भिगवण पोलिसांची मोठी कारवाई दोन आरोपींना अटक; एक गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त.

 दोन आरोपींना अटक; एक गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त.

इंदापुर दि. प्रतिनिधि: महेश गडदे.

 भिगवण पोलीसांनी (दि.२०) रोजी बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी इंदापूर तालुक्यातील अकोले येथील दोन आरोपींना अटक करून एक पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने व त्यांच्या पथकाला यश              आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी, दादासो रामचंद्र दराडे व महादेव चंद्रकांत दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर जि. पुणे) या दोन आरोपींना अटक केली आहे.
भिगवण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, (दि.२० रोजी) भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांना खबऱ्या मार्फत मिळालेल्या बातमीनुसार अकोले येथील गणपती मंदिरासमोरील रोडवर सदर आरोपी आपल्या ताबेतील मारुती सुझुकी एस क्रॉस MH 42 AS 0008  हिचे मधून एक अग्नीशस्त्र ( गावठी पिस्टल), 4 जिवंत काडतुसे जवळ बाळगून फिरत असल्याची खबर मिळाली होती. 


बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक; एक गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त

यावरून भिगवण पोलिसांनी सापळा रचून सदर आरोपी व त्यांच्या कडील एक गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे किं.रु. ५,५०,८०० / - चा मुद्देमाल हस्तगत केला‌. तसेच सदर गुन्ह्यातील दुसऱ्या आरोपीला देखील सापळा रचून अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. या कारवाईमुळे या भागातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
सदरची कामगिरी, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, पोलीस हवालदार नाना वीर, पोलीस नाईक गोरख पवार, इन्कलाब पठाण यांनी केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.