अभंगवस्ती शाळेचे स्नेहसंमेलन जल्लोषात संपन्न.
दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अभंगवस्ती येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाले.जिल्हास्तरावर नाट्य स्पर्धेत शाळेचे नाव उंचावल्यामुळे आदरणीय दत्तात्रय भरणे मामा यांच्या हस्ते नाट्य स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना व मुख्याध्यापिका सौ. स्वाती सुरेश लोंढे यांना विशेष सत्काराने सन्मानित करण्यात आले.
मुलांच्या उत्साहाला मामांनी भरभरून दाद दिली ..यावेळी सरपंच माननीय श्री अतुल झगडे.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शुभम निंबाळकर, माजी जिल्हा नियोजन समिती अध्यक्ष सचिन सपकळ,झगडेवाडी विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन रमेश अभंग तसेच झगडेवाडी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष प्रल्हाद अभंग.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागेश अभंग तसेच अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. श्री विजयकुमार फलफले सरांच्या बहारदार सूत्रसंचालनाने कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती लोंढे मॅडम.सहशिक्षिका सौ. अश्विनी हेगडे मॅडम तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा सौ. पूनम ताई अभंग व सर्व सदस्य ग्रामस्थ यांनी अथक परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा