पळसदेव:कैे.अनिल खोत यांना (मरनोत्तर) समाजभूषण पुरस्कार देण्यात आला.

पळसदेव कै.अनिल खोत यांना (मरनोत्तर) समाजभूषण पुरस्कार देण्यात आला.

इंदापूर प्रतिनिधी:महेश गडदे.

इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील,कै अनिल खोत यांनी सन 1992 पासून अण्णा हजारे यांनी आदर्शगाव योजनेची पाच गावातील जबाबदारी दिली भ्रष्टाचार निर्मूलन समितीमध्ये काम केली सन १९९७ पासून शेतकरी संघटनेचे राज्य संघटक म्हणून निवड झाली यावेळी शेतीमालाला भाव मिळावा शेतकऱ्यांचे वीज तोडू नये खडकवासल्याचे पाणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेती पिकासाठी मिळावे ऊस पिकासाठी एफआरपी कायदा व्हावा अशी अनेक आंदोलने केली पण त्यांना अनेक वेळा अटकही झाली.
 दिल्ली येथील रामलीला मैदानावर झालेली दहा दिवस उपोषण यातून अनेक महत्त्वाचे निर्णय झाले भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष सौ तृप्ती देसाई यांच्याबरोबर महाराष्ट्रभर आंदोलने केली.
 तसेच उजनी धरणातील पाणी प्रदूषण होऊ नये  सीना माढा लातूर बोगदा होऊ नये व उन्हाळ्यामध्ये सोलापूर कडे उजनीचे पाणी नियम बाह्य सोडू नये म्हणून अनेक उपोषणे केली तसेच जलसमाधी आंदोलनही केले.
 इंदापूर तालुक्यातील दुष्काळी भागाला उजनी धरणातून मंजूर झालेल्या सिंचन योजना सोलापूर येथील विरोधकांनी  विरोध करू नये म्हणून 17 दिवस उपोषण मध्ये सक्रिय सहभाग नोंदवला .
 सन २०१४ मध्ये बारामती येथे धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून  सात दिवस उपोषण केले पळसदेव गावचे सरपंच असताना गावामध्ये अनेक विकास कामे तंटामुक्त अभियान दारू बंदी ग्रामस्वच्छता अभियान आदी यशस्वी प्रयोग केले गेली सत्ताविस वर्ष जमीन मोजणी व्यवसायातून हजारो तंटे मिटवले.
 या त्यांच्या  समाजकार्याचा गौरव करण्यासाठी औरंगाबाद येथे डब्ल्यू डी एस ओ या जागतिक सामाजिक संघटनेने सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी श्री रघुनाथ कुवर नाशिक  अभिनेत्री छायाताई बोराडे औरंगाबाद साहित्यरत्न श्री अशोक पंतोड अकोला श्री प्रेम अगुनी मुंबई ज्येष्ठ नेते व्यंकटेश चेमियार बीड सौ सुनंदा पाटील कोल्हापूर आदर्श शिक्षक बबन आटोळे पुणे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते औरंगाबाद येथे डब्ल्यू डी एस ओ या सामाजिक संघटनेच्या परिषदेत कै अनिल खोत यांना मोरनोत्तर समाजभूषण पुरस्कार आणि सन्मानित केले यावेळी त्यांचे बंधू श्री सखाराम खोत यांच्याकडे पुरस्कार प्रदान करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.