निमगांंव केतकी कोविंड सेंटरमधील धक्का दायक प्रकार गोळ्या चोरीप्रकरण आलं समोर दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा - अँड.राहुल मखरे
गोळ्या चोरी करणार्या दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा - अँड.राहुल मखरे
इंदापुर -निमगांव केतकी:दि.
प्रतिनिधि -महेश गडदे.
इंदापुर -निमगांव केतकी येथील कोविड सेंटरमधून कोविड रुग्णांच्या उपचाराकरिता देण्याकरीता आणलेल्या या अत्यावश्यक व दुर्मिळ औषध असलेल्या फॅबीफ्लू नावाची गोळी तेथीलच कर्तव्य बजावत असलेल्या डॉक्टरांनी चोरुन नेल्या.हे प्रकरणी उघडकीस आल्यावर त्यासंबंधी तक्रार दाखल केल्यानंतरही दोषींवर अद्यापपर्यंत कारवाई का नाही ? असा सवाल करत या दोषींना वाचविणारा झारीतील शुक्राचार्य कोण ? असा प्रतिसवाल अँँड. राहुल मखरे यांनी केला.
बहुजन मुक्ती पार्टीच्या बाबासाहेब भोंग हे या गोळी चोरीप्रकरणातील दोषींवर कारवाई करावी याकरिता आमरण उपोषणास बसले आहेत.
अँँड.राहुल मखरे यांनी निमगांव-केतकी येथील कोविड सेंटरच्या गलथान कारभाराचा पर्दाफाश केला. ते म्हणाले की,निमगांव-केतकी कोविड सेंटर मधील रुग्णांचा मृत्यू दर हा ८ टक्के आहे. हा मृत्यूदर हा सर्वात जास्त असून ही जगातील सर्वात वाईट व गंभीर परिस्थिती या कोविड सेंटरची आहे.
निमगांव केतकी कोविड सेंटरमध्ये दि. १५ आँक्टोंबर पर्यंत १९० कोरोनाचे रुग्ण दाखल करण्यात आले होते.
अश्या स्थितीत या कोविड सेंटरमधून दि. ६ आँक्टोंबर रोजी फॅबीफ्लू या तेथील कोरोना रुग्णांना देण्याकरिता असलेल्या या गोळ्या चोरीला गेल्याचे येथे काम करणार्या एका परिचारिकेच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी गोळ्या चोरुन नेणाऱ्या संबंधित डॉक्टरांना फोन करुन तेथील रुग्णांची परिस्थिती सांगितली.
या गोळ्या रुग्णांना द्यायच्या आहेत. तुम्ही लवकरात लवकर आणून द्या अन्यथा माझी नोकरी जाईल असे त्यांनी संबंधित डॉक्टरांना फोनवरुन सांगितले.
या फोनची आँडीओ क्लिप सध्या सर्वत्र व्हायरल होत असल्याने येथील कोविड सेंटरवर घडलेल्या या भयानक प्रकाराची, कोविड रुग्णांच्या जीविताशी खेळलेल्या संबंधित डॉक्टरांवर, त्यांना वाचविणारे संबंधित प्रशासकीय अधिकारी, यांची सखोल चौकशी करावी व दोषींवर चोरी व मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अँँड. राहुल मखरे यांनी केली आहे.
निमगांव - केतकी या कोविड सेंटरमधून गोळ्या चोरीप्रकरणी संबंधित गोळ्या चोरांविरोधात त्यावेळी काही सामाजिक कार्यकर्ते यांनी वरीष्ठांकडे तक्रार दाखल केली होती.
याप्रकरणी तालुक्याचे लोकप्रतिनिधी दत्तात्रेय भरणे यांनी तहसिलदार यांना तोंडी आदेश देण्यात आले होते. परंतु याप्रकरणी संबंधित दोषींवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तुम्ही राज्याचे एक जबाबदार मंत्री,तालुक्याचे लोकप्रतिनिधी असताना या घडलेल्या प्रकरणातील संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात एवढा विलंब का?
इंदापूर तालुक्यातील प्रशासकीय विभागातील अनेक अधिकारी आणि राज्यमंत्री भरणे यांचे जवळचे हितसंबंध आहेत असाही गंभीर आरोप अँँड.मखरे यांनी केला असून खुद्द राज्यमंत्रीही या सर्व प्रकरणी दोषी आहेत का ? असा प्रश्न आम्हाला पडला असल्याचे सांगून राज्यमंत्री यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करुन आपण धुतल्या तांदुळासारखे स्वच्छ आहोत हे सिद्ध करावे असे आव्हान अँँड. राहुल मखरे यांनी दिले आहे.गोळ्या चोरी करणार्या दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा - अँड.राहुल मखरे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा