुळे लाखो रुपये निधीची कामे हजारात होतात, व काही कालावधीमध्ये ती नामशेष होतात...

'याला कारणीभूत कोण तर गावातील झोपलेले नागरिक व निष्क्रिय प्रशासन याला जबाबदार आहे....

'हे कुठेतरी थांबले पाहिजे हे थांबण्यासाठी ह्या सर्व अनिष्ट गोष्टींना पायबंद घालण्यासाठी 'प्रत्येक गावातील सुशिक्षित नागरिक महिला, पुरुष शालेय मुले, यांनी गावाच्या विकासामध्ये योगदान देण्यासाठी प्रत्येक 'ग्रामसभेला,हजर राहिले पाहिजे आणि संबंधित कामाच्या संदर्भात संबंधित ठेकेदाराला संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराला  व पुढाऱ्याने  पाळलेल्या गावगुंडांना याचा जाब विचारला पाहिजे,

दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी गावातील प्रत्येक नागरिकांनी एक दिलाने लढा उभा केला पाहिजे आणि गावाच्या विकासामध्ये दर्जेदार विकास होण्यासाठी योगदान दिलं तर गावाच्या वैभवामध्ये भर पडेल  व देदीप्यमान विकास होईल,

महाराष्ट्रामध्ये काही सर्वच लोकप्रतिनिधी अशा गोष्टी करतात असे माझे मत नाही

'काही आहेत निष्ठेने राज्यघटनेला स्मरून आपलं कर्तव्य पार पाडणारे लोकप्रतिनिधीही या 'महाराष्ट्रामध्ये आहेत प्रत्येक गावामध्ये असणारे गावातील प्रतिष्ठित नागरिक, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांनी "जसं आपलं कुटुंब, "तसं कुटुंबांमध्ये कोणतीही बोगस गोष्ट कोण करत असेल तर, 'कुटुंबातील प्रत्येक नागरिक त्यासाठी सतर्क असतो,

 तसंच प्रत्येकाने आपल्या गावामध्ये कोण वेगळ्या पद्धतीने अन्यायकारक निकृष्ट गोष्ट करत असेल, तर सर्वांनी "कुटुंब, म्हणून आपल्या गावासाठी गावच्या विकासात योगदान देण्यासाठी एकत्र आलं पाहिजे, 'सर्वांनी गाव हे माझं कुटुंबच आहे हे आपल्या मनावर बिंबवून गावच्या विकासात योगदान दिले पाहिजे, 'जर प्रत्येक नागरिकांने अशा पद्धतीने गावच्या विकासात कारण योगदान दिलं तर महाराष्ट्रातील गावे नक्कीच  'राळेगणसिद्धी, हिवरेबाजारसारखी, स्वयंपूर्ण बलशाली होतील,

'छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातील एक वाक्य आहे


"राजा कालस्य कारणम्,,

राजा हा काळाला कारणीभूत असतो तो काळ प्रगतीचा असो वा अधोगतीचा असो, त्याला राजा कारणीभूत असतो,

तसाच गावच्या प्रगतीला गावच्या अधोगतीला गावातील नागरिक ग्रामपंचायत व्यवस्थापन, घटनात्मक पदाधिकारी हे सर्व गावाच्या आहे त्या स्थितीला कारणीभूत असतात,

              

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.