पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अभंगवस्ती शाळेचे स्नेहसंमेलन जल्लोषात संपन्न.

इमेज
इंदापूर प्रतिनिधी;महेश गडदे. दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अभंगवस्ती येथे वार्षिक स्नेहसंमेलन  उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाले.जिल्हास्तरावर नाट्य स्पर्धेत शाळेचे नाव उंचावल्यामुळे आदरणीय दत्तात्रय भरणे मामा यांच्या हस्ते नाट्य स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना व मुख्याध्यापिका सौ. स्वाती सुरेश लोंढे यांना विशेष सत्काराने सन्मानित करण्यात आले. मुलांच्या उत्साहाला मामांनी भरभरून दाद दिली ..यावेळी सरपंच माननीय श्री अतुल झगडे.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शुभम निंबाळकर, माजी जिल्हा नियोजन समिती अध्यक्ष सचिन सपकळ,झगडेवाडी विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन रमेश अभंग तसेच झगडेवाडी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष प्रल्हाद अभंग.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागेश अभंग तसेच अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. श्री विजयकुमार फलफले सरांच्या बहारदार सूत्रसंचालनाने कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला  कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्व...

सै स्वाती लोंढे यांना प्रतिभा संपन्न शिक्षक पुरस्कार.

इमेज
इंदापूर प्रतिनिधी; महेश गडदे.  जि. प. प्राथ. शाळा अभंगवस्ती येथील मुख्याध्यापिका व आदर्श शिक्षिका सौ. स्वाती सुरेश लोंढे यांना विशेष प्रतिभा संपन्न, गुणवंत शिक्षक पुरस्काराने आमदार दत्तात्रय भरणे मामा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघ व इंदापूर तालुका महासंघाच्या वतीने रविवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी इंदापूर येथे शिक्षक मेळावा व गुणवंत शिक्षक सोहळा संपन्न झाला. यावेळी स्वाती लोंढे यांना आमदार भरणे मामा व राज्य कास्ट्राईब शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी इंदापूरचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट साहेब ,गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात साहेब, कास्ट्राइब शिक्षक संघाचे राज्याचे महासचिव विठ्ठल सावंत, इंदापूर तालुका महासंघाचे तालुका अध्यक्ष सुहास मोरे ,महासचिव शशिकांत मखरे, महिला आघाडी प्रमुख मनीषा ननावरे तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते..

पळसदेव:कैे.अनिल खोत यांना (मरनोत्तर) समाजभूषण पुरस्कार देण्यात आला.

इमेज
पळसदेव कै.अनिल खोत यांना (मरनोत्तर) समाजभूषण पुरस्कार देण्यात आला. इंदापूर प्रतिनिधी:महेश गडदे. इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील,कै अनिल खोत यांनी सन 1992 पासून अण्णा हजारे यांनी आदर्शगाव योजनेची पाच गावातील जबाबदारी दिली भ्रष्टाचार निर्मूलन समितीमध्ये काम केली सन १९९७ पासून शेतकरी संघटनेचे राज्य संघटक म्हणून निवड झाली यावेळी शेतीमालाला भाव मिळावा शेतकऱ्यांचे वीज तोडू नये खडकवासल्याचे पाणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेती पिकासाठी मिळावे ऊस पिकासाठी एफआरपी कायदा व्हावा अशी अनेक आंदोलने केली पण त्यांना अनेक वेळा अटकही झाली.  दिल्ली येथील रामलीला मैदानावर झालेली दहा दिवस उपोषण यातून अनेक महत्त्वाचे निर्णय झाले भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष सौ तृप्ती देसाई यांच्याबरोबर महाराष्ट्रभर आंदोलने केली.  तसेच उजनी धरणातील पाणी प्रदूषण होऊ नये  सीना माढा लातूर बोगदा होऊ नये व उन्हाळ्यामध्ये सोलापूर कडे उजनीचे पाणी नियम बाह्य सोडू नये म्हणून अनेक उपोषणे केली तसेच जलसमाधी आंदोलनही केले.  इंदापूर तालुक्यातील दुष्काळी भागाला उजनी धरणातून मंजूर झालेल...
इमेज
आ. दत्तामामा भरणे यांचा अहमदनगर चे अहिल्यानगर नामांतरणासाठी जाहीर पाठिंबा. प्रतिनिधी:महेश गडदे. खूप दिवसापासून लढा चालू असलेला तो म्हणजे अहमदनगरचे नामांतरण अहिल्यानगर झाले पाहिजे यासाठी संपूर्ण महाराष्ट्राने पाठिंबा दिला आहे त्यामध्ये 20 फेब्रुवारी 2023 रोजी अहमदनगर पाईपलाईन रोड एकविरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामांतरण रथयात्रेचा भव्य महामोर्चा धडकला आणि या मोर्चामध्ये हजारो अहिल्या प्रेमी सामील झाले . अहमदनगरचे अहिल्यादेवी होळकर नगर का व्हावे कारण अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी या गावी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झालेला आहे .आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जगभरामध्ये खूप मोठे योगदान आहे आणि देशातील 95% मंदिरांचा जीर्णोद्धार करणारी एकमेव अशी असणारी राजमाता अहिल्याबाई होळकर आहेत अनेकांना याची माहिती नाही परंतु हे तितकेच सत्य आहे. त्यांचे एवढे मोठे काम असल्यामुळे जसे औरंगाबादचे संभाजीनगर झाले आहे आणि उस्मानाबादचे धाराशिव झाले आहे तर अहमदनगरचे अहिल्यानगर झाले पाहिजे यासाठी हा भव्य महामोर्चा डायरेक्ट जिल्हाध...

इंदापूर:आंतरशालेय नाट्यस्पर्धेत अभंगवस्ती शाळेने मारली बाजी.

इमेज
आंतरशालेय नाट्यस्पर्धेत अभंगवस्ती शाळेने मारली बाजी. इंदापूर प्रतिनिधी:महेश गडदे. यशवंतराव चव्हाण आंतरशालेय नाट्यस्पर्धेत जि. प. प्रा. शाळा अभंगवस्तीने जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळविला आणि उत्कृष्ट दिग्दर्शन व उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिकही पटकावले! "सुदृढ मन" नावाच्या या नाटिकेचे लेखन व दिग्दर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती सुरेश लोंढे यांनी केले होते..त्यांनाही उत्कृष्ट दिग्दर्शकाचे पारितोषिक मिळाले आणि भक्ती मल्हारी अभंग हिला उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले...डायटच्या प्राचार्य डॉ. शोभा खंदारे मॅडम यांनी "सुदृढ मन"च्या टीमचे भरभरून कौतुक केले..अभंगवस्ती शाळेचे जिल्ह्यात नाव झाल्यामुळे माननीय सरपंच श्री. अतुल झगडे ,उपसरपंच श्री. सचिन अभंग ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. नागेश अभंग तसेच सर्व ग्रामस्थ यांनी भरभरून कौतुक व अभिनंदन केले आहे..या नाटिकेत भक्ती अभंग, श्रुती अभंग, ओंकार अभंग, सार्थक जाधव, गौरव बारवकर, तेजस्विनी अभंग ,सुप्रिया बारवकर, समीक्षा नाटकर, युवराज बारवकर ,श्रेयश बारवकर, सार्थक अभंग,गोपाळ अभंग या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता..सर...