प्रतिनिधी:महेश गडदे.
खूप दिवसापासून लढा चालू असलेला तो म्हणजे अहमदनगरचे नामांतरण अहिल्यानगर झाले पाहिजे यासाठी संपूर्ण महाराष्ट्राने पाठिंबा दिला आहे त्यामध्ये 20 फेब्रुवारी 2023 रोजी अहमदनगर पाईपलाईन रोड एकविरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामांतरण रथयात्रेचा भव्य महामोर्चा धडकला आणि या मोर्चामध्ये हजारो अहिल्या प्रेमी सामील झाले .
अहमदनगरचे अहिल्यादेवी होळकर नगर का व्हावे कारण अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी या गावी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झालेला आहे .आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जगभरामध्ये खूप मोठे योगदान आहे आणि देशातील 95% मंदिरांचा जीर्णोद्धार करणारी एकमेव अशी असणारी राजमाता अहिल्याबाई होळकर आहेत अनेकांना याची माहिती नाही परंतु हे तितकेच सत्य आहे. त्यांचे एवढे मोठे काम असल्यामुळे जसे औरंगाबादचे संभाजीनगर झाले आहे आणि उस्मानाबादचे धाराशिव झाले आहे तर अहमदनगरचे अहिल्यानगर झाले पाहिजे यासाठी हा भव्य महामोर्चा डायरेक्ट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आणि या नामांतरण कृती समितीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन लवकरात लवकर अहमदनगरचे नामांतरण अहिल्यानगर करावे या मागणीसाठी निवेदन दिले.
यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तामामा भरणे यांनी फोनवरून सर्वांना संबोधित केले की या राज्याचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या नामांतरांला आम्ही पाठिंबा देत आहोत काही झाले तरी अहमदनगरचे अहिल्यानगर नक्की होईल असे माजी राज्यमंत्री व इंदापूरचे आमदार दत्तामामा भरणे यांनी सांगितले.
यावेळी वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय समन्वयक व श्री दत्तामामा भरणे यांचे कार्यकर्ते सखाराम खोत पळसदेव,अशोक पांतोड अकोला,बबनराव आटोळे पुणे, रघुनाथ कुवर नाशिक यांनी मीडियाशी बोलताना प्रतिक्रिया दिली की औरंगाबादचे संभाजीनगर उस्मानाबादचे धाराशिवनगर नाव होते पण चौंडी गावी अहिल्यादेवी चा जन्म झाला त्याचे नगर जिल्ह्याची अहिल्यानगर नामांकन का होत नाही महाराष्ट्र शासनाने 31 मे 2023 पर्यंत या प्रस्तावाची दखल न घेतल्यास भविष्यात आक्रमक आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
यावेळी माजी राज्यमंत्री इंदापूर तालुक्याचे आमदार मा दत्ता मामा भरणे यांनी मोबाईल वरून संबोधित केली की या प्रस्तावावर येत्या अधिवेशनात पाठपुरावा करू आणि अहिल्यादेवींच्या समाजकार्याचे नावलौकिक करू असे सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा