इंदापूर:आंतरशालेय नाट्यस्पर्धेत अभंगवस्ती शाळेने मारली बाजी.
आंतरशालेय नाट्यस्पर्धेत अभंगवस्ती शाळेने मारली बाजी.
इंदापूर प्रतिनिधी:महेश गडदे.
यशवंतराव चव्हाण आंतरशालेय नाट्यस्पर्धेत जि. प. प्रा. शाळा अभंगवस्तीने जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळविला आणि उत्कृष्ट दिग्दर्शन व उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिकही पटकावले!
"सुदृढ मन" नावाच्या या नाटिकेचे लेखन व दिग्दर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती सुरेश लोंढे यांनी केले होते..त्यांनाही उत्कृष्ट दिग्दर्शकाचे पारितोषिक मिळाले आणि भक्ती मल्हारी अभंग हिला उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक
मिळाले...डायटच्या प्राचार्य डॉ. शोभा खंदारे मॅडम यांनी "सुदृढ मन"च्या टीमचे भरभरून कौतुक केले..अभंगवस्ती शाळेचे जिल्ह्यात नाव झाल्यामुळे माननीय सरपंच श्री. अतुल झगडे ,उपसरपंच श्री. सचिन अभंग ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. नागेश अभंग तसेच सर्व ग्रामस्थ यांनी भरभरून कौतुक व अभिनंदन केले आहे..या नाटिकेत भक्ती अभंग, श्रुती अभंग, ओंकार अभंग, सार्थक जाधव, गौरव बारवकर, तेजस्विनी अभंग ,सुप्रिया बारवकर, समीक्षा नाटकर, युवराज बारवकर ,श्रेयश बारवकर, सार्थक अभंग,गोपाळ अभंग या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता..सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा