सै स्वाती लोंढे यांना प्रतिभा संपन्न शिक्षक पुरस्कार.
इंदापूर प्रतिनिधी; महेश गडदे.
जि. प. प्राथ. शाळा अभंगवस्ती येथील मुख्याध्यापिका व आदर्श शिक्षिका सौ. स्वाती सुरेश लोंढे यांना विशेष प्रतिभा संपन्न, गुणवंत शिक्षक पुरस्काराने आमदार दत्तात्रय भरणे मामा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघ व इंदापूर तालुका महासंघाच्या वतीने रविवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी इंदापूर येथे शिक्षक मेळावा व गुणवंत शिक्षक सोहळा संपन्न झाला.
यावेळी स्वाती लोंढे यांना आमदार भरणे मामा व राज्य कास्ट्राईब शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
यावेळी इंदापूरचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट साहेब ,गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात साहेब, कास्ट्राइब शिक्षक संघाचे राज्याचे महासचिव विठ्ठल सावंत, इंदापूर तालुका महासंघाचे तालुका अध्यक्ष सुहास मोरे ,महासचिव शशिकांत मखरे, महिला आघाडी प्रमुख मनीषा ननावरे तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा